अग्रलेख

शरणागती नको

राज्यातील पर्यटक टॅक्सीचालकांनी पुन्हा एकवार संपाचे हत्यार उगारले. संघटितपणाच्या जोरावर आणि आपल्या राजकीय आश्रयदात्यांच्या पाठबळावर वर्षानुवर्षे ते सरकारला नमवीत आले. आम्ही टॅक्सीला मीटर लावणार नाही. मनमानीपणे भाडे आकारू, हॉटेलमधील पर्यटकांना आपल्या टॅक्सीव्यतिरिक्त अन्य वाहनांतून प्रवास करू देणार नाही अशी दंडेली करीत आले. राजकारण्यांचा त्यांना आश्रय असल्याने सरकारही त्यांच्याप्रती नेहमीच मवाळ भूमिका स्वीकारीत आले आहे. यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. संपकरी ... Read More »

घोडचूक

शैक्षणिक माध्यम प्रश्नावरील आपल्या अल्पसंख्यकांभिमुख धोरणामुळे सध्या देशी भाषाप्रेमींच्या रोषाचे लक्ष्य ठरलेल्या भारतीय जनता पक्षाने ‘आक्रमकता हाच सर्वोत्तम बचाव’ या धोरणाने भाभासुमंवर जोरदार प्रतिहल्ले चढवायला सुरूवात केली. मात्र, पक्षाची ही निर्वाणीची रणनीती पुरती अंगलट आलेली दिसते. भाभासुमंचे समन्वयक व गोव्याचे संघचालक सुभाष वेलिंगकर आणि मंचाचे नेते पुंडलिक नाईक या दोघांवर ज्या प्रकारे व्यक्तिगत स्वरूपाचे हल्ले चढवले गेले, त्यातून त्या दोघांच्या ... Read More »

बेफिकिरीचे बळी

केरळमधील कोळ्ळम् जवळच्या परवूर येथील पुट्टिंगलदेवी मंदिरात मीन भरणी उत्सवाच्या सांगतेवेळच्या आतषबाजी स्पर्धेवेळी झालेल्या दुर्घटनेची भीषणता एव्हाना देशाला कळून चुकली आहे. शंभराहून अधिक भाविक मृत्युमुखी पडले आहेत आणि तीनशेहून अधिक जखमी झाले आहेत. आतषबाजीसाठी साठवलेल्या स्फोटकांच्या गोदामात ठिणगी उडाली आणि परिणामी मोठमोठे स्फोट होत आजूबाजूच्या बघ्यांच्या गर्दीला आगीने लपेटले असे एकंदर घटनाक्रमातून स्पष्ट झाले आहे. झालेल्या प्रचंड स्फोटामध्ये आजूबाजूच्या इमारतींचे ... Read More »

श्रीनगरचा वणवा

पुण्याची एफटीआयआय, हैदराबादचे केंद्रीय विद्यापीठ, दिल्लीची जेनयू, प. बंगालचे जाधवपूर विद्यापीठ, पुण्याचे फर्गसन आणि आता श्रीनगरमधील एनआयटी. विद्यार्थ्यांमधील संघर्षाने या शिक्षणसंस्थांची आवारे खदखदत राहिली आहेत. कारणे वेगवेगळी आहेत, परंतु या सगळ्या संघर्षाचे अंतर्स्वरूप विरुद्ध विचारधारांतील द्वंद्व असेच आहे. श्रीनगर एनआयटीमध्ये जवळजवळ ऐंशी टक्के विद्यार्थी जम्मू परिसरातील किंवा इतर राज्यांतील आहेत. फुटीर विचारसरणीच्या काही काश्मिरी विद्यार्थ्यांनी टी२० सामन्यातील भारताच्या पराभवाचे निमित्त ... Read More »

नवसंकल्प

‘शिवधनुष्य पेलताना’ या शीर्षकाखाली अग्रलेख लिहून नवप्रभेच्या संपादकपदाची सूत्रे स्वीकारली होती, त्याला आज गुढीपाडव्याला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने गेल्या आठ वर्षांतील संपादकीय वाटचालीचे थोडेसे सिंहावलोकन करायला आणि भविष्याचा वेध घ्यायला हरकत नसावी. या आठ वर्षांत नवप्रभेचे अंतरंग आणि बाह्यांग कसकसे बदलले त्याचे आपण सगळे साक्षीदार आहातच. बदललेली मांडणी, वाढलेली पाने, ‘अंगण’, ‘आयुष’, ‘कुटुंब’सारख्या अत्यंत यशस्वी ठरलेल्या पुरवण्या, ... Read More »

हातघाईची लढाई

शैक्षणिक माध्यम प्रश्नावरून भारतीय जनता पक्ष आणि भारतीय भाषा सुरक्षा मंच यांच्यात गेला बराच काळ सुरू असलेल्या संघर्षात भाजपाकडून आजवर बचावात्मक पवित्राच स्वीकारला गेला होता. मात्र, खासदार नरेंद्र सावईकर यांनी काल पत्रकार परिषदेत श्री. सुभाष वेलिंगकर यांच्यावर केलेली घणाघाती टीका पाहता, भाजपा आता माध्यम प्रश्नाला अत्यंत आक्रमक पद्धतीने भिडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता प्रत्यक्ष हातघाईची लढाई सुरू झाली आहे. ... Read More »

जीवन सुंदर आहे

करमळीतील अल्पवयीन मुला – मुलीने ‘प्रेम प्रकरणा’ तून आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची ह्रदयद्रावक घटना नुकतीच घडली. प्रेम म्हणजे काय हे न कळण्याच्या वयातील मुलांनी उचललेले हे टोकाचे पाऊल आजच्या एकूणच समाजस्थितीवर बोट ठेवते आहे. असे या मुलांच्या आयुष्यात काय घडले की त्यांना आपले उमलते आयुष्य एका क्षणात चुरगाळून फेकून द्यावेसे वाटावे? आपल्या घरच्यांची, कुटुंबियांची यत्किंचित पर्वा न करता हे जग सोडून ... Read More »

कांगारूंची विश्‍वचषक विजयपंचमी

ट्रान्स-तास्मान प्रतिस्पर्धी तथा सहयजमान न्युझीलँडवर अंतिम फेरीत लीलया मात करीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा प्रतिष्ठेच्या आयसीसी विश्‍वचषकावर पाचव्यांदा नाव कोरले. याआधी १९९२मध्ये ऑस्ट्रेलियाने विश्‍वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषविले होते, पण उपांत्य फेरीत गाठण्यातही यश आले नव्हते. तथापि, गेल्या काही वर्षांत विलक्षण सर्वंकष प्रगती साधलेल्या ऑसिसने २३ वर्षांनंतर मेलबर्न क्रिकेट मैदानावरील अंतिम मुकाबल्यात स्वशौकिनांच्यासाक्षीत विश्‍वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. श्रीलंका (१९९६) आणि भारत (२०११) ... Read More »

खरा चेहरा

आम आदमी पक्षाच्या बहुचर्चित राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीतून आणि कार्यकारिणीतूनही अखेर प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची अत्यंत अपमानास्पदरीत्या हकालपट्टी झाली. आपल्याला पक्षाच्या राजकीय सल्लागार समितीतून बाहेर काढण्यात आले, तरी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्याला दिल्लीबाहेरच्या आप नेत्यांचे समर्थन मिळेल या आशेवर राहिलेल्या या दोन्ही नेत्यांचा पुरता भ्रमनिरास तर झालाच, शिवाय कथित हाणामारीलाही सामोरे जावे लागले. राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत ... Read More »

कॅसिनोंची कीड

राज्याच्या विधानसभा अधिवेशनात अपक्ष आमदार रोहन खंवटे आणि विजय सरदेसाई यांनी आक्रमक विरोधकाची भूमिका बजावत सरकारला वेळोवेळी कात्रीत पकडले. कॅसिनोच्या प्रश्नावर त्यांनी सरकारला मांडवी नदीतील चारही कॅसिनो अन्यत्र हटवण्याचे आश्वासन देण्यास भाग पाडले. या चारही कॅसिनोंचे परवाने या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या काळात संपुष्टात येत आहेत. त्यानंतर त्यांना मुदतवाढ दिली जाणार नाही किंवा नव्या कॅसिनोंना परवानेही दिले जाणार नाहीत ... Read More »