ब्रेकिंग न्यूज़

अंगण

रुजवण

अश्‍विन मास प्रकटतो तोच मुळी नक्षत्रांची झिळमीळ घेऊन. निरभ्र, नीतळ आकाश मध्यरात्रीचे अनुभवावे. खाली जमिनीवर राहून जर वर नक्षत्रांचे लावण्य नजरेत साठवून घ्यायचे तर मग झाडांची नक्षीसुद्धा त्यावर कोरल्यासारखी दिसते. बदलणारा ऋतुचक्रातील महिना कोणताही असू दे, त्या-त्या मासाला वेढून राहिलेला, बदलत जाणारा सभोवताल त्याच्या अनुभूतीसकट स्वीकारण्याची एक धडपड चालू असते. प्रत्येक पुनव ही अशीच असते माझ्यासाठी. वरच्या गॅलरीत बसायचे. दूरपर्यंत ... Read More »

महिलांचा सन्मान हीच काळाची गरज!

‘मी टू’ मोहीम भारतात आता कुठे सुरू झाली आहे, मूळ धरू लागली आहे, रुजू लागली आहे. पण जगभरात ही मोहीम खूप आधी सुरू झाल्याने समाज याबाबत बराच जागरूक झाला आहे, असं मी म्हणेन. प्रत्यक्षात महिलांना अशा अत्याचारांना समोरं जावं लागणं हीच खूप दुर्देवी बाब आहे. एकीकडे आपण देवीची, शक्तीची पूजा करतो तर दुसरीकडे एका महिलेवर अत्याचार करतो. हे मानवजातीला अजिबात ... Read More »

अनहर्ड मेलडी

अन्नपूर्णा एक न सुटलेलं कोडं. एक न उकलणारं गूढ. आता तर त्या हे जग सोडून गेल्यामुळे हे कोडं न सुटताच राहिलं. संगीताच्या बाबतीत अन्नपूर्णा भाग्यवान. तिला उस्ताद अल्लाउद्दिनसारखे वडील व गुरू लाभले. बाबांचे अनेक वाद्यांवर अनन्यसाधारण प्रभुत्व होते. व्हायोलिन या वाद्याचा त्यांचा गुरू एक गोमंतकीय होता. पण सतार, सरोद व सूरबहार या वाद्यांची त्यांनी अनेकांना तालीम दिली. रविशंकर सतार, अलीअकबर ... Read More »

आनंदी-आनंद गडे!

शालेय जीवनातल्या कविता आठवण्याचा प्रयत्न केला तर सर्वप्रथम आठवतात त्या बालकवींच्या सुंदर नि सुकुमार कविता. इयत्ता पाचवीत असताना ‘बालभारती’ पाठ्यपुस्तकात त्यांची ‘श्रावणमास’ ही कविता होती. त्यानंतर दुसर्‍याच वर्षी त्यांची ‘आनंदी-आनंद गडे’ या शीर्षकाची कविता अभ्यासायला मिळाली. पुढे या दोन्ही कविता कुठल्या ना कुठल्या तरी पाठ्यपुस्तकातून ‘भेटत’ राहिल्या. ‘आनंदी-आनंद’ हे बालकवींचे एक अमर काव्यपुष्प. अमृतघट भरले तुझ्या दारी, का वणवण फिरशी ... Read More »

शिकविले ज्यांनी…

छत्तीस वर्षांपूर्वीचा काळ… १९८२ सालातील मे महिन्याचे दिवस… पुणे विद्यापीठाच्या क्रमांक पाचच्या वसतिगृहात दीड महिने पीएच.डी.च्या अभ्यासासाठी मी जाऊन राहिलो… तेथील अल्प वास्तव्य आनंदात गेले. ऐन उन्हाळ्याचे दिवस असून दुपार जर सोडली तर सकाळची आणि संध्याकाळची वेळ आल्हाददायी वाटायची. याचे कारण तेथील रमणीय परिसर… बोगनवेलाच्या विविध छटा असलेला भव्य आसमंत… पिवळ्या आणि लालबुंद फुलांनी डंवरलेली गुलमोहराची झाडे. अधूनमधून आढळणारे उंच ... Read More »

बोलणं आणि सल्ले

शब्द बापुडे केवळ वारा’ असं कोण्या कवीने म्हटले आहे. पण ‘वारा’ म्हणून शब्द वार्‍यावर उधळायचे नसतात, याचं थोड्या लोकांना भान किंवा ज्ञान नसतं. तोंडाला येईल ते बोलावं असाच त्यांचा खाक्या असतो. असंबद्ध, तिरकस बोलून आपलं शहाणपण उधळण्यात त्यांना धन्यता वाटते. काहीजणांना तर ‘असं कर’, ‘असं करू नकोस’ असे फुकटचे सल्ले देणं आवडतं. आपण कुठं जायला बाहेर पडल्यावर वाटेत कोणीतरी ओळखीचा ... Read More »

बोलकी घरं!

नेहमी बसमधून मडगावला जाताना वेर्णा ते नुवे या भागात रस्त्याच्या दुतर्फा पोर्तुगीजकालीन बांधणीची छान लहान-मोठी घरं दिसतात. एखादं छान-सुबक घर दिसलं की वाटतं, आपलं पण असंच एक सुंदर घर असावं! …आणि मग मनामध्ये नाना प्रकारचे विचार येतात. खरंच सुंदर घर आहे, पण या घरातील माणसं सुखी-समाधानी-आनंदी असतील का? एखाद्या घराच्या व्हरांड्यामध्ये एखादा वृद्ध एकटाच बसलेला असतो. त्याला पाहून वाटतं याची ... Read More »

म्हापशातील ‘आल्तिनो पठार’ आणि राजकारणी

म्हापसानगरीतील ‘काम्र म्युनिसिपाल-दे-बार्देस’ इमारतीच्या उतरंडीवरून खाली जाणार्‍या रस्त्याच्या समोर असलेल्या ‘फार्मासिअ जुआंव-दे-मिनेझिस’ या औषधालयाच्या चौकाजवळून तळीवाडा ते ‘जार्दीन म्युनिसिपाल’पर्यंत (डॉ. राममनोहर लोहिया उद्यानापर्यंत) जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा असलेली वस्ती आणि श्रीलक्ष्मीनारायण मंदिराच्या उत्तरेकडील वस्ती यांचा समावेश ‘फेअर बायश’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या वाड्यात होतो. पोर्तुगीज भाषेत ‘बायश’ म्हणजे ‘खालचा.’ सदर ‘फेअर बायश’वाडा खालच्या भागात असल्यामुळे त्या भागाला हे नाव देण्यात आले ... Read More »

कंटाळा

ज सकाळी उठले आणि लक्षात आलं, वर्ष संपायला जेमतेम अडीच महिने राहिलेत… काय केलं एवढ्या दिवसांत? फक्त धावपळ. दिवसभर डोक्यात हजार कामं, प्रश्‍न… आणि त्यातच गुरफटलेला जीव. न उरकलेल्या कामांचा आणि त्यामुळे आलेल्या ताणाचा बोजा वाढतोय दिवसेंदिवस. खूप दिवसांनंतर आज मैत्रिणीशी बोलले फोनवर. आपल्या प्रश्‍नांची उत्तरं दुसर्‍या कुणाकडून मिळत नसतात, ती आपली आपणच शोधायची असतात, हे कळूनही आता अनेक वर्षं ... Read More »

(अ)यशस्वी

‘‘मी अगोदर सांगितल्या निकषानुसार गोव्यात कोठेही कोळीनृत्य हा प्रकार होत असलेला मला दाखवण्यात आला तर आयुष्यात पुढे कधीही सही करण्यापुरतेही पेन वापरणार नाही.’’ कणभर शांतता. विषय बदलला गेला. आमच्या उपाध्यक्षांच्या मते मी माननीय सदस्यांचा अपमान केला. ———————————— ———————————— भारतीय परंपरेत ‘गुरू-शिष्य’ हे सर्वात श्रेष्ठ नाते. शिकवतो त्याला शिक्षक म्हणायचं. गुरू शिकवत नसावा. गुरूची व्याख्या ‘गिरति शिष्याणाम् अज्ञानम् गुरुः’ अशी केली. ... Read More »