अग्रलेख

पुन्हा केजरीवाल

दिल्लीनंतर पंजाबप्रमाणे गोव्याला आपली प्रयोगभूमी बनवून येथील राजकीय पर्यायाची पोकळी भरून काढण्याच्या धडपडीत अरविंद केजरीवाल अल्पावधीत पुन्हा एकवार गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या मागील सभेद्वारे दोन लाख गोमंतकीयांपर्यंत पोहोचल्याचा दावा ‘आम आदमी पक्षा’ने केला होता. अशा प्रकारचा जनाधार या पक्षाला खरोखरच मिळालेला आहे असे मानण्याजोगी स्थिती सध्या तरी दृश्य स्वरूपात नाही. परंतु आपला संभाव्य मतदार कोण असेल आणि त्याच्यापर्यंत कसे ... Read More »

अजून किती बळी?

दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी काश्मीरमधील पाम्पौर पुन्हा एकदा हादरले. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे आठ जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्याचा जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात बसच्या समोर उभा राहून दणादण गोळ्या चालवणारा दहशतवादी दिसतो. त्याला पाहताना आपल्या लष्करी आणि निमलष्करी जवानांचे प्राण एवढे स्वस्त आहेत का, हा प्रश्न कोणत्याही देशभक्त नागरिकाच्या मनात आला असेल यात शंका नाही. सातत्याने सुरू असलेले अशा ... Read More »

दुःखदायक

आय लीग फुटबॉल स्पर्धेतून बाहेर पडण्याचा साळगावकर एफसी आणि स्पोर्टिंग क्लब दी गोवा या दोन प्रमुख संघांनी घेतलेला निर्णय आणि त्या पाठोपाठ या स्पर्धेबाहेर पडण्याचा धेंपो फुटबॉल क्लबने चालवलेला विचार ही भारतीय फुटबॉलसमोर वाढून ठेवलेल्या आगामी संकटांची नांदी आहे. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या मुजोरीविरुद्धचे आणि अलोकशाही वृत्तीविरुद्धचे हे बंड आहे. भारतीय फुटबॉलच्या विकासाचा ‘रोडमॅप’ बनवण्याच्या बहाण्याने निव्वळ धंदेवाईकपणाला प्राधान्य देण्याचा ... Read More »

दुसरे स्वातंत्र्य

युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ब्रिटनच्या जनतेने दिलेला कौल केवळ तो देश, किंवा युरोपीय महासंघातील इतर देशांसाठीच नव्हे, तर अवघ्या जगाच्या दृष्टीने अनेक कारणांसाठी महत्त्वाचा आहे. आर्थिक बाबींपासून व्यापारी घडामोडींपर्यंत अनेक नवी समीकरणे आता उदयाला येतील. आधीच आर्थिक संकटात असलेल्या युरोपीय महासंघात योगदान देणारा एक प्रमुख देश त्यातून आता बाहेर पडणार असल्याने आणि त्याचीच री ओढत काही छोट्या देशांमध्ये हीच मागणी ... Read More »

शेवटची संधी

भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि सरकार यांच्यातील चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली असली, तरी उभय पक्षांमध्ये शैक्षणिक माध्यम विषयावर संवाद सुरू झाला ही सकारात्मक बाब मानावी लागेल. अर्थात, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांचे शैक्षणिक अनुदान रद्द करा ही भाभासुमंची मागणी एव्हाना या आंदोलनाच्या केंद्रवर्ती बनलेली आहे. त्यामुळे जोवर सरकार तिच्याशी सहमती दर्शवीत नाही, तोवर या चर्चेतून काही निष्पन्न होऊ शकणार नाही ... Read More »

‘इस्रो’ची गगनझेप

श्रीहरीकोट्याच्या सतीश धवन स्पेस सेंटरने काल आपल्या पीएसएलव्ही – सी ३४ प्रक्षेपकाद्वारे एकाच वेळी तब्बल वीस उपग्रह अवकाशात सोडून इतिहास रचला. ‘इस्रो’च्या आजवरच्या सफल कामगिरींवरील हा एक मानाचा तुरा म्हणावा लागेल. आठ वर्षांपूर्वी ‘इस्रो’ने एकाच वेळी दहा उपग्रह अवकाशात सोडले होते. कालची संख्या त्याच्या दुप्पट आहे एवढेच केवळ त्याचे महत्त्व नाही, तर त्याद्वारे भारताच्या या क्षेत्रातील अधिकारावर जणू जागतिक मान्यतेची ... Read More »

धाडसी निर्णय

अनेक क्षेत्रांतील थेट विदेशी गुंतवणुकीसंदर्भातील बंधने एका फटक्यात मुक्त करून सरकारने धाडसी पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंधरा क्षेत्रांतील थेट विदेशी गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढ करून यासंदर्भात पहिले पाऊल टाकले गेले होते. यावेळी आणखी अनेक क्षेत्रे खुली केली गेली असल्याने आता भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील एक सर्वांत खुली अर्थव्यवस्था बनली आहे. जवळजवळ पाच क्षेत्रांमध्ये अगदी शंभर टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला ... Read More »

योग अनुसरूया

दुसरा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज संपूर्ण जगभरामध्ये उत्साहात साजरा होतो आहे. योगविद्या ही भारतात जन्म पावलेली असल्याने आणि भारताच्याच प्रयत्नांतून आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाने तिचा स्वीकार केलेला असल्याने या देशाच्या इतिहासातील हे एक गौरवशाली पान आहे. योग हा मानवाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आहे. मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक उन्नतीचा तो राजमार्ग आहे. त्यामुळे त्याच्याकडे केवळ धार्मिक अंगाने पाहून त्याला विरोध करणे हा ... Read More »

देश विकणे आहे

बड्या कॉर्पोरेटस्‌चा सरकार, राजकारणी, प्रसारमाध्यमे इतकेच नव्हे तर अगदी न्यायप्रक्रियेवरही कसा प्रभाव असू शकतो त्याचे दाहक दर्शन सध्या गाजत असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणातून घडते आहे. वास्तविक, काही महिन्यांपूर्वी त्याच कॉर्पोरेट ग्रूपने काही राजकारण्यांपासून पत्रकारांपर्यंत अनेकांवर सातत्याने कशी ‘मेहेरबानी’ केली, भेटवस्तू कशा दिल्या, वाहने कशी पुरवली, अतिथीगृहांतील सहली कशा घडवल्या त्यासंदर्भातील माहिती समोर आली होती. त्यावेळी मागील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील ... Read More »

हवाई क्रांती

केंद्र सरकारने नुकतेच जारी केलेले राष्ट्रीय नागरी विमान वाहतूक धोरण हे एक अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे. हवाई वाहतूक क्षेत्राचा विस्तार होणे आणि हवाई प्रवास सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येणे या दोन गोष्टींवर त्यात लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. आजवर देशातील बड्या महानगरांभोवतीच आपली नागरी हवाई वाहतूक केंद्रित झालेली होती. त्यामुळे इतर शहरे दुर्लक्षित आणि उपेक्षितच राहिली. त्यात विमान तिकीटावर नानाविध करांचा ... Read More »