ब्रेकिंग न्यूज़

अंगण

तेरना

– सौ. पौर्णिमा केरकर या गावाला अशी ही अध्यात्माची, प्रगल्भ वैचारिकतेची पार्श्‍वभूमी लाभलेली असतानाही एकविसाव्या शतकात त्याची होत असलेली अक्षम्य हेळसांड हृदयाला तीव्र ओरखडे काढते. हा प्रदेशच असा प्राचीन संस्कृतीने भरलेला, इतिहासाच्या प्रगल्भ खुणा मिरविणारा. पण या श्रीमंतीची जाणीव इथल्या लोकमनाला आहे की नाही ते कळत नाही. सगळी गावे माणसांनीच गजबजलेली असावीत हा अट्टहास कशासाठी? काही गावे अशीही असतात हजारो ... Read More »

अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करू शकणारे ‘एफआरडीआय’ विधेयक

– शशांक गुळगुळे हे विधेयक आर्थिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या बँका, विमा कंपन्या, रोखे बाजार कंपन्या, निवृत्तीवेतन कंपन्या या सर्वांना लागू होणार आहे. कोणत्याही उद्योगात थकबाकीचे प्रमाण भरमसाट वाढले तर त्याचा परिणाम त्या उद्योगाच्या नफ्यावर तर होतोच, शिवाय भांडवल, गंगाजळी संपून उद्योग पुढे चालू ठेवणे कठीण होते. बँकांची स्थिती सध्या अशीच आहे. त्यामुळे नव्याने निधी उभारणे, देणी देणे, प्रलंबित ठेवणे किंवा ... Read More »

फसवणूक

 सौ. प्रतिभा वासुदेव कारंजकर नाहीतरी आईला सर्वच पत्रिका पाहणार्‍यांनी आधी सूचना दिली होती की ‘तुमची फसवणूक व्हायची शक्यता आहे.’ मग ती फसवणूक अशी झाली तर त्यात फार काही कुठं मोठं बिघडलं? उलट त्यांचे सर्वांचे भविष्य बरोबरच ठरले, भविष्यातच तसे होते म्हणूनच तसे झाले. अमोल एक तिशी उलटून गेलेला सोफ्टवेअर इंजिनिअर. गोरा, हॅन्डसम दिसणारा. चांगल्या कंपनीत नोकरी. शहरात वास्तव्य. सतत परदेशी ... Read More »

ट्रम्प साहेब, जरा सबुरीने…!

– दत्ता भि. नाईक पश्‍चिम आशियामध्ये शांतता नांदली पाहिजे व ती सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेच्या पुढाकाराशिवाय नांदू शकत नाही. शांतता प्रक्रियेत अडथळा येईल असा धाडसाचा निर्णय घेणे त्यामुळेच वादग्रस्त ठरतो. शांतता प्रक्रियेत शेवटी घेण्याचा निर्णय सुरुवातीला घेतल्यामुळे खरी अडचण निर्माण झालेली आहे. ट्रम्पसाहेबांनी थोडे सबुरीने घेतले पाहिजे होते. जगाला पटणारे वा न पटणारे, शांततेचा मार्ग प्रशस्त करणारे असोत वा नसोत, परंतु ... Read More »

आरती प्रभूंच्या ‘काही कविता’

– डॉ. सोमनाथ कोमरपंत   याच पुस्तकात ‘जोगवा’ या आरती प्रभूंच्या पहिल्या कवितासंग्रहात समाविष्ट होऊ न शकलेल्या प्रकाशित- अप्रकाशित कविता आलेल्या आहेत. जया दडकर यांनी महत्प्रयासाने अनेक व्यक्ती आणि संस्था यांच्या सहकार्याने हा वाङ्‌मयीनदृष्ट्या मौलिक असलेला ठेवा उपलब्ध करून दिला आहे. या कवितांचा हा थोडक्यात रसास्वाद… नुकतेच ‘मौज प्रकाशन गृहा’ने प्रकाशित केलेले चिं. त्र्यं. खानोलकर (आरती प्रभू) यांचे ‘एक लघुकादंबरी ... Read More »

दशावतार परंपरेची विविध रूपे

– डॉ. पांडुरंग फळदेसाई गोव्यात आणि कोकणातील मंदिरांमधून जत्रा आणि उत्सवांचा हंगाम सुरू झाला म्हणजे लोकप्रिय अशा दशावतार लोकनाट्य सादरीकरणाचे वेध ग्रामीण नाट्यरसिकांना लागतात. या पुरातन अशा दशावतार संकल्पनेचा उगमापासूनचा वेध घेणारा हा अभ्यासपूर्ण आणि संग्राह्य लेख… दशावतार म्हणजे विष्णूचे दहा अवतार. मानवधर्माचे रक्षण करण्यासाठी विष्णू या दैवताने घेतलेली दहा रूपे. ही रूपे आपण साहित्य आणि विविधरंगी कलांच्या माध्यमातून अनुभवत ... Read More »

भग्नशिल्पे

– सौ. पौर्णिमा केरकर माणसांचे असे मनापासून सख्य जुळले की अनोळखी प्रदेशात जाण्याची भीती नाही वाटत. त्या-त्या माणसांमुळे तो-तो प्रदेश आपला वाटतो. सतत आठवत राहतो… मला वाटते मंदिराचे भग्न खांब, तुटलेल्या-फुटलेल्या मूर्ती, विखुरलेले शिलालेख… वैजनाथाला वरण्यासाठी तयार असलेल्या जोगाईची स्वप्ने अशीच भग्न झाली असतील का? ‘‘या ताई इकडं या, हे बगा इथं आमचे तैत्तीस कोटी देव आपल्या कुटुंबाला घेऊन आले ... Read More »

न भूतो ‘इफ्फी’

– बबन भगत यंदाच्या ‘इफ्फी’चे यश होते ते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या मास्टर क्लासेस, वेगवेगळे पॅनल डिस्कशन्स, ओपन फोरम आदीत. यंदा हे कार्यक्रम खर्‍या अर्थाने यशस्वी करून दाखवण्यात आले. अभिनयापासून ‘चित्रपटनिर्मिती कशी करावी’, ‘नवे तंत्रज्ञान सिनेमासाठी तारक की मारक’, ‘सिनेमाची कथा कशी फुलवावी’, ‘चित्रपटात ध्वनीचा परिणामकारकपणे कसा वापर करावा’, ‘ब्रिक्समधील चित्रपट’, ‘रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य आणि चित्रपट’, ‘चित्रपटातील व्यक्तिरेखा ... Read More »

दीर्घ पल्ल्याची प्रज्ञा लाभलेले डॉ. द. दि. पुंडे

– डॉ. सोमनाथ कोमरपंत मराठी भाषेच्या विविध अंगांकडे आणि वाङ्‌मयीन प्रवाहांकडे इतक्या आस्थेने, ममत्वाने आणि समरसतेने पाहणारा त्यांच्यासारखा मराठीचा प्राध्यापक आणि व्यासंगी समीक्षक आजमितीस आढळणे दुर्मीळच. मराठीच्या अभ्यासक्षेत्रात डॉ. द. दि. पुंडे यांनी आपली पृथगात्म मुद्रा उमटविली आहे. त्यांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू लाभलेले आहेत. मराठीचे ते नामवंत प्राध्यापक आहेत. श्रेष्ठ दर्जाची प्रज्ञा आणि प्रतिभा त्यांना लाभलेली आहे. मराठी भाषेच्या ... Read More »

महोत्सवी चित्रपट ः कसे वेगळे?

– हेमंत कर्णिक दरवर्षी ठराविक दिवसांत होणार्‍या या सांस्कृतिक उत्सवाबद्दल गोवेकरांचं काय म्हणणं आहे, माहीत नाही; पण असंख्य चित्रपटप्रेमींसाठी गोव्याला येऊन जगभरातून निवडलेले चित्रपट बघणे, हा एक एखाद्या तीर्थयात्रेसारखा धार्मिक अनुभव असतो. जे समाधान भाविकाला तीर्थयात्रा करून मिळतं, त्याच जातीचा आनंद सिनेप्रेमींना ‘इफ्फी’ला येऊन मिळत असतो. काही वर्षांपूर्वी निर्णय झाला आणि गोवा हे ‘इफ्फी’चं कायमचं ‘घर’ झालं. दरवर्षी ठराविक दिवसांत ... Read More »