ब्रेकिंग न्यूज़

अग्रलेख

विशेष संपादकीय – पेराल तेच उगवेल

तेहरिक ई तालिबानने काल पाकिस्तानात मानवतेला लाजवणारे कृत्य केले. ज्यांचा कोणताही गुन्हा नाही अशा निष्पाप, निरागस मुलांच्या रक्ताचा सडा या दहशतवाद्यांनी पाडला. उत्तर वझिरीस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून जी ‘झर्झ ए अझ्ब’ ही लष्करी कारवाई गेले काही दिवस सुरू आहे, त्याचा पेशावरमधील लष्कराच्या शाळेवर सशस्त्र हल्ला चढवून सूड उगवण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी तालिबान्यांनी केला आहे. पाकिस्तानने अशा कडव्या दहशतवादी शक्तींसंदर्भात जो दुटप्पीपणा ... Read More »

ते आणि आम्ही

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील थरारनाट्य अखेर सोळा तासांनंतरच्या धडक कारवाईत संपुष्टात आले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी साधर्म्य असलेला हा हल्ला असला, तरी ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षा दलांनी तो कसा हाताळला आणि आपल्याकडे काय घडले यातील कमालीचा फरक विचार करण्यासारखा आहे. मुंबईवर हल्ला चढवलेल्या हल्लेखोरांची संख्या जास्त होती आणि ते पूर्ण प्रशिक्षित होते, तर सिडनीतील हल्लेखोर हा एकटा होता, मध्यमवयीन होता व त्याने त्यासाठी विशेष ... Read More »

कॉंग्रेसचे ‘चिंतन’

गेली अडीच वर्षे जवळजवळ अज्ञातवासात गेलेल्या गोवा प्रदेश कॉंग्रेसला पुन्हा पालवी फुटू लागल्याचे दिसते आहे. जॉन फर्नांडिस यांच्याकडे प्रदेश कॉंग्रेसची सूत्रे गेल्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या झाडाझडतीत पक्षाची सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी पक्षापासून दुरावली होती. लुईझिन फालेरोंकडे प्रदेशाध्यक्षपद येताच ही मंडळी पुन्हा जवळ आली आणि आता पक्षाला पुन्हा सत्तेच्या दिशेने नेण्यासाठी काय करावे लागेल याचे ‘चिंतन’ नुकत्याच झालेल्या चिंतन शिबिरामध्ये त्यांनी केले. ... Read More »

टेक जिहादी

इराक आणि सीरियामध्ये हाहाकार माजवलेल्या आयएसआयएससाठी सोशल मीडियाचा दुरूपयोग करणार्‍या एका तरुणाचा ब्रिटनच्या वृत्तवाहिनीने पर्दाफाश केला. त्यानंतर आपल्या सुरक्षा यंत्रणांना जाग आली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या. पण गेली अनेक वर्षे अशा प्रकारे जिहादींना चिथावत आलेल्या या मेहदी मसरूर बिस्वास नामक महाभागाचा थांगपत्ता भारतीय गुप्तचर यंत्रणांना मात्र नव्हता हे अजबच म्हणायला हवे. ट्वीटरवरून आयएसआयसाठी हजारो ट्वीटस् करणार्‍या या मेहदीचा १७,७०० ... Read More »

योगगौरव

संयुक्त राष्ट्रसंघाने दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील हे एक गौरवशाली पान आहे. मानवी उत्कर्षासाठी कैक शतकांपूर्वी या देशामध्ये विकसित झालेल्या एका उज्ज्वल परंपरेचा हा यथार्थ सन्मान आहे. भारतीय योगसाधना हा केवळ एक व्यायामाचा प्रकार नाही, तर तो मनुष्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग आहे. शतकांमागून शतके ... Read More »

कलहाची बीजे

आग्य्रातील धर्मांतरण प्रकरणाचे तीव्र राजकीय पडसाद उमटू लागले आहेत आणि विद्यमान नरेंद्र मोदी सरकारला हा वाद तापदायक ठरणार असे दिसते आहे. संसदेतही त्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. ‘पुरखोंकी घर वापसी’ अशा गोंडस नावाखाली पूर्वज हिंदू असलेल्या सुमारे दोनशे मुसलमानांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्याचा हा जो समारंभ आग्य्रात साग्रसंगीत पार पडला, त्यात झालेले धर्मांतरण हे स्वेच्छेने झाल्याचा आयोजकांचा दावा असला तरी ... Read More »

थोडे मागे हटा

गोवा रोजगार आणि भरती सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांचे आंदोलन आता कुठल्या कुठे वाहावत चालले आहे असे दिसू लागले आहे. या आंदोलनामध्ये आता राजकारण घुसू पाहते आहे आणि सहानुभूतीच्या आडून आपल्या राजकीय खेळ्या पुढे सारू पाहणार्‍यांना आंदोलकांचे नेते अजितसिंह राणे यांनी आताच अटकाव केला नाही, तर हे आंदोलन भलत्याच दिशेने भरकटत जाईल याचे भान त्यांनी ठेवायला हवे. सध्या आंदोलनाच्या तापल्या तव्यावर पोळी ... Read More »

पुन्हा गुन्हा

दिल्लीमध्ये ‘उबेर’ या ५१ देशांत कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या टॅक्सीसेवेतील एका चालकाने पंचवीस वर्षीय युवतीवर केलेल्या बलात्काराच्या घटनेने देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अनागोंदी व असुरक्षिततेवर पुन्हा एकवार प्रकाश पडला आहे. सदर आरोपीला यापूर्वी बलात्कार प्रकरणात सात महिने तुरुंगवास घडला होता आणि तरीही त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची शहानिशा न करता त्याला नोकरीवर ठेवले गेले हे धक्कादायक आहे. चालकाने सादर केलेला सद्वर्तणुकीचा दाखला ... Read More »

नवी व्यवस्था

देशाच्या आजवरच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान दिलेल्या नियोजन आयोगाला गुंडाळून पर्यायी व्यवस्था निर्माण करणारे निर्णायक पाऊल मोदी सरकारने उचलले आहे. नुकत्याच झालेल्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जेव्हा याचे अधिकृत सूतोवाच करण्यात आले, तेव्हा कॉंग्रेसच्या राज्यांतील मुख्यमंत्री वगळता इतर सर्वांनी ती कल्पना उचलून धरली. त्यामुळे ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात सरकारपुढे कोणता अडसर सध्या तरी संभवत नाही. आजवर देशाच्या आर्थिक नियोजनाची सारी सूत्रे ... Read More »

निराशेतून हल्ला

काश्मीरमध्ये शुक्रवारी झालेले चार दहशतवादी हल्ले हे केवळ सुरक्षा दलांवरील हल्ले नाहीत, तर सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सहभागी होऊ नये यासाठी त्यांच्यात दहशत निर्माण करण्याचा हा निकराचा प्रयत्न आहे. सुरक्षा दलेही सुरक्षित नाहीत, तेथे तुमची काय कथा, अशी धमकीच जणू हे पाकसमर्थित दहशतवादी देऊ पाहात आहेत. खरे तर जम्मू व काश्मीर विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत मतदारांनी जो ... Read More »