ब्रेकिंग न्यूज़

अंगण

वाचा बाधली नाही फळली!

विमलाबाई मुलखाची तोंडाळ व फटकळ म्हणून गावभर प्रसिद्ध होती. त्यामुळे तिच्या तोंडाला लागण्याची कुणाची शामत नव्हती. साहजिकच ती अधिकच चढेल बनली होती. घरात चोकरचाकर भरपूर असल्याने तिला इकडची काडी तिकडे करावी लागत नसे. त्यामुळे घराच्या व्हरांड्यातील सोप्यावर ऐसपैस बसून येणार्‍या-जाणार्‍यांना, विशेषतः स्त्रियांना, विनाकारण हटकून त्यांच्याशी मुद्दाम बोलणे उकरून काढून काहीतरी नाट लावणे म्हणजेच अपशकून करणे हा तिचा आवडता छंद होता. ... Read More »

पत्रलेखक रामदास लवंदे

गोव्याच्या राजधानीचं शहर पणजी येथील आत्माराम बोरकर रोडवरील एका बैठ्या घरात गेली कित्येक वर्षे राहणारे रामदास लवंदे यांच्या निधनाचा आज बारावा दिवस. रामदास लवंदे यांच्या वयाचं शतक अवघ्या पाच या संख्येनं हुकलं. त्यांच्या घरातल्या दिवाणखान्यातल्या खिडकीला गज नाहीत. त्यामुळे त्यांच्या घरावरून जाताना त्या खिडकीतून डोकावून पाहिलं तर रामदास यांचं दर्शन घडायचंच. अर्थात केवळ दर्शनानं भेट आटोपली असं सहसा व्हायचं नाही. ... Read More »

रोखीतल्या व्यवहारांवरील नियंत्रण फसले

रोखीतले व्यवहार कमी होणे देशाला आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यामुळे जनतेने हे सरकारचे काम आहे असा विचार न करता, प्रत्येकाने आपण रोखीतले व्यवहार कमीत कमी कसे करू याला प्राधान्य दिले पाहिजे. ——————————————- ——————————————- द्र सरकारला काळ्या पैशातील व्यवहारांवर चाप बसावा म्हणून रोखीतल्या व्यवहारांवर नियंत्रण हवे आहे. यासाठी ‘पेपरलेस सोसायटी’ ही संकल्पना पुढे आणली गेली. पण यात हवी तशी प्रगती साधता आलेली ... Read More »

चतुर

खूप तरतरीत, हुशार, खटपट्या, खट्याळ, कामसू, हरहुन्नरी, मेहनती आणि अखंड भ्रमंती असा सगळा चटपटीत मामला म्हणजे चतुर कीडा! चतुर हे त्याचं कागदोपत्री लागलेलं नाव म्हणूया. आपण कोकणात यांना ‘पतंग’ म्हणतो, ‘भिंगर्‍या’ म्हणतो, ‘भिरमुटल्या’ म्हणतो. गोव्यात ‘भिमुट्ट्यो’ म्हणतात. पाऊस ओसरतो. रानात न् शेताभातांत दसर्‍याचं सोनं पिकू लागतं आणि त्या सोनेरी गवतावर तांबड्या, पिवळ्या, काळ्या, सोनेरी भिंगर्‍या गिरक्या घेऊ लागतात. ‘गोल गोल ... Read More »

कनेरिया म्हणतोय ‘मी टू’

कनेरियापासून प्रेरणा घेत भारतीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आपण केलेली अक्षम्य चूक जगासमोर मान्य करून त्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी दाखवतील का हा प्रश्‍न मात्र अनुत्तरितच आहे. ————————— ————————— शात सध्या ‘मी टू’ नावाच्या वादळाने थैमान घातले आहे. अनेकांनी आपल्या भूतकाळातील अत्याचाराला वाचा फोडताना विविध क्षेत्रांतील बड्याबड्या धेंडांना उघडे पाडले आहे. क्रिकेटचे क्षेत्रदेखील याला अपवाद नाही. पाकिस्तानचा सर्वांत यशस्वी कसोटी ... Read More »

मिठाची झगमगती दुनिया…

मिठाच्या खाणीत आपण कुठल्या लेव्हलवर आहोत त्याचे बोर्ड लावलेले दिसतात. लाकडी लांबच्या लांब पॅसेज ओलांडून आपण दुसर्‍या दालनात पोचतो आणि समोरचे दृश्य पाहून अचंबित होतो. कारण समोर एक भव्य चॅपेल दिसतं. त्याचं नाव ‘चॅपेल ऑफ सेंट किंगा.’ खाली उतरायला दोन्ही बाजूंनी पायर्‍या आहेत. पायर्‍या प्रशस्त आहेत. खाली उतरत असतानाच दृष्टिपथात येतात ती कडेच्या भिंतीवरची कोरलेली भित्तीचित्रे. त्यात मुख्यत्वे करून येशूच्या ... Read More »

राशिभविष्य

मेष : भागीदारी व्यवसायात प्रगतीकारक घटना घडतील. कपडा, होजिअरी, ब्युटीपार्लर यातून ग्राहकांची गर्दी राहील. मित्रपरिवाराचे सहकार्य मध्यम राहील. खेळाडू, कोच, फिसिओ यांना अनुकूल काळ राहील. राजकीय क्षेत्रात विरोधक प्रबळ बनतील. हॉटेल, उपहारगृहे, खानावळ यांतून समाधानकारक काळ राहील. कारागिरी, सोने-चांदी व्यवहार वेग पकडतील. कार्यालयीन व्यवहारात कनिष्ठ वर्ग कर्मचार्‍यांशी मतभेद व आडमुठे धोरण जाणवून येईल. २१-२४ दरम्यान लांबचे प्रवास, व्यावसायिक भेटी यांची ... Read More »

निवडणूकसंग्राम सर्वच पक्षांसाठी आव्हानात्मक

लवकरच होऊ घातलेल्या पाच राज्यांमधल्या निवडणुकांचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. एकीकडे भाजप निवडणुकीची जोरदार तयारी करत असताना कॉंग्रेस मित्रपक्षांना बरोबर घेऊन या रणसंग्रामाला सामोरी जाईल, असं चित्र होतं; परंतु प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. मायावती, अखिलेश यांनी कॉंग्रेससोबत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात त्यामुळे भाजपनं ङ्गार खुशीची गाजरं मोडण्यात अर्थ नाही. या पक्षालाही निवडणूक सोपी नाही. —————————————————————— —————————————————————— ... Read More »

ऐकावे जनाचे करावे मनाचे

या कोपर्‍यात एक छानसे जाळे विणून त्यात अडकणार्‍या किटकांवर यथेच्छ ताव मारायचा असा विचार त्या कोळी किटकाने केला. जेमतेम अर्धेअधिक कोळिष्टक विणून झाले न झाले तोच एक मांजरी येऊन त्याला हसली. त्याने मांजरीला हसण्याचे कारण विचारताच ती म्हणाली, ‘‘बावळट आहेस, या घरात इतकी स्वच्छता असताना इथे कशाला कीटक येतील तुझ्या तावडीत सापडायला?’’ ते ऐकून कोळ्याने मोठाल्या खिडकीच्या कोपर्‍यात काम सुरू ... Read More »

शिकवण

कथा अलीकडचीच आहे. १२ वर्षांचा एक मुलगा होता. एक दिवस तो रस्त्यावर चेंडूने खेळत असताना तो चेंडू बाजूच्या एका दुकानाच्या काचेवर आदळला आणि काच फुटली. पळून जायची संधी होती, पण तो पळाला नाही. दुकानदाराने त्याला पकडलं आणि तो त्याच्याजवळ पैसे मागू लागला. त्या मुलाजवळ पैसे नव्हते. मग असं ठरलं की, चार दिवस त्या मुलाने दुकानाची साफसफाई करावी. मुलगा त्या गोष्टीला ... Read More »