ब्रेकिंग न्यूज़

अंगण

श्री मनाचे श्‍लोक

नको रे मना क्रोध हा खेदकारी| नको रे मना काम नानाविकारी॥ नको रे मना लोभ हा अंगिकारू| नको रे मना मत्सरु दंभ भारु॥ भावार्थ ः हे मना, दुःख देणारा, खेद उत्पन्न करणारा राग करू नकोस. तसेच विविध प्रकारचे विकार उत्पन्न करणारे वाईट विचार मनात बाळगू नकोस. कोणत्याही प्रकारचा लोभ देहात साठवू नकोस, अन् मत्सर, दंभ या विकारांनी आपले मन भरून ... Read More »

भारतीय वीरांगना

हरिष भनोत हे ‘हिंदुस्थान टाइम्स’ या वृत्तसंस्थेत काम करणारे एक हुशार पत्रकार. त्यांना एक मुलगी होती, तिचे नाव नीरजा. नीरजा लहानपणापासूनच खूप शूर होती. अभ्यासातही हुशार अन् चतुर. नीरजाला लहानपणापासूनच आकाशात उडणार्‍या विमानांचे आकर्षण होते. तिला मोठेपणी एअर लाईन्समध्येच काम करायचे होते. ते तिचे स्वप्न होते. ते तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या पालकांनी तिला खूप प्रोत्साहन दिले. मेहनत घेतली. शेवटी ... Read More »

राशिभविष्य

मेष : विद्यार्थी, संतती यांना यशदायक काळ राहील. सरकारी कार्यालयीन कामकाजात प्रगतीपथावर रहाल. व्यावसायिक उलाढाल, औद्योगिक वसाहतीतील कामकाज यांतून यश मिळेल. औद्योगिक उत्पादन तसेच औद्योगिक कामगार यांनाही प्रगतीपर काळ राहील. धार्मिक, आध्यात्मिक कामातून समाधान मिळवाल. भागीदारी, कोर्ट कामकाज व वकिली यांतून यश मिळेल. वैवाहिक जुळवणी साध्य होईल. चिकाटी व जिद्दीच्या जोरावर बहुतेक आघाड्यांवर प्रयत्नांचा रेटा चालू ठेवू शकाल. १४-१६ दरम्यान ... Read More »

फुलपाखरू

ही कविता आपल्याला तिसरीत होती नं बहुतेक? हल्ली कधीतरी कळलं की ती ग. ह. पाटील यांची कविता आहे. आमच्या माळवदे बाई सांगायच्या, ‘‘मराठीची पुस्तकं काढा रेऽऽ’’ बाईंनी असं सांगितलं की मराठीचा तास सुरू! छान चालीत आपण ही कविता म्हणायचो. कवितेला दिलेलं फुलपाखराचं चित्रही खूप गोड होतं. त्याच्या पंखांना हात लावावासा वाटे… पुढे या कवितेतल्या एका ओळीचं मजेशीर विडंबन झालेलं. ‘पंख ... Read More »

मिठाची ‘अप्रतिम’ खाण

लहानपणी एक गोष्ट ऐकली होती. एका राजाला चार मुली असतात. एक दिवस राजा त्या चौघींना प्रश्‍न विचारतो की, मी तुम्हाला किती आवडतो किंवा माझे महत्त्व तुम्हाला कशासारखे वाटते? मोठी म्हणाली बाबा, तुम्ही तर माझ्यासाठी सोन्यासारखे आहात. राजा एकदम खूश झाला. दुसर्‍या दोघींनी पण असेच काही सांगून राजाला खूश केले. सर्वात धाकटी हुशार होती. ती म्हणाली, तुम्ही आम्हा सर्वांना ‘मीठासारखे’ प्रिय ... Read More »

जेरमी लालरिनुंगा

लालनेथलुंगा यांचा १५ वर्षीय मुलगा जेरमी लालरिनुंगा याने काही दिवसांपूर्वीच विक्रम करताना भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले. युथ ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने पहिलेवहिले सुवर्णपदक भारताला मिळवून दिले. वैयक्तित सर्वोत्तम कामगिरी करताना त्याने तब्बल २७४ किलो वजन उचलले. सीनियर विभागातील राष्ट्रीय विक्रमापेक्षा केवळ एका किलोने हे वजन कमी होते. त्यामुळे त्याच्या प्रचंड कामगिरीची प्रचिती येते. परिस्थितीमुळे व जबाबदारीमुळे लालनेथलुंगा यांना ... Read More »

वाहन विम्यासाठी आता जास्त पैसे मोजा!

वाहन विम्यासाठी विमाधारकाला आता किमान ६०० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. वाहन विमा घेताना वैयक्तिक अपघात विम्याचे संरक्षण घेणे सक्तीचे करण्यात आले असून विमा संरक्षणाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवणार्‍या ‘दि इन्शुरन्स रेग्युलेटरी ऍण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया’ने (आयआरडीएआय) २० सप्टेंबर २०१८ रोजी विमा कंपन्यांना पत्रक काढून सूचना दिल्या आहेत की, यापुढे वाहन विमा उतरविताना वैयक्तिक ... Read More »

अति सर्वत्र वर्ज्ययेत्

‘खरं सांगू? जगायचं कशासाठी हेच कळेनासं झालंय.’ हे उद्विग्न स्वरातील शब्द ऐकून मी हळूच वळून पाहिलं. दोन चाळिशीचे गृहस्थ काहीतरी चर्चा करत होते. त्यातला एकजण वरील वाक्य बोलला होता. मला खूप वाईट वाटलं. अजून अर्धं आयुष्यही संपलं नाही अन् एवढं वैफल्य! का कोण जाणे, परंतु हल्ली असेच भाव जाणवतात सर्वत्र… कुणाच्या शब्दात, कुणाच्या चेहर्‍यावर, कुणाच्या डोळ्यांत… आणि हे केवळ वयस्कर ... Read More »

बाहुल्यांचे खेळ

खरंतर तुम्ही-आम्ही तशा कळसूत्री बाहुल्याच. कुण्या अनामिक, अज्ञात शक्तीने सूत्रे हलवावी, त्याबरहुकूम आम्ही नाचावं. आपल्या मनाप्रमाणं, मनाला येईल तसं नाचतो आहोतचा दंभ मिरवीत. मी यंव केलं, त्यंव केलं हा भ्रम कायम जोजवीत ङ्गुशारक्या मारतो आपण. पण या सजीव, सशरीर बाहुल्यांची सूत्रे दुसर्‍या कुणाच्या तरी नाचविणार्‍या हाती. त्यानं ‘नाच गं घुमा’ म्हणायचं. त्या अनाम शक्तीचे सोडाच; आमच्या बालपणी आम्हाला वडीलधारी माणसे ... Read More »

टोपी पुराण

‘टोपी’ म्हटल्यावर आठवते ती लहानपणी ऐकलेली ‘उंदीर आणि राजाची गोष्ट?’ गोंड्याची टोपी घालून एक उंदीर जेव्हा राजवाड्यासमोर दंगा करू लागला तेव्हा राजाला राग आला आणि त्याने उंदराची टोपी काढून घ्यायला लावली. मग उंदराने आणखीनच आरडाओरडा करायला सुरुवात केली, ‘राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भिकारी माझी टोपी घेतली…’ शेवटी राजाला उंदराची टोपी परत करावी लागली. वय थोडं वाढल्यावर टोपीचं गाणं ... Read More »