ब्रेकिंग न्यूज़

अंगण

लक्षद्विपची जलसफर

पणजीहून सकाळी निघून मंगळूरमार्गे रेल्वेने आम्ही रात्री १० वाजता कोचिनला पोहोचलो. तेथे नौदल अधिकार्‍यांनी आमचे स्वागत केल्यानंतर तेथील वेलिंग्टन या भव्य आस्थापनात आम्ही नेव्हीच्या पाहुणचाराचा सुखद अनुभव घेतला. दुसर्‍या दिवशी ११ वाजता आयएनएस ‘कृष्णा’वरून आमच्या लक्षद्विप जलसफरीला प्रारंभ झाला. त्यानंतरच्या दुसर्‍या दिवशी संध्याकाळी पाच वाजता राजधानी ‘आंध्रोत’ येथे पोहोचलो. तेथील पारदर्शक सागरकिनार्‍यांच्या तळाशी पांढरीशुभ्र समुद्रफुले पाहून निसर्गाच्या एका अनोख्या आनंददायी ... Read More »

म्हापसा आल्तिनो येथील बार्देस जिल्हा न्यायालय व ऑलेम्पिक गार्डन

‘काम्र म्युनिसिपाल-द-बार्देस’कडून आपण सरळ आलो आणि ‘आद्मिस्त्रासांव-द-कोमिनीदादीश’ इमारतीजवळील चौकात पोचलो की एक रस्ता पूर्व दिशेला असलेल्या ‘दि त्रिबुनाल ज्युदिसिआल द कोमार्का-दे-बार्देस’ या पोर्तुगीजकालीन न्यायालयाच्या दिशेने जातो. दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे खटले या न्यायालयात चालत असत. हे तत्कालिन जिल्हा न्यायालय होते. या न्यायालयाच्या इमारतीची रचना म्हणजे वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना होता. गोवा मुक्तीनंतर या इमारतीचा विस्तार करण्यात आला असला तरी या ... Read More »

फुलांवर उडती फुलपाखरे

अवतीभवती उडणारी फुलपाखरे पाहिली की शाळेतले फुलपाखरांसारखे रंगीबेरंगी दिवस आठवतात. काहीजणांना फुलपाखरू दिसताच लहानपणी अभ्यासलेल्या कवितेतली ‘फुलपाखरू| छान किती दिसते’ ही पहिली ओळ आठवते. मला या कवितेबरोबरच ‘धरू नका ही बरे’ ही फुलपाखरांवरची आणखी एक कविता आठवते. तिसरीच्या ‘बालभारती’ पाठ्यपुस्तकात ही कविता होती. उडत्या फुलपाखरांमागे धावण्याचे ते मजेचे दिवस. पहिल्या-दुसर्‍या इयत्तेपासूनच फुलपाखरांविषयी कमालीचं आकर्षण वाटत होतं. मला आठवतं, दुसरीच्या पाठ्यपुस्तकात ... Read More »

चकवाचांदण एका निराळ्या जीवनपथिकाची रसमय कहाणी

जीवनाच्या सैरभर क्षणी जेव्हा मी मारुती चितमपल्लींचे ‘चकवाचांदण’ हे सहाशे सत्त्याऐंशी पृष्ठांचे आत्मचरित्र वाचतो तेव्हा माझ्या मनाचा थकवा नाहीसा होतो. अनेकदा वाचूनही तोचतोचपणा जाणवत नाही. पंचेंद्रियांनी प्रत्यक्ष सृष्टीतील प्रतिसृष्टी निर्मिलेल्या या सृजनशील आत्म्यासमोर मी नतमस्तक होतो. अतिंद्रिय शक्तीकडे नेणार्‍या या प्रज्ञावंताची आणि प्रतिभावंताची झेप पाहून त्याने आपले नाव सार्थ केले असे वाटायला लागते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे धनंजय कीरांच्या ‘कृतज्ञ ... Read More »

फुकटेगिरी

अमुक एका वस्तूबरोबर दुसरी वस्तू ‘फ्री’ अशी जाहिरात दिसली की आपली पावलं त्या दिशेनं वळायलाच हवीत. ‘फुकट’ या शब्दातच जादू असते, जिचा पगडा म्हणा वा पकड आपल्या सुपीक मेंदूवर पडतेच आणि मग फुकटातली वस्तू पदरात पाडून घेण्याकरिता नको त्या वस्तूची खरेदी आपल्याकडून झालीच म्हणून समजा! ‘फुकट’ या शब्दाचे आकर्षण नसलेला माणूस हातात दिवा घेऊन शोधायला गेला तरी आढळणे कठीणच म्हणायला ... Read More »

आदिशक्तीचा अंश मिरवताना…

नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर स्त्रीशक्तीचा उद्घोष होत असताना समाजातील कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान होणं योग्य आहेच, पण त्याचबरोबर स्त्रियांमधील विनाशकारी प्रवृत्तींवर भाष्य होणं आणि कमी ती दूर करण्यासाठी त्यांना समुपदेशन आणि मार्गदर्शन करणंही गरजेचं आहे. नवरात्रीचं मंगल पर्व… एका आनंदमयी उत्सवाची सुरुवात. आदिशक्तीच्या आराधनेचा एक सुरम्य योग! नवरस आणि नवरंगांचा हा महोत्सव. हा उत्सव नेहमीच्या धुमधडाक्यात आणि मंगलमय वातावरणात साजरा होईलच, पण खरी ... Read More »

नवदुर्गा

अलीकडे लक्ष्मण वर्गात वरचेवर गैरहजर राहतो. विचारले तर काहीसुद्धा बोलत नाही. ओठ घट्ट मिटून असतो. त्या दिवशीसुद्धा असेच झाले. हनुवटीवर छोटीशी दाढी ठेवून, कानाजवळचे केस वाढवून तो वर्गात येऊन बसला. परत परत सांगूनसुद्धा ऐकल्या न ऐकल्यासारखे करून तो आपल्याला पाहिजे तेच करतो. त्यामुळे त्याला सांगून सांगून माझी सहनशीलताच संपून गेली. त्याने निदान स्वतःला व्यक्त करावं यासाठी माझी चाललेली धडपडसुद्धा हळूहळू ... Read More »

नऊ रात्री आणि विजयोत्सव

ही बीजं धान्याची आणि सृजनोत्सव धरणीचा; तशीच आपल्या जगण्यात ती असावीत सद्भावनांची, सत्‌प्रवृत्तींची; आणि अनुभव यावा ‘शुद्ध बीजापोटी, तरु कोटी कोटी…’ असाच. आणि उत्सव असावेत आनंदाचे, विविध कलागुणांचे, सर्जनाचे, कृतार्थतेचे! ही नवरात्र सर्वांना हर्षदा, नवऊर्जादायी ठरो, आणि या विजयादशमीला आनंदाचे, समाधानाचे सोने भरभरून लुटता येवो, हीच शुभेच्छा! गणपती उत्सवाची धामधूम संपली. पितृपंधरवडा उलटत आला आणि वेध लागले नवरात्रीचे… वेध लागले ... Read More »

टॉप-अप कर्जे

–  शशांक गुळगुळे दुसर्‍या कर्जासाठी चांगला पर्याय म्हणजे ‘टॉप-अप लोन!’ हे कर्ज वैयक्तिक, व्यवसायासाठी, घर तसेच वाहन खरेदीसाठी, तसेच योग्य ‘सिक्युरिटी’ असेल तर अन्य कारणांसाठीही मिळू शकते. सणांकरिता मोठी खरेदी करण्यासाठी किंवा घराचे नूतनीकरण करण्यासाठीही हे कर्ज मिळू शकते. हल्ली कर्ज मिळणे तितकेसे कठीण राहिलेले नाही. तुमची जर कागदपत्रे व्यवस्थित असतील तर काही दिवसांत तुम्हाला कर्ज संमत होऊ शकते. जर ... Read More »

हासरा नाचरा… सुंदर साजिरा…!

– गिरिजा मुरगोडी निसर्गातल्या, समाजातल्या, साहित्यातल्या अशा कितीतरी श्रावणवेळा आपल्याला लोभावतात, मोहवतात, भुरळ घालतात. तशाच, प्रत्येकानं आपापल्या आयुष्यातही काही श्रावणवेळा अनुभवलेल्या असतात नाही का? त्याही मनात जपलेल्या असतात. कुपीतल्या अत्तरासारख्या त्या दरवळत असतात. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचं त्याचं रूप वेगळं… भेटणं वेगळं… भावणं वेगळं! हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला लपत, छपत, हिरव्या रानात केशर शिंपीत श्रावण आला… कुसुमाग्रजांच्या ... Read More »