ब्रेकिंग न्यूज़

अंगण

‘संतसाहित्य कथासंदर्भकोशा’च्या निमित्ताने

– डॉ. सोमनाथ कोमरपंत प्रा. आचार्य यांनी पुराणकथांचे संदर्भ शोधून ते नोंदविण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संदर्भग्रंथात प्रा. आचार्य यांचे व्युत्पन्नता, रसज्ञता आणि मांडणीचा साक्षेप हे गुण दिसून येतात. सांस्कृतिक संचिताच्या जतनासाठी तो भविष्यकाळात फलदायी ठरणार आहे, संतसाहित्याच्या सम्यक आकलनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. प्रा. मा. ना. आचार्य यांनी नुकताच ‘संतसाहित्य कथासंदर्भकोश’ साकार केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या आणि ... Read More »

पुरुषांच्या कार्यक्षेत्रात महिलांचा प्रवेश

– डॉ. मृदुला सिन्हा (अनुवाद : ऍड. अक्षता पुराणिक-भट) पुरुषांच्या कार्यक्षेत्रामधील महिलांचा प्रवेश प्रशंसनीय तर आहेच, पण त्यांनी ही उपलब्धी केवळ पुरुषांना श्रेष्ठ मानून प्राप्त केली असेल तर ती प्रशंसनीय नाही. पुरुषांच्या क्षेत्रामध्ये महिलांच्या पदार्पणाचे स्वागत पुरुषही करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. हल्लीच्या दिवसांत शिक्षण आणि विकासाच्या संधी घेऊन पुढे जाणार्‍या तरुणींमध्ये एक स्पर्धा दिसून येते. ती म्हणजे, पुरुषांच्या ... Read More »

भारत-अमेरिका करार ः नफ्याचा की तोट्याचा?

– प्रा. दत्ता भि. नाईक पाकिस्तान सीमेवर दैनंदिन युद्ध चालले तरीही ही सीमारेषा युद्धबंदी रेषा नसून नियंत्रणरेषा बनवली गेली. या पार्श्‍वभूमीवर या कराराचे अवलोकन केले तर यात भारताची बाजू लंगडी पडेल असे नाही, याउलट या करारामुळे एक मोठा समंध शांत केला जाणार आहे. आपल्या देशाला नफा होणार की तोटा हे काळच ठरवणार आहे. डिसेंबर १९९१ मध्ये सोव्हिएत संघराज्याचे विसर्जन झाले ... Read More »

मंतरलेल्या काळात घेऊन जाणारी पाठ्यपुस्तके

– डॉ. सोमनाथ कोमरपंत आपल्या विद्यामंदिरांतून जोपर्यंत मातृभाषेची प्रतिष्ठापना शिक्षणाचे माध्यम म्हणून होत नाही, तोपर्यंत आत्मिक उद्धाराची दिशा भारतीय समाजाला लाभणार नाही. असे होत राहिले तर सकस सृजनात्मकतेची आशाच मावळेल. स्वभाषेशिवाय आत्मप्रकटीकरणाचा प्रभावी आविष्कार होणे अशक्य. मुलांच्या संवेदनक्षम वयात सृजनात्मक शक्तींचा विकास होण्यासाठी आणि वाङ्‌मयीन अभिरुची निर्माण होण्यासाठी पाठ्यपुस्तके मोलाचा हातभार लावत असतात. भोवतालची परिस्थिती पाहता याची वानवा दिसते. स्वातंत्र्योत्तर ... Read More »

ऊर्जित पटेल अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था आणतील?

– शशांक मो. गुळगुळे अखेर रिझर्व्ह बँकेचे उपगव्हर्नर ऊर्जित पटेल यांची गव्हर्नर पदावर निवड झाली. आता सरकारच्या मर्जीतला गव्हर्नर स्थानापन्न झाल्यामुळे दोघांच्यात चांगला समन्वय साधून, देश आर्थिकदृष्ट्या ऊर्जितावस्थेकडे जाईल अशी आशा व अपेक्षा करूया! भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा कालावधी ४ सप्टेंबर २०१६ पर्यंत होता. पण त्यांनी दोनतीन महिन्यांपूर्वीच त्यांना मुदतवाढ नको असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे ५ ... Read More »

लाल किल्ल्यावरील भाषणाचा संदेश

– दत्ता भि. नाईक चीनच्या झिंझियांग- ग्वादर मार्गाचे स्वप्न धुळीस मिळवायचे असेल तर एकतर पाकव्याप्त जम्मू-काश्मीर भारताला मिळाले पाहिजे, नाहीतर बलुचिस्तान पाकिस्तानपासून फुटून निघाले पाहिजे हे समजण्याइतकी राजकीय परिपक्वता श्री. नरेंद्र मोदी यांच्याजवळ आहेच. आपल्या देशाच्या राष्ट्रीय इतिहासात लाल किल्ल्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तोमरवंशीयांचा हा किल्ला पृथ्वीराज चौहानच्या हातून आक्रमक परकीयांच्या हातात गेला तरीही त्याचे महत्त्व कमी झाले नाही. ... Read More »

हे जगण्याचे कृष्णगान…

– डॉ. अनुजा जोशी होकाराला उजेडाचा रंग असतो व नकाराला अंधाराचा. पण कृष्ण हा या दोन्हींमधला मोरपंखी ‘सकार’ आहे. लौकिक जगात जगताना हे अलौकिकाचं मोरपंखी ‘कृष्णगान’ ओठावर असलं की हर एका उजेडाचा दीपोत्सव होतो व हर एका अंधाराची अष्टमीची रात्र….! कृष्णा संभाळ रे, संभाळ रे संभाळ अपुल्या गाई| आम्ही घरासी रे, घरासी रे घरासी जातो बाई| तुमची संगत रे संगत ... Read More »

मराठी नियतकालिकांची चैतन्यमय सृष्टी

– डॉ. सोमनाथ कोमरपंत त्या काळापासून आजमितीला जी नियतकालिके निर्माण झाली त्यांनी ज्ञानप्रसार, समाजप्रबोधन मोठ्या प्रमाणावर केले. त्या अनुषंगाने नीतिबोधाचे आणि मनोरंजनाचे कार्यही नेटाने केले. त्या प्रतिकूल राजकीय वातावरणात, साधनसामग्रीचा अभाव असताना ज्या प्रज्ञावंतांनी समाजमानसास प्रबुद्ध केले, राष्ट्रवादाची ऊर्मी निर्माण केली आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांत संचार करण्यासाठी स्फूर्ती दिली, यासाठी या नियतकालिकांचे आपण कायमचे ऋणी राहायला हवे. मराठी वाङ्‌मयाच्या अभिवृद्धीसाठी ... Read More »

‘जीएसटी’ ः एक पाऊल पुढे!

– शशांक मो. गुळगुळे गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेले व देशाच्या अप्रत्यक्ष कररचनेवर दूरगामी परिणाम करणारे वस्तू आणि सेवा विधेयक (जीएसटी) अखेर दहा वर्षांच्या संघर्षानंतर गेल्या बुधवारी राज्यसभेत मंजूर झाले. त्यामुळे ‘एक देश, एक कर’ या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. या विधेयकाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१७ पासून करण्याचा सरकारचा विचार आहे. या बहुचर्चित विधेयकाविषयी…. भारतीय नागरिकाला बर्‍याच प्रकारचे कर भरावे लागतात. ... Read More »

रवींद्रनाथांची कविता

– डॉ. सोमनाथ कोमरपंत आज ७ ऑगस्ट. रवींद्रनाथांची पुण्यतिथी. त्यांनी लौकिक जगाचा निरोप घेऊन ७५ वर्षे लोटली. परंतु त्यांचा कीर्तिसुगंध आजही दरवळत आहे. ते श्रेष्ठ भारतीय कवी होतेच; पण ते विश्‍वकवी म्हणूनही संबोधले जातात. सृजनशक्तीवर त्यांची अपार श्रद्धा. आपल्या कवितेमधून त्यांनी विश्‍वनिर्मितीच्या मूलबीजाचा शोध घेतला. जीवनाच्या चिरंतनत्वाचा शोध घेतला. जे जे मानवी आहे ते ते त्यांना मननीय वाटायचे. ऐंशी वर्षांचे ... Read More »