ब्रेकिंग न्यूज़

अग्रलेख

‘आप’ चे आगमन

गोव्याच्या राजकारणात कॉंग्रेसच्या नाकर्तेपणामुळे आजवर रिकामी राहिलेली पर्यायाची पोकळी भरून काढण्याचा चंग आम आदमी पक्षाने बांधला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या उद्याच्या जाहीर सभेने ‘आप’चा आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल. गेले काही दिवस गोव्यात ज्या प्रकारे जळी – स्थळी केजरीवालांच्या छब्या झळकत आहेत, ते पाहिल्यास संपूर्ण गोवा केजरीवालमय झाल्याचा आभास निर्माण करण्यात आम आदमी पक्ष यशस्वी झाला आहे, परंतु ... Read More »

 कॉंग्रेसची घसरण

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांत पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामीळनाडूत जयललिता यांनी स्वतःचे स्थान जसे भक्कम केले आहे, तसेच आसाममध्ये ऐतिहासिक यश संपादन करून, पश्‍चिम बंगालमध्ये आपले अस्तित्व दाखवून आणि केरळमध्ये खाते खोलून भारतीय जनता पक्षाने स्वतःची राष्ट्रीय पक्ष ही प्रतिमा अधिक ठळक केली आहे. याउलट कॉंग्रेसची पानिपताची परंपरा मात्र कायम राहिलेली दिसते. आसाममधील तरुण गोगोईंचे गेल्या पंधरा वर्षांचे ... Read More »

अकबरनामा

गेल्या महिन्यात नवी दिल्लीतील औरंगजेब रोडचे नामांतर ए. पी. जे. अब्दुल कलाम रोड असे करण्यात आले, त्याच धर्तीवर अकबर रोडचे नामांतर राणा प्रताप मार्ग करावे अशी मागणी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून केली आहे. लष्करप्रमुख पदावर राहिलेल्या सिंग यांच्यासारख्या व्यक्तीने ही मागणी करावी हे आश्‍चर्यकारक तर आहेच, परंतु औरंगजेब आणि अकबर ... Read More »

जबाबदारी

सांताक्रुझचे आमदार बाबूश मोन्सेर्रात यांच्यावरील बलात्काराचा गुन्हा न्यायालयात सिद्ध होणे किती कठीण आहे त्याचे दर्शन आजवरच्या सुनावणीत बचावपक्षाच्या वकिलांनी पोलिसांच्या तपासाची जी चिरफाड केली, त्यावरून घडते. पोलिसांवर असलेल्या गुन्हा सिद्ध करण्याच्या जबाबदारीचीही जाणीव ती करून देते. हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याचे तपासकामही तेवढ्याच गांभीर्याने आणि अत्यंत काळजीपूर्वक होणे अपेक्षित होते, परंतु त्यात दिसून येणार्‍या ठळक त्रुटी पाहाता आजवरच्या ... Read More »

दक्षिणेचा कौल

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात दक्षिणेतील तामीळनाडू आणि केरळ या दोन महत्त्वाच्या राज्यांतील मतदान काल पार पडले. आजवरच्या परंपरेला छेद देणारे निकाल या निवडणुकीत लागतील काय याबाबत निश्‍चितच उत्सुकता आहे. सर्वाधिक लक्ष आहे ते अर्थातच तामीळनाडूकडे. मुख्यमंत्री जे. जयललितांचा अभाअद्रमुक आणि एम. करुणानिधींचा द्रमुक यांच्यात आजवर आलटून पालटून सत्तेचा खेळ चालला. परंतु या निवडणुकीत जयललिता यांच्या हातून सत्ता हिसकावून ... Read More »

सत्य काय?

मालेगाव स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने बदललेली भूमिका आणि साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि इतरांची नावे आरोपपत्रातून वगळण्याचा घेतलेला निर्णय यामुळे या तपाससंस्थेच्या स्वायत्ततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. केंद्रातील सरकार बदलले की त्याप्रमाणे जर सीबीआय, एनआयए सारख्या तपास यंत्रणांच्या भूमिकाही बदलू लागल्या तर त्यातून अशा तपासकामाबाबत अविश्वासाखेरीज दुसरे काही प्रत्ययास येणार नाही. गुजरातमधील २००२ च्या दंगलीसंदर्भातही हेच घडले. इशरतजहॉं प्रकरणातही एवढी ... Read More »

चुकीचा संदेश

रापणकारांच्या मागण्यांप्रती सरकार एकीकडे पूर्ण सहानुभूती दर्शवते आणि दुसरीकडे त्यांच्यावर अमानुष लाठीमार होतो ही बाब अतर्क्य आहे. रापणकारांचे आंदोलन असा लाठीमार करण्याएवढे खरोखर चिघळले होते की त्यांनी कॅसिनोंचा मार्ग रोखून धरल्याने त्या व्यवसायावर गदा आल्याने ही निर्णायक कारवाई केली गेली असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. मच्छिमारी संचालकांना या रापणकारांनी एलईडी दिव्यांनिशी मासेमारी करणार्‍या काही मोठ्या बोटींचे नोंदणी क्रमांक दिले ... Read More »

मत्स्य दुष्काळाकडे

गोव्याच्या पारंपरिक रापणकारांनी एलईडी दिव्यांच्या मदतीने चालणार्‍या मोठ्या प्रमाणातील मच्छीमारीविरोधात दंड थोपटले आहेत. रापणकारांची मागणी रास्त आहे यात तीळमात्र शंका नाही. या आंदोलनामुळे जाग्या झालेल्या सरकारने एलईडी दिव्यांच्या माध्यमातून चालणार्‍या मासेमारीवर बंदी घालणारा वटहुकूम काढला असला, तरी जोवर अशा मासेमारीविरुद्ध प्रत्यक्ष कारवाई होत नाही, तोवर नुसत्या वटहुकुमाला काही अर्थ नाही. पर्ससीन जाळ्यांच्या आधारे चालणारी मासेमारी किंवा एलईडी दिव्यांचे प्रखर प्रकाशझोत ... Read More »

संतुलित जीवनासाठी

आजच्या तणावग्रस्त आणि बेशिस्त जीवनशैलीमुळेच मधुमेहाचे प्रमाण देशात वाढत चालल्याचे निरीक्षण एका सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे. पुढच्या पिढीत चालत येणार्‍या आनुवंशिक मधुमेहापेक्षा वरील कारणांमुळे नव्या पिढीमध्ये मधुमेह अधिक प्रमाणात दिसून येत असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. जीवनशैलीविषयक आजार ही आज केवळ भारताचीच नव्हे, तर संपूर्ण जगाची मोठी समस्या बनलेली आहे. ‘जंक फूड’ कडे असलेला वाढता कल, वेळी – अवेळी खाण्याच्या सवयी, ... Read More »

सेंद्रिय शेतीकडे

सिक्कीमप्रमाणे गोव्याला संपूर्णतः सेंद्रीय शेतीयुक्त राज्य बनवण्याचा संकल्प सरकारने सोडला आहे. त्या दिशेने प्रयत्नही सुरू आहेत, परंतु अजूनही त्याचे प्रत्यक्ष परिणाम दिसून येऊ शकलेले नाहीत. सेंद्रीय शेतीचा आज जगभरात बोलबाला आहे आणि दिवसेंदिवस अधिकाधिक शेतकरी त्याकडे वळू लागलेले दिसत आहेत. जगात सर्वाधिक सेंद्रित शेती करणारे शेतकरी भारतामध्ये आहेत. प्राचीन काळापासून भारतामध्ये निसर्गाशी एकरूप होऊन शेती केली जात असे. दुर्दैवाने मध्यंतरी ... Read More »