अंगण

क्रांतिदिनाचे संस्मरण

– अनिल पै डॉ. लोहियांनी भाषणाला सुरुवात केली. कॅप्टन मिरांदानी पिस्तुल रोखले व भाषण बंद करण्याचा हुकूम दिला. लोकांना वाटले आता पिस्तुलातून गोळी सुटेल. डॉ. महाशय हा प्रसंग कसा निभावून नेणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले. डॉ. लोहियांनी असे अनेक प्रसंग पाहिले होते. भीती हा शब्द त्यांच्या कोशात नव्हता. माशी उडवावी त्या सहजतेने आपले भाषण चालू असताना कॅप्टन मिरांदाचा उगारलेला ... Read More »

सुस्थिर व विकसित नेपाळ ही काळाची गरज

– दत्ता भि. नाईक चीनकडून नेपाळचा भारतविरोधी कारवायांसाठी लॉंचिंग पॅड म्हणून वापर केला जाण्याची शक्यता आहे. या बाबतीत नेपाळने अधिक काळजी घेतली पाहिजे. आगामी काळात नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता असून चालणार नाही. सुस्थिर व विकसित नेपाळ ही दक्षिण आशियाचीच नव्हे तर संपूर्ण विश्‍वाची गरज आहे. मंगळवार, दि. ६ जून रोजी नेपाळी कॉंग्रेस या नेपाळमधील सर्वात जुन्या पक्षाचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा ... Read More »

गोवा मराठी चित्रपट महोत्सव… दहा पावलांचा प्रवास

– उदय नरसिंह महांबरे ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सव’ आयोजित करताना तारेवरची कसरत करावी लागते. सुरुवातीच्या काही वर्षांत जरी सरकारने थोडीफार मदत महोत्सवाला केली असली तरी आता या महोत्सवाचा भार प्रायोजकांच्या सहकार्याने स्वतः ‘विन्सन वर्ल्ड’ ही संस्था स्वतःच्या खांद्यावर पेलते. शासकीय मदतीविना सतत दहा वर्षे सलगपणे हा महोत्सव गोव्यात घडवून आणणारे संजय शेट्ये व त्यांचे बंधू श्रीपाद शेट्ये म्हणूनच अभिनंदनास पात्र ... Read More »

अनुबंध ः डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या लालित्यपूर्ण लेखनाचा आविष्कार

– डॉ. सोमनाथ कोमरपंत डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब त्यांच्या ‘अनुबंध’ या ललितनिबंधसंग्रहात पडलेले आहे. त्यांतील काही लेख आत्मपर आहेत. गतकाळातील आणि नजीकच्या काळातील संस्मरणे त्यांत आहेत. साहित्यक्षेत्रातील मान्यवर लेखकांची व्यक्तिचित्रे त्यात आहेत. काही मृत्युलेखही त्यात समाविष्ट केलेले आहेत. मराठीच्या नामवंत प्राध्यापक, प्रथितयश कथालेखिका आणि समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी दीर्घकाळपासून सकस साहित्यनिर्मिती करून आपल्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाचा ठसा ... Read More »

भाग- १५ चला महाबळेश्वरला जाऊ…

– सौ. प्रतिभा वासुदेव कारंजकर बालकवी त्यांच्या स्नेह्याकडे वाईला आले होते. ते पुढे फिरायला म्हणून पांचगणी- महाबळेश्वरला ऐन श्रावणात आले. गाडीतून जाताना खोर्‍यातली शेते बघून आणि सर्वत्र पसरलेल्या ओल्या हिरवाईला पाहून त्यांना ‘श्रावण मासी हर्ष मानशी, हिरवळ दाटे चोहीकडे’ ही कविता सुचली असे सांगतात. पांचगणी पाहून झाल्यानंतर आपसुकच आपली पावले वळतात ती महाबळेश्वरकडे, जे ‘हेवन ऑफ महाराष्ट्र’ म्हणून प्रसिद्ध आहे! ... Read More »

तृप्तीचा ढेकर

– सौ. पौर्णिमा केरकर चोर्ल्याला असलेले उज्ज्वलाचे लग्न असेच एका शेणाने सारवलेल्या मातीच्या अंगणात झाले. वराच्या घरीच पत्रावळीवर पंगत बसवली. वाढणारे समूहाचे तरुण हात प्रेमाने कार्यरत होते. जेवतानाचा तृप्तीचा ढेकर जुन्या आठवणींसकट मोठा आनंद देऊन गेला. बर्‍याच वर्षांनी खूप सुंदर, साध्या, निसर्गरम्य परिसराला साक्षी ठेवून संपन्न झालेल्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहता आले. त्यामुळे आजच्या विवाहसोहळ्यांच्या गर्दीत अशा जरा हटके झालेल्या या ... Read More »

वेध भविष्यातील तंत्रज्ञानाचा

– रामराव वाघ मागील काही वर्षांमध्ये आपण तंत्रज्ञानाच्या फरच आहारी गेलो आहोत. याला मुख्यत्वे मोबाईल स्मार्टफोन व संगणकाचा वाढता वापर कारणीभूत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आपण अनेक गोष्टी सहजरीत्या करू शकतो. तंत्रज्ञानाचा हा वाढता वेग पाहिला व वेगवेगळ्या क्षेत्रांमधील त्याचा वापर पाहिला तर भविष्यात आपल्या जीवनावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता दिसून येते.  मागील काही वर्षांमध्ये आपण तंत्रज्ञानाच्या फरच आहारी गेलो ... Read More »

बलात्कार्‍यांना फासावर लटकवा!

– दत्ता भि. नाईक बलात्कार पीडित महिलेला जगणे मुश्कील होऊन जाते. तिची चूक नसतानाही तिच्याकडे अपराधी असल्यासारखे पाहिले जाते. बर्‍याच वेळेस समाज तिला सामावून घ्यायला तयार नसतो. अशा घटनांमुळे बलात्कार करणार्‍याला कोणती शिक्षा द्यावी यावर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे निर्भया बलात्कार व हत्याकांड प्रकरण घडले व संपूर्ण देश या घटनेने हादरला. ज्या बसमध्ये ही घटना ... Read More »

रसिकांच्या काळजात कायमची घुसलेली ‘कट्यार…’

पं. प्रसाद सावकार (शब्दांकन ः रामनाथ न. पै रायकर) बरोबर पन्नास वर्षांपूर्वी तिघे गोमंतकीय एकत्र आले आणि त्यांनी एका अजरामर संगीत नाटकाची निर्मिती केली. ते नाटक होते ‘कट्यार काळजात घुसली’ आणि त्याची निर्मिती करणारे ते तिघे गोमंतकीय होते, द्रष्टे नाट्यनिर्माते प्रभाकर पणशीकर, असामान्य प्रतिभेचे संगीत संयोजक पं. जितेंद्र अभिषेकी आणि लोकप्रिय गायक नट पं. प्रसाद सावकार. मराठी रंगभूमीच्या वाटचालीत हे ... Read More »

बँकिंग उद्योगात बदलते वारे

  – शशांक मो. गुळगुळे सार्वजनिक उद्योगातील बँका या आता शंभर टक्के सरकारच्या मालकीच्या नाहीत, कारण यातील जवळजवळ सर्व बँका शेअरबाजारात ‘लिस्टेड’ आहेत. तरीही सरकारकडे बहुसंख्येने मालकी आहे व सद्याच्या परिस्थितीत या बँका या सरकारला पांढरा हत्ती वाटू लागल्या आहेत. यातून बँकिंग उद्योगाला स्थैर्य यावे म्हणून सरकार आता विलीनीकरणाबाबत गांभीर्याने विचार करीत आहे. गेली दोन दशके बँकांचा फाफटपसारा बंद करून, तुलनेने ... Read More »