ब्रेकिंग न्यूज़

अग्रलेख

संघर्ष उफाळला

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे भारताने केलेल्या कारवाईला दुजोरा देणारी नवनवी माहिती उघड होत असतानाच काल पाकिस्तानच्या ‘डॉन’ या नामांकित वृत्तपत्राने सर्वोच्च पातळीवरील एका गोपनीय बैठकीत लोकनियुक्त सरकार आणि लष्कर/आयएसआयचे सर्वेसर्वा यांच्यात दहशतवादाविरुद्धच्या कारवाईसंदर्भात तणातणी होऊन ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडायचे नसेल तर आता दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावीच लागेल’ असे नवाज शरीफ यांनी त्यांना सुनावल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. याचाच भाग म्हणून आयएसआयचे महासंचालक ... Read More »

पुरावे कसले मागता?

भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांविरुद्ध प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे केलेल्या ‘शल्यात्मक हल्ल्यां’ (सर्जिकल स्ट्राइक्स) वरून सध्या चाललेले राजकारण दुर्दैवी आहे. एकीकडे या कारवाईचे श्रेय मिळवण्याची काही नेत्यांनी केलेली पोरकट धडपड आणि दुसरीकडे या कारवाईबाबत शंका निर्माण करून केंद्र सरकारलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा विरोधकांचा प्रयत्न यात ओढाताण चालली आहे ती भारतीय लष्कराची. लष्कराने सरकारकडून मुक्तहस्त मिळताच आपले काम व्यवस्थित तडीला नेले. त्याची घोषणाही ... Read More »

नेताजींना न्याय कधी?

भारताच्या राजकीय इतिहासात दोन महान व्यक्तींच्या मृत्यूचे गूढ देशवासीयांना सदैव छळत आले आहे. एक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि दुसरे लालबहादूर शास्त्री. दोन्ही मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाले आणि त्या व्यक्तींच्या जाण्याने देशाची अपरिमित हानी झाली. विशेषतः नेताजींच्या जाण्याने देशाच्या इतिहासाला एक वेगळीच कलाटणी मिळाली, जिचे परिणाम आपण आजतागायत भोगत आलो. नेताजींचे येथे स्मरण करण्याचे कारण म्हणजे त्यांच्या मृत्यूसंदर्भातील काही गोपनीय कागदपत्रे ... Read More »

त्या प्राणांची किंमत!

उरी हल्ल्यानंतर पंधरवडा उलटतो न उलटतो तोच बारामुल्लाच्या लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी रविवारी रात्री हल्ला चढवला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे भारतीय लष्कराने केलेल्या ‘शल्यात्मक हल्ल्यां’ (सर्जिकल स्ट्राईक्स) चा सूड उगविण्याचाच दहशतवाद्यांचा हा आटापिटा आहे हे स्पष्ट आहे. असे आणखी हल्लेही येणार्‍या काळात होऊ शकतात, कारण नियंत्रण रेषेपलीकडील कारवाईत भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला असला, तरी ... Read More »

पायघड्या

पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू द्यावे की नाही हा वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. प्रत्येकवेळी पाकिस्तानने भारताची कुरापत काढली की, हा वाद ऐरणीवर येत असतो. बाजू घेतल्या जातात. अटीतटीने मांडल्या जातात. वातावरण निवळले की, पुन्हा जैसे थे व्यवहार सुरू होतात. उरी हल्ल्यानंतर देशभावना तीव्र बनली. जे पाकिस्तान भारतात सातत्याने दशकानुदशके दहशतवाद पेरत आले, त्या देशातील नागरिकांना आपल्या देशात लाल पायघड्या ... Read More »

सीबीआयवर संशय

एका लाचखोर अधिकार्‍याचे अवघे कुटुंब कसे उद्ध्वस्त झाले त्याची कहाणी गेल्याच आठवड्यात माध्यमांद्वारे जगापर्यंत पोहोचली. केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातील महासंचालक बालकिशन बन्सल यांना एका फार्मा कंपनीकडून नऊ लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडले आणि त्यानंतरच्या घटनाक्रमात आधी त्यांच्या पत्नी आणि मुलीने आत्महत्या केली आणि आता स्वतः बन्सल आणि त्यांच्या मुलानेही आत्महत्येचा तोच मार्ग स्वीकारला. एक कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त ... Read More »

पहिला ठोसा!

जो यथा वर्तते यस्मिन् तस्मिन एवं प्रवर्तयन् | नाधर्मं समवाप्नोति न चाश्रेयश्च विदन्ति ॥ ‘जो आपल्याशी जसा वागतो, त्याच्याशी तसेच वागल्याने अधर्म केला असे होत नाही!’ असे महाभारताच्या उद्योगपर्वामध्ये भीष्म पितामह परशुरामाला सांगतात. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय सेनेने काल रात्री दहशतवाद्यांच्या अड्‌ड्यांवर जो हल्ला चढविला त्याबाबतही असेच म्हणावे लागेल. पाकिस्तान आजवर दहशतवाद्यांना राजाश्रय देत आला. पूर्वी ... Read More »

दणका

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या वर्मावर घाव घालण्याचे विविध पर्याय भारत सरकार आजमावत आहे. पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांविरुद्ध लष्करी कारवाई दोन्ही देशांमधील युद्धाला तोंड फोडण्याची भीती असल्याने असा आक्रमक संघर्ष भारताने यावेळीही टाळला असला, तरी राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्याचे इतर सर्व पर्याय भारत हाताळताना दिसतो आहे. संयुक्त राष्ट्र आमसभेपुढे नवाज शरीफ यांनी जे प्रक्षोभक आणि कांगावाखोर भाषण केले, त्याला आपल्या परराष्ट्रमंंत्री सुषमा ... Read More »

वादे वादे…

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे रंग भरू लागले आहेत. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅट उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यातील संघर्ष आता अटीतटीच्या टप्प्यावर आलेला दिसतो. नुकतीच जी राष्ट्राध्यक्षीय वादविवादाची पहिली फेरी पार पडली, त्यामध्ये दोघांनी एकमेकांविरुद्ध उपहास, उपरोधाने खच्चून भरलेली जी शेरेबाजी केली, एकमेकांच्या धोरणांची जी खिल्ली उडवली, त्यातून या निवडणुकीत येणार्‍या काळात काय वाढून ठेवले आहे याची पुरेपूर चाहूल लागते. वास्तविक ... Read More »

मनोर्‍यांचा संघर्ष

मोबाईल टॉवरवरून सध्या दक्षिण गोव्यात संग्राम सुरू आहे. सरकार येणार्‍या ‘ब्रिक्स’ परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर लवकरात लवकर जास्तीत जास्त मनोरे उभारण्यास उतावीळ आहे, तर स्थानिक नागरिक पंचायत व ग्रामसभांच्या माध्यमातून या मनोर्‍यांना कडाडून विरोध करीत आहेत. मोबाईल मनोर्‍यांतून होणार्‍या उत्सर्जनामुळे कर्करोग होतो अशी भीती जनतेच्या मनामध्ये असल्याने हा विरोध होत आहे, परंतु खरोखर अशा प्रकारचे घातक उत्सर्जन होते का, त्याचे प्रमाण काय ... Read More »