ब्रेकिंग न्यूज़

अग्रलेख

प्रतिमेस धक्का

महाराष्ट्र विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारने काल विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने जिंकला. मात्र त्यासाठी ज्या हिकमती लढवल्या त्या पक्षाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला कलंकित करणार्‍या आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागते. सदनातील आपली सदस्यसंख्या केवळ १२१ असताना कोणाच्या पाठिंब्याच्या बळावर हे बहुमत प्राप्त केले, हे गुलदस्त्यात ठेवण्यात भाजपाने आवाजी मतदानाची क्लृप्ती वापरून यश मिळवले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या ... Read More »

पोरखेळ पुरे

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा देण्या – न देण्याबाबतची शिवसेनेचा संभ्रमित स्थिती आता केविलवाण्या पातळीवर येऊन पोहोचली आहे. एकीकडे विरोधी पक्षनेतेपदाच्या जागेसाठी केलेला अर्ज आणि तरीही दुसरीकडे भाजपने आपल्याला सत्तेत सामील करून घ्यावे ही आडून आडून सुचवली जाणारी इच्छा यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय हेच आता कळेनासे झाले आहे. भारतीय जनता पक्षाने सेनेची जी काही स्थिती करून ठेवली आहे, ... Read More »

आव्हान पेलताना

गोव्याच्या राजकीय क्षितिजावरून मनोहर पर्रीकर हे वादळी व्यक्तिमत्त्व तूर्त तरी नजरेआड झाले आहे आणि आता ती महाकाय पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान नवे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पेलावे लागणार आहे. पार्सेकर हेही एक अनुभवी व ज्येष्ठ नेते आहेत. राजकारणातील खाचखळगे त्यांनाही ठाऊक आहेत. त्यामुळे विद्यमान राजकीय परिस्थितीचे पूर्ण भान त्यांना आहे. त्यामुळे हे भान कायम राखत आणि सर्वांना एकत्र ठेवून, ... Read More »

देशसेवेची सुवर्णसंधी

देशाचे नवे संरक्षणमंत्री म्हणून गोव्याचे सुपुत्र व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल शपथ घेतली. समस्त गोमंतकीयांसाठी हा अत्यंत अभिमानास्पद असा क्षण आहे. स्वतः पंतप्रधानांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी निमंत्रित करणे ही निश्‍चितपणे सन्मानजनक बाब आहे. स्वतः विशेष उत्सुक नसतानाही केवळ देशहित नजरेपुढे ठेवून पर्रीकर यांनी हे नवे आव्हान स्वीकारले आहे. संरक्षणमंत्रिपद या नात्याने, देशाचा कारभार हाकणार्‍या सर्वोच्च पाच ... Read More »

विशेष संपादकीय – तळागाळातला नेता

गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांची अखेर निवड झाली आणि पर्रीकरांनंतर कोण या प्रश्नावरून राज्यात निर्माण झालेले वादळ शमले. पर्रीकरांना जेव्हा केंद्रात मंत्रिपदाचे निमंत्रण आकस्मिकरीत्या आले, तेव्हा राज्यात निर्माण झालेली पोकळी भरून कोण काढणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच मुशीत तयार झालेला सक्षम नेता मुख्यमंत्रिपदावर असायला हवा याबाबत पक्षाचे ... Read More »

नवा नेता कोण

गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा काल होऊ शकली नाही. ती आज होणे आवश्यक आहे. हा एक दिवसाचा विलंब पक्षामध्ये त्याबाबत दुमत आहे ही बाब अधोरेखित करतो. फ्रान्सिस डिसोझा यांनी काल गोव्यात परतताच आपली उमेदवारी जाहीर करून बंडाचा झेंडा रोवला आणि काही आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याचेही स्पष्ट झाले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांशी काल स्वतंत्रपणे चर्चा केली, त्याचा अर्थ आपला ... Read More »

हिमालयाची हाक

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशासंबंधीच्या वार्ता आणि वदंता पुन्हा एकवार रुंजी घालू लागल्या आहेत. खाली आग असल्याविना कधी वर धूर येत नसतो, त्यामुळे पर्रीकरांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबत भाजप व संघामधील काही ज्येष्ठ मंडळी गेल्या बर्‍याच काळापासून आग्रही आहेत ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे. फक्त हा प्रस्ताव स्वीकारावा की नाही याचे निर्णयस्वातंत्र्य खुद्द पर्रीकर यांच्यापाशी आहे. त्यामुळे ... Read More »

लक्ष काश्मीरकडे

जम्मू आणि काश्मीरला आता निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. पुराने वाताहत झालेले श्रीनगर आणि काश्मीर खोरे आता सावरले आहे आणि पुन्हा उभे राहू लागले आहे. पूरग्रस्त काश्मीरवासीयांना केंद्र शासनाने घसघशीत मदत केली. लष्कराने त्यांचा जीव वाचवला. त्यामुळे या सार्‍या मदतकार्याचा फायदा आपल्याला मिळेल या अपेक्षेत भारतीय जनता पक्षानेही काश्मीरच्या निवडणुकीत झोकून दिले आहे असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूरग्रस्त काश्मीरला ... Read More »

फोफावती विषवल्ली

आयएसआयएसला सामील होण्याच्या इराद्याने सौदी अरेबियामार्गे इराकला जाऊ पाहणार्‍या एका सॉफ्टवेअर अभियंत्याला नुकतीच अटक झाली आणि नंतर त्याला समज देऊन सोडून देण्यात आले. ‘गुगल’सारख्या महत्त्वपूर्ण सॉफ्टवेअर कंपनीचा तो कर्मचारी होता. जिहादी दहशतवादाची पाळेमुळे कुठवर रुजत चालली आहेत याचा हा धक्कादायक दाखला आहे. अशा प्रकारचा उच्चशिक्षित तरूण अशा गोष्टींत अडकण्याची ही काही पहिलीच घटना नव्हे. आजवर असे अनेक उच्चशिक्षित तरूण जिहादी ... Read More »

काटकसरीचा मंत्र

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काटकसरीचा मंत्र आपल्या सरकारला दिला आहे. पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती कडाडू लागल्या होत्या, तेव्हा डॉ. सिंग यांनी अशीच हाक आपल्या मंत्रिमंडळ सहकार्‍यांना आणि नोकरशहांना दिली होती, परंतु त्याला वाटाण्याच्या अक्षताच लावल्या गेल्या. आता मोदी सरकारच्या अर्थ मंंत्रालयाने अशाच अनेक सूचना मंत्री आणि नोकरशहांना केलेल्या आहेत. पहिल्या वर्गातून विमान प्रवास ... Read More »