अग्रलेख

गोव्याची बदनामी

नुकतेच पर्दाफाश झालेले आंतरराज्य वेश्याव्यवसायाचे रॅकेट हे गोव्यात अलीकडे रुजत चाललेल्या उच्छृंखलतेच्या विषवल्लीचे आणखी एक पान आहे. सातत्याने उजेडात येत असलेल्या अशा प्रकरणांतून गोव्याची बदनामी होत असूनही त्याची खंत वा खेद राज्यकर्त्यांना दिसत नाही ही शोकांतिका आहे. एकेकाळी गोव्याच्या गालावर बायणाचा कलंक होता. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी निधडेपणाने ती वस्ती उद्ध्वस्त करून तो कलंक कायमचा पुसून टाकला. पण त्यावरही ... Read More »

मोदींचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सध्याच्या पाच देशांच्या दौर्‍यामागे मुख्य उद्देश आहे तो अणू पुरवठादार गटामध्ये (न्युक्लिअर सब्स्क्रायबर्स ग्रुप किंवा एनएसजी) भारताला प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यातील सदस्य देशांचा पाठिंबा मिळविण्याचा. पाचपैकी तीन देश एनएसजीचे सदस्य आहेत आणि स्वित्झर्लंडने भारताच्या मागणीला पाठिंबा देऊन टाकला आहे. त्यानंतर मोदींचे पाऊल पडले ते अमेरिकेत. आपल्या ‘मित्रवर्य’ ओबामांसमवेत त्यांनी जी चर्चा केली, त्यातून अमेरिका भारताच्या प्रवेशाला ... Read More »

बस चुकेल

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गोवा येत्या काही वर्षांत सध्या या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या दाक्षिणात्य राज्यांना मागे टाकील असा विश्वास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नुकताच ‘आयटी हब’च्या उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केला. त्यांचे हे विधान आकर्षक असले, तरी ते प्रत्यक्षात येण्याएवढी गती आणि प्रगती कोठेच आजवर तरी दिसलेली नाही ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावीच लागेल. अत्यंत कूर्मगतीने सगळे काही चालले आहे. गोव्याला माहिती ... Read More »

गडकरींचे स्वप्न

गोव्याशी काही नाते नसूनही गोव्याविषयी आस्था आणि ममत्व बाळगणारे केंद्रीय मंत्री म्हणजे नितीन गडकरी. या वर्षाच्या प्रारंभीच त्यांनी गोव्यासाठी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. आपल्या ताज्या गोवा भेटीत त्यांनी पुन्हा एकवार गोव्याच्या प्रगतीला पूरक ठरतील अशा काही योजना सादर केल्या आहेत. मुरगाव आणि पणजी बंदरांचा विकास करण्याबरोबरच बेतूल येथे नवे बंदर उभारण्याचा आणि त्यात राज्य सरकारला भागीदारी देण्याचा ... Read More »

रामपाल ते रामवृक्ष

मथुरेच्या जवाहरबाग प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जुन्या दिल्ली – आगरा महामार्गावरील या २८० एकरांच्या बड्या सरकारी भूखंडावर सत्याग्रहाच्या मिशाने तब्बल दोन वर्षे अतिक्रमण होऊनही प्रशासन गप्प कसे व का राहिले हा मूलभूत प्रश्न. दोन दिवसांच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने रामवृक्ष यादव आणि त्याचे साथीदार या जवाहरबागेत घुसले आणि त्यांनी तेथे दोन वर्षांत आपले साम्राज्य उभे केले. या मंडळींना वीज कशी ... Read More »

लज्जास्पद

राज्यसभेच्या निवडणुकीत विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने मत देण्यासाठी सरळसरळ कोट्यवधी रुपयांची लाच मागणार्‍या कर्नाटकच्या आमदारांनी देशाची मान शरमेने खाली झुकवली आहे. राज्यसभेसारख्या सर्वोच्च संसदीय व्यवस्थेमध्ये प्रवेश करण्यासाठी जर असा पैशाचा बाजार मांडला जात असेल, तर त्यासारखी खेदजनक बाब दुसरी नसेल. इंडिया टुडेच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये जे समोर आले ते लज्जास्पद आहे, परंतु धक्कादायक मात्र नाही, कारण अशा धक्क्यांची देशाला एव्हाना सवय झाली ... Read More »

राहुलचा राज्याभिषेक

बुडत्या जहाजासारखा गेली काही वर्षे भरकटत चाललेल्या कॉंग्रेस पक्षाचे कप्तानपद आता राहुल गांधी यांच्याकडेच सुपुर्द करावे असा आग्रह दरबारी मंडळींनी धरला आहे. गेली काही वर्षे राहुल यांच्या गळ्यात पक्षाध्यक्षपदाची माळ घालण्याची सर्व सज्जता होऊनही निवडणुकांतील सततच्या अपयशामुळे ती घटिका पुढे पुढे चालली होती. परंतु आता एकदाचे होऊन जाऊद्या अशा निर्धाराने मंडळी पुन्हा राहुल यांच्या राज्याभिषेकासाठी सज्ज झाली आहेत. एकीकडे सोनिया ... Read More »

‘दुहेरी’ तिढा

गोव्यातील दुहेरी नागरिकत्वाच्या विषयावर खास अधिकारिणी स्थापन करण्याचे आश्वासन नुकतेच देऊन गेलेल केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू आणि गृहमंत्रालयाने गेल्या वर्षी नेमलेल्या बी. के. प्रसाद समितीने नुकताच दिलेला अहवाल यात सुस्पष्ट विसंगती दिसते. त्यामुळे हा विषय कायमचा सोडवण्याचे जे वायदे आजवर गोमंतकीय ख्रिस्ती जनतेला केले गेले होते, त्याचे काय हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये दिल्लीत झालेल्या कायदा ... Read More »

आरोग्य विम्याकडे

गेली चार वर्षे होणार, होणार म्हणून गाजावाजा होत असलेल्या दीनदयाळ आरोग्य विमा योजनेचे घोडे अखेर गंगेत न्हाले. गोमंतकीय जनतेला आरोग्यविम्याचे संरक्षक कवच पुरविणार्‍या या योजनेची नागरिकांना दीर्घकाळ प्रतीक्षा होती. खरे तर मागील दिगंबर कामत सरकारने अशा प्रकारची राज्यातील सर्व नागरिकांना सामावून घेणारी सुवर्णजयंती आरोग्यविमा योजना घोषित केली होती. परंतु त्याखाली केवळ साठ हजार रुपयांपर्यंतचे नाममात्र विमा संरक्षण कवच दिले जाणार ... Read More »

सभेचा संदेश

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या परवाच्या सभेला मोठी गर्दी दिसली. कर्नाटकातून मोठ्या संख्येने लोक आले होते असेही दिसले. त्यामुळे केवळ सभेला जमलेल्या गर्दीवरून या नवख्या पक्षाला गोव्यात सत्तापरिवर्तन घडवण्याएवढा जनाधार मिळाला आहे असे मानता येत नाही, तरी नीट संघटनात्मक बांधणी झाली, विविध सामाजिक विषयांना पक्ष व्यवस्थित भिडला, तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला एक नवे आव्हान ‘आप’ निर्माण करू ... Read More »