अग्रलेख

अखेर ताळ्यावर

पणजी महापालिका क्षेत्रातील अठरा ठिकाणी लवकरच ‘पे पार्किंग’ सुरू होत आहे. यापूर्वी अशा प्रकारचे ‘पे पार्किंग’ केवळ ईडीसी पाटो प्लाझा परिसरात सुरू होते आणि ते यशस्वीही ठरले आहे. मात्र, अन्य अठरा ठिकाणी त्याची कार्यवाही करताना मनमानीपणे प्रचंड शुल्कवाढ करण्याचा जो घाट महापालिकेतील सत्ताधारी गटाने घातला होता, तो जनतेच्या प्रखर विरोधामुळे बासनात गुंडाळावा लागला आहे. नवप्रभेने या विषयावर अग्रलेखातून घणाघात केला ... Read More »

म्हादईला न्याय हवा

म्हादई जललवादापुढे आपला पराभव स्पष्ट दिसू लागताच कर्नाटकने या वादाच्या लवादबाह्य सोडवणुकीचा आग्रह धरला होता. त्यासाठी कर्नाटकच्या सर्वपक्षीय नेत्यांनी मागे पंतप्रधानांना साकडे घातले होते. परंतु लवादबाह्य सोडवणूक हवी असेल तर त्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तिन्ही राज्यांच्या नेत्यांची सहमती आवश्यक असेल असे पंतप्रधानांनी त्यांना सुनावताच ही मंडळी ताळ्यावर आली होती. त्यानंतर कर्नाटकने शेतकर्‍यांची ढाल पुढे केली. उग्र आंदोलन करून ... Read More »

दगडावरची रेघ?

माध्यम प्रश्नावर जो अंगावर येईल त्याला शिंगावर घेण्याचे आक्रमक धोरण सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आता अवलंबिलेले दिसते. मांद्रे येथील भाभासुमंच्या भरगच्च सभेने भांबावलेल्या भाजपचा दिल्लीश्वरांचा मस्तकाशीर्वाद मिळताच जिवात जीव आला. ‘भाभासुमं धार्मिक ध्रुवीकरण करू पाहात असून राज्यातील धार्मिक सलोख्यासाठी इंग्रजी प्राथमिक शाळांचे अनुदान सुरू ठेवावे लागेल’ असा नवा युक्तिवाद त्यांनी पुढे आणला आहे. पण ज्या वेळी भाजप सरकारकडून केवळ चर्चप्रणित ... Read More »

निष्फळ गुर्‍हाळ

जोवर पाकिस्तान भारतासंदर्भातील आपली दुटप्पी नीती सोडत नाही, तोवर त्या देशासमवेत चर्चेची गुर्‍हाळे घालण्यात काहीही अर्थ नाही हे वारंवार सिद्ध होत आले. काल भारत आणि पाकिस्तानच्या विदेश सचिवांदरम्यान  ‘हार्ट ऑफ एशिया’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर जी औपचारिक बैठक झाली, त्यातही वेगळे काही घडले नाही. पाकिस्तानने तेथे ‘काश्मीर’चा राग आळवला आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार आणि काश्मिरी जनतेच्या इच्छेनुरूप ‘न्याय्य तोडगा’ काढावा ... Read More »

प्रश्न लोकशाहीचा

उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमधील कॉंग्रेसची सरकारे अस्थिर केल्याचा आरोप करून काल संसदेत विरोधकांनी गदारोळ माजवला. या दोन्ही राज्यांतील घडामोडींचे पडसाद संसदेत उमटणे अपरिहार्य होते आणि त्याप्रमाणे काल तसे ते उमटले देखील. उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट रद्दबातल करून तेथील हरिश रावत सरकारला विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करायला लावणारा उच्च न्यायालयाचा आदेश ही निश्‍चितच केंद्र सरकारला मोठी चपराक होती. सर्वोच्च न्यायालयाने त्या आदेशाला ... Read More »

मुजोरी व मनमानी

राजधानी पणजीमध्ये ‘पे – पार्किंग’ लागू करताना जी प्रचंड शुल्कवाढ विद्यमान पालिका मंडळाने केलेली आहे, ती नागरिकांच्या खिशाला फार मोठी कात्री लावणारी आहे. चार चाकी वाहनांसाठी पहिल्या तासाला वीस रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक तासाला वीस रुपये असा हा दर म्हणजे अतिरेकीपणाचा अजब नमुनाच आहे. पणजीसारख्या पार्किंग समस्येने ग्रासलेल्या शहरात ‘पे पार्किंग’द्वारेच सध्याच्या परिस्थितीवर मात करता येऊ शकते याविषयी कोणाचेही दुमत ... Read More »

शहाणे व्हा

शैक्षणिक माध्यम अनुदान प्रश्नी भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि सत्ताधारी भाजपा सरकार यांच्यातील संघर्षाला पुन्हा तोंड फुटले आहे. येत्या रविवारी मांद्रे मतदारसंघातून भाभासुमं आपले रणशिंग फुंकणार आहे. भाजपाने इंग्रजी प्राथमिक शाळांचे शैक्षणिक अनुदान सुरू ठेवून देशी भाषांशी प्रतारणा केल्याची घणाघाती टीका भाभासुमंने चालविल्याने सरकार खडबडून जागे झालेले दिसते. आम्हीही मातृभाषाप्रेमी आहोत आणि देशी भाषांपासून आम्ही दूर गेलेलो नाहीत  हे जनतेच्या ... Read More »

आणखी किती बळी?

गोव्यात गेले काही दिवस सुरू असलेले अपघातांचे सत्र थरकाप उडवणारे आहे. या राज्यात वाहतूक व्यवस्था म्हणून काही अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करणार्‍या या दुर्घटना आहेत. एकीकडे वाहतूक पोलीस ‘तालांव’ देण्यात मग्न, तर दुसरीकडे राज्यात अपघातांमध्ये लागोपाठ मानवी बळी जात आहेत. हे दुर्घटनासत्र किती काळ असेच चालणार आहे? परवा तिळामळ – केपे येथे खनिजवाहू ट्रकने धडक दिल्याने सासू ... Read More »

दोषी कोण?

विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी झाले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांना ते जे नऊ हजार कोटींचे देणे लागतात, त्यापैकी आयडीबीआयने दिलेल्या ९५० कोटींच्या कर्जातून विदेशात मालमत्ता खरेदी केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने हा आदेश दिला आहे. म्हणजे हिमनगाचे हे केवळ टोक आहे. ही तर केवळ सुरूवात आहे. स्वतः मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये दडून बसले आहेत. आपण फरारी झालेलो नाही व पुन्हा ... Read More »

बेंगलुरूचा दणका

बेंगलुरूमधील कापड उद्योगातील कामगारांनी दिलेल्या तडाख्याने हादरलेल्या सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबाबतचा आपला आततायीपणाचा निर्णय अखेर तीन महिन्यांसाठी का होईना, लांबणीवर टाकला. गेले काही दिवस कामगार संघटनांनी हा विषय ऐरणीवर आणला होताच, परंतु बेंगलुरूमधील कापड उद्योगातील कामगार उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले आणि पोलिसांनी दडपशाही चालवताच त्यांच्या संतापाचा उद्रेक होऊन दंगल उसळली. केंद्रीय मजूर मंत्री बंडारू दत्तात्रेय यांना त्यांच्याच राज्यातील कामगारांनी दिलेल्या ... Read More »