ब्रेकिंग न्यूज़

अग्रलेख

दक्षिण ध्रुव

विशेष संपादकीय   द्रविडी अस्मितेचे कैवारी आणि द्रमुकचे आधारस्तंभ मुथुवेल करुणानिधी यांच्या निधनाने तामीळनाडूच्या राजकारणातील एक मोठे पर्व संपले आहे. यापूर्वी जे. जयललिता यांच्या निधनाने तामीळनाडूच्या दोन ध्रुवांपैकी एक तारा निखळला होता. आता करुणानिधीही अनंताच्या यात्रेला निघून गेले आहेत. प्रदीर्घ काळ चाललेल्या आणि पराकोटीच्या तीव्र राजकीय संघर्षाची अखेर इतिश्री झाली आहे. पाच वेळा राज्याचे मुख्यमंत्री, तेरा वेळा आमदार आणि एकाही ... Read More »

आगीशी खेळ

भारतीय संविधानातील काश्मीरच्या कायम रहिवाशांच्या विशेषाधिकारां संबंधीच्या कलम ३५ अ संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे आणि तिकडे काश्मीरमध्ये असंतोषही उफाळला आहे. तेथे कडकडीत बंदही पाळला गेला. या विशेषाधिकारांना हात लावणे म्हणजे काश्मीरच्या अस्तित्वावर घाला आहे असे वातावरण तेथे निर्माण झाले आहे आणि त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षांपासून फुटिरतावाद्यांपर्यंत सगळेच एका सुरात बोलू लागले आहेत. काश्मीरसाठी विशेषाधिकारांचा हा विषय विलक्षण ... Read More »

वर्मावर बोट

राज्य सरकारच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, गृह आधार आणि लाडली लक्ष्मी या तिन्ही प्रमुख सामाजिक कल्याणयोजनांमधील गैरप्रकारांची पोलखोल महालेखापालांच्या अहवालातून झालेली आहे. अर्थात नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात हा विषय चर्चेला आला होता आणि या योजनांसाठी खोटी माहिती हा फौजदारी गुन्हा ठरवला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी त्यात केली आहे. दोन ऑगस्टचा अग्रलेखही त्याच विषयावर होता. या योजनांमागील सरकारचे हेतू कितीही उदात्त ... Read More »

सुरळीत वीज

राज्यातील वीजपुरवठ्याची स्थिती यावर्षी कधी नव्हे एवढी वाईट बनलेली दिसते आहे. खेड्यापाड्यांतच नव्हे, तर अगदी प्रमुख शहरांमध्येही विजेच्या सततच्या लपंडावाने नागरिक हैराण झाले आहेत. नुकतेच या विषयावर विधानसभेत पडसाद उमटले आणि पुढील वर्षापर्यंत ही परिस्थिती सुधारण्यात येईल असे आश्वासन सरकारने दिले आहे. हे आश्वासन देतानाच काही गोष्टी समोर आणल्या गेल्या. राज्यातील साठ टक्के वीज ग्राहक आपल्या वीज जोडणीवेळी नमूद केलेल्या ... Read More »

खाण प्रश्नाचा गुंता

गोव्यातील खाणींचा प्रश्न सोडविताना सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमएमआरडी कायद्याखाली म्हणजेच खाणी व खनिज (नियमन व विकास) कायद्यानुसार खाण लिजांचा खुला लिलाव पुकारण्यास अनुकूल नसून पोर्तुगीजकालीन मक्त्यांचे (कन्सेशन) लीजमध्ये रुपांतर करण्यात आल्याची तारीखच पुढे आणून या लिजांना आणि अर्थातच त्याच्या धारकांना सन २०३७ पर्यंत जीवदान देऊ इच्छित असल्याचे एव्हाना पुरते स्पष्ट झाले आहे. ही तारीख पुढे आणण्यासाठी अर्थातच गोवा, दमण ... Read More »

इम्रानकडे कमान

भारत इकडे कारगिल विजय दिवस साजरा करीत असताना तिकडे पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. यावेळी अपेक्षेनुरुप एकेकाळचा क्रिकेटपटू इम्रान खानची बॅट या निवडणुकीत तळपली आहे आणि त्याचा पाकिस्तान तेहरिक ई इन्साफ पक्ष निर्विवाद बहुमत जरी मिळवू शकला नसला तरी सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. छोट्या पक्षांची आणि अपक्षांची मदत घेऊन तो सत्तारूढ होण्याची चिन्हे आहेत. इम्रान खानसारखा ... Read More »

एक पाऊल मागे

महाराष्ट्रात सध्या नोकर्‍या आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी पुन्हा एकवार मोठे आंदोलन पेटले आहे. पूर्वी ‘एक मराठा, लाख मराठा’ चा पुकारा करीत लाखा – लाखांचे मूक मोर्चे शहरा – शहरांतून काढले गेले होते, परंतु ते शांततापूर्ण आंदोलन होते. यावेळी मात्र या आंदोलनाने हिंसक रूप घेतले आहे आणि तो थोपवावा कसा या चिंतेने महाराष्ट्रातील भाजप – शिवसेना सरकारला घेरले आहे. ... Read More »

पाकिस्तानचा फैसला

आपले शेजारी राष्ट्र पाकिस्तान आज सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जात आहे. त्या निवडणुकीशी आपले काय देणेघेणे असे जर कोणी म्हणत असेल तर ते पोरकटपणाचे ठरेल, कारण शेवटी आपला हा शेजारी देश आहे आणि तेथे स्थिर, लोकशाहीवादी राजवट सत्तेवर राहणे हे आपल्यासाठी महत्त्वाचे राहणार आहे. दुर्दैवाने पाकिस्तानची सत्ता वेळोवेळी लष्करशहांच्याच हाती जात राहिली आहे. अगदी पाकिस्तान निर्मितीपासून जनरल अयुब खान, याह्या खान, ... Read More »

आता तरी जागे होऊ

गेले काही दिवस गोव्याला हादरवून सोडणार्‍या आणि विधानसभेच्या कामकाजाचे पहिले दोन दिवस वाया घालवणार्‍या फॉर्मेलीन प्रश्नी अखेरीस काल लक्षवेधी सूचनेवर विरोधकांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर सहा पानी विस्तृत लेखी उत्तरही दिले. मासळीच्या गुणवत्तेसंबंधी गोमंतकीयांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मत्स्योद्योग खाते व पोलिसांच्या मदतीने मडगाव, पणजी व म्हापशाच्या प्रमुख मासळी बाजारांत नियमित तपासण्या ... Read More »

अपुरा उपाय

परराज्यांतून गोव्यात आयात होणार्‍या मासळीतील फॉर्मेलिनचा विषय आता केवळ त्या रसायनाच्या वापरापर्यंतच मर्यादित उरलेला नाही. गोव्यातील एकूण मत्स्योद्योग, मासळीची आयात – निर्यात, त्यात शिरलेले दलाल, त्यांच्यावर नियंत्रण असलेले आंतरराज्य माफिया, त्यांच्या चालणार्‍या हिकमती, सरकार करदात्यांच्या पैशातून मत्स्यव्यवसायास देत असलेल्या विविध सवलती, तरीही स्वस्तात चांगले मासे गोवेकरांच्या ताटात न देणारे मासळी विक्रेते अशा गुंतागुंतीच्या अनेक विषयांच्या एका मोठ्या पेटार्‍याचे झाकण एव्हाना ... Read More »