ब्रेकिंग न्यूज़

अग्रलेख

विश्वास – अविश्वास

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव आज लोकसभेमध्ये चर्चेला येणार आहे. केंद्र सरकार आंध्र प्रदेशला खास राज्याचा दर्जा देत नसल्याचे कारण देत तेलगू देसम पक्षाने हा प्रस्ताव आणला आहे. संसदेच्या गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात असाच प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यावेळी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी हा प्रस्ताव चर्चेसाठी स्वीकारल्याने खरे तर विरोधकांची बोलती बंद झाली आहे. हा प्रस्ताव मोदी ... Read More »

कोण वरचढ?

गोवा विधानसभेचे बारा दिवसांचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची गंभीर आजारपणे, सत्तेच्या प्रमुख घटकांमधील उघड झालेल्या लाथाळ्या, राज्यात ऐरणीवर असलेले खाण बंदी, माशांतील घातक फॉर्मेलीन, सीआरझेडमधील बदल यासारखे गंभीर विषय, बर्‍याच काळानंतर सक्रिय झालेला कॉंग्रेस पक्ष या सार्‍याची या अधिवेशनाला पार्श्वभूमी आहे. गतवर्षीच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस विरोधकांच्या गदारोळात वाया गेला होता. सरकारी अधिकार्‍यांना आमदारांच्या घरी जाण्यास ... Read More »

संसदेकडे नजर

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होते आहे. हे अधिवेशन कामकाजाच्या १८ दिवसांचे आहे आणि ते १० ऑगस्टला संपेल. संसदेचे मागील अर्थसंकल्पीय अधिवेशन बँक घोटाळे आणि कावेरीप्रश्नी विरोधकांनी चालवलेल्या गदारोळातच संपुष्टात आले होते. संसदेचे काहीही विशेष कामकाज त्या अधिवेशनात होऊ शकले नाही. अधिकृत आकडेवारी तपासली तर लोकसभेचे जेमतेम १ टक्का आणि राज्यसभेचे ६ टक्के सांसदीय कामकाज त्या अधिवेशनामध्ये उरकता आले. याचाच ... Read More »

आता तरी धडा घ्यावा

परराज्यांतून गोव्यात येणार्‍या मासळीमधील फॉर्मेलिन प्रकरणी समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा एकवार सारवासारव चालवल्याचे दिसले. मडगावच्या घाऊक मासळी बाजारात माशांवर आढळलेले रसायन हे निसर्गतःच मासळीमध्ये असलेले अलडिहाईड असल्याचा दावा एफडीएने आता केला आहे. आधी माशांवरील हे फॉर्मेलिन ‘ठराविक मर्यादेपर्यंत’ असल्याचे एफडीएचे म्हणणे होते. त्यामुळे, तसे असेल तर ही ठराविक मर्यादा काय, असा प्रश्न त्यावर विचारला गेला. ... Read More »

शरीफ यांचे पुनरागमन

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना मायदेशी परतताच अटक झाली. अर्थात, त्यांना न्यायालयाने लंडनमधील बेहिशेबी संपत्तीबाबत दोषी धरलेले असल्याने ही अटक अपेक्षितच होती. शरीफ यांना आपल्यासमोर पाकिस्तानात काय वाढून ठेवले आहे याची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी मायदेशी परतण्याचा जो निर्णय घेतला तो काही निरुपाय होऊन नव्हे. पाकिस्तानमध्ये येत्या २५ तारखेला होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अगदी योग्य वेळी आणि संपूर्ण ... Read More »

जिवाशी खेळ!

अन्न व औषध प्रशासनाने मडगावच्या घाऊक मासळी मार्केटमध्ये टाकलेल्या छाप्यात परराज्यांतून येणार्‍या मासळीवर ‘फॉर्मेलिन’ हे घातक रसायन आढळून आल्याचा सकाळी काढलेला निष्कर्ष संध्याकाळी बदलला गेला. मत्स्य व्यावसायिकांनी राज्यभरामध्ये मासळी बाजार बंद ठेवून आणलेला दबाव आणि कृषीमंत्री विजय सरदेसाई यांना आपल्या या मतपेढीचा आलेला पुळका यातूनच हा चमत्कार घडल्याचे मानण्यास नक्कीच वाव आहे. मासळीवर आढळलेले ‘फॉर्मेलिन’ हे ‘पर्मिसिबल लिमिटस्’ म्हणजे ठराविक ... Read More »

पुन्हा आयटी

गोव्यातील विद्यमान सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान धोरणाला नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि येत्या रविवारी केंद्रीय मंत्री रविशंकरप्रसाद यांच्या हस्ते या धोरणाचे अनावरण होणार आहे. गोवा ही माहिती तंत्रज्ञानाची पंढरी बनवणे आणि या क्षेत्रामध्ये गोमंतकीयांसाठी आठ ते दहा हजार नोकर्‍या निर्माण करणे अशी दोन स्वप्ने राज्य सरकारने आपल्या या प्रस्तावित धोरणातून गोव्याच्या तरुणाईला दाखवली आहेत. अर्थात, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासंदर्भात ... Read More »

नव्या समीकरणांकडे

दहशतवादाने खदखदत्या काश्मीरमध्ये पुन्हा एकवार नव्या सरकारच्या स्थापनेच्या दिशेने हालचाली सुरू झालेल्या दिसत आहेत. भाजपाने मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीपासून काडीमोड घेतल्यानंतर राज्याचा ताबा तूर्त राज्यपाल नरेंद्रनाथ वोहरा यांच्याकडे जरी सोपवण्यात आलेला असला, तरी ही व्यवस्था काही कायमस्वरुपी ठरू शकत नाही. पुन्हा मध्यावधी निवडणुका घ्यायचे म्हटले तर त्यासाठी अनुकूल वातावरण राज्यात नाही. अशा परिस्थितीत मुफ्ती आणि अब्दुल्ला या दोन्ही घराण्यांना बाजूला ठेवून ... Read More »

सुर्लचा आदर्श

आपल्या गावामध्ये दारूचा भस्मासुर नको या निर्धाराने उभ्या ठाकलेल्या सुर्ल – सत्तरीच्या ग्रामस्थांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. सुर्ल हा गोवा – कर्नाटक सीमेवरचा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचा छोटासा पण अतिशय सुंदर गाव. कर्नाटक सीमेवर वसल्याने आणि कर्नाटकाच्या तुलनेत गोव्यात दारू स्वस्त असल्याने गोव्याला पर्यटनासाठी येणारे आणि गोव्याहून कर्नाटकात परतणारे दारूबाज सुर्लमध्ये मदिराप्राशनासाठी, मद्य खरेदीसाठी हमखास थांबतात. शिवाय पावसाळ्यात येथील चोर्ला घाटातील नयनरम्य ... Read More »

झुंडशाहीचे बळी

देशात गेल्या वर्षभरात सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवांमुळे नऊ राज्यांमध्ये २७ जणांची हिंसक जमावाकडून हत्या झाल्याची सुन्न करणारी आकडेवारी समोर आली आहे. अगदी पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रापासून मागासलेल्या झारखंडपर्यंत आणि संस्कृतीप्रेमी दाक्षिणात्य राज्यांपासून ईशान्येतील आसाम, त्रिपुरापर्यंत हे प्रकार घडले आहेत. एखाद्या अफवेची खातरजमा करण्याची वाट न पाहता आणि मागचा पुढचा विचार न करता झुंडीच्या झुंडी एखाद्याच्या जिवावर उठायला पुढे सरसावतात हे चित्र ... Read More »