ब्रेकिंग न्यूज़

अग्रलेख

राजकीय सूड?

गुजरातमधील ४२ कॉंग्रेस आमदारांचा कर्नाटकमधील आपल्या रिसॉर्टमध्ये पाहुणचार करणार्‍या डी. के. शिवकुमार या कॉंग्रेस नेत्यावर आयकर खात्याने काल टाकलेले छापे त्यामागील इराद्यांबाबत संशय निर्माण करण्यास कारणीभूत ठरले आहेत. शिवकुमार यांच्या कर्नाटकमधील ग्रॅनाईटच्या खाणी आणि इतर अवैध व्यवसायांसंदर्भातील जुन्या प्रकरणांसंदर्भात हे छापे टाकण्यात आले असल्याचा दावा जरी सरकारने केलेला असला, तरीही नेमके शिवकुमार यांना लक्ष्य केले जाणे हे निव्वळ सूडाचे राजकारण ... Read More »

दुजानाचा खात्मा

लष्कर ए तोयबाचा काश्मीरमधील विभागीय कमांडर म्हणवणारा कुख्यात दहशतवादी अबु दुजाना याला काल सुरक्षा दलांनी पुलवाम्यातील हकरीपुरात कंठस्नान घातले. बुरहान वानी, सबझार भट आणि बशीर लष्करीनंतर सुरक्षा दलांनी खात्मा केलेला हा चौथा मोठा दहशतवादी आहे. यावर्षी जानेवारीपासून जुलैपर्यंत लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी संयुक्त मोहिमेत १०२ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे आणि येणार्‍या काळात आणखी अनेकांचा काटा काढला जाणार आहे. ... Read More »

नवी विटी, तोच डाव

पाकिस्तानच्या नव्या अंतरिम पंतप्रधानाची निवड आज होणार आहे. नवाझ शरीफ आणि परिवाराला सर्वोच्च न्यायालयाने जरी पनामा पेपर्स प्रकरणी दोषी धरले असले आणि निवडणुका लढवण्यास अपात्र ठरवले असले तरी अद्याप त्यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग – नवाज पक्ष तेथे प्रचंड बहुमतात आहे. त्यामुळे शरीफ हे पदावरून पायउतार झालेले असले तरी त्यांच्या जागी त्यांच्याच पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडला जाणे अपरिहार्य आहे. आज शाहिद ... Read More »

गळती

जहाज बुडू लागले की त्यावरचे उंदीर सुद्धा बाहेर उडी टाकू लागतात तसे सध्या कॉंग्रेस पक्षाचे झाले आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपापला विकाऊपणा सूचित करण्याची संधी अनेक कॉंग्रेसजनांनी साधली. त्याला अनुसरून आता गळ टाकले गेले आहेत आणि एकामागून एक राजीनामे देत भाजपच्या वळचणीला जाताना दिसू लागले आहेत. गुजरातमध्ये शंकरसिंह वाघेलांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला, परंतु त्यामागे वैयक्तिक कारणे होती. गुजरात विधानसभेच्या ... Read More »

शरीफ पर्वाची अखेर

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ‘पनामा पेपर्स’ प्रकरणी तेथील सर्वोच्च न्यायालयाने आजीवन अपात्र ठरवल्याने काल त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांचे हुसेन आणि हसन हे दोघे मुलगे आणि त्यांची राजकीय वारसदार मानली जाणारी मुलगी मरियम यांच्यावरही या भ्रष्टाचार प्रकरणी खटले भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शरीफ यांच्याविरुद्धच्या या निवाड्यामुळे त्यांना तिसर्‍यांदा आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. मागील वेळी परवेझ मुशर्रफ ... Read More »

महागठबंधन कमकुवत

दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाईश रहे | जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो ॥ बशीर बद्र यांचा यांच्या या प्रसिद्ध शेरात म्हटल्याप्रमाणे जुने वैर विसरून भाजप आणि नितीशकुमार पुन्हा एकत्र आले आहेत. दोहोंनी एकमेकांच्या साथीने आधी सरकार बनवले, मग वेगळे झाले, एकमेकांना पाण्यात पाहू लागले, पण आता पुन्हा एकत्र आले आहेत. प्रत्येकवेळी पाहिली गेली ... Read More »

मौकापरस्ती

बाबूश मोन्सेर्रात यांनी गोवा फॉरवर्डमार्फत सत्तेची वाट चालायला सुरूवात केली आहे. मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात आता ते पणजीची पोटनिवडणूक लढवणार नाहीत, त्यामुळे पर्रीकर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे शिफारसपत्र जरी विजय सरदेसाई यांनी दिलेले असले, तरी बाबूश यांच्या गोवा फॉरवर्ड प्रवेशामुळे पर्रीकरांसाठी पणजीच्या पोटनिवडणुकीतील चुरस भले टळली असेल, परंतु भविष्याचा विचार करता गोवा फॉरवर्डमध्ये हा बाहुबली नेता येणे आणि नुसताच ... Read More »

घोर अन्याय!

‘तरंगत्या कॅसिनोंत जाण्यास गोवेकरांना प्रवेशबंदी?’ का बरे हा आम्हा गोमंतकीयांवर घोर अन्याय! गेली किती तरी वर्षे ही कॅसिनोंची चमचमती जहाजे मांडवी नदीमध्ये आपल्या राजधानीमध्ये अगदी हाकेच्या अंतरावरून आम्हाला नित्य खुणावत राहिली आहेत! जायचे, जायचे म्हणताना आजवर राहून गेले खरे, पण आता याचि देही याची डोळां कॅसिनो म्हणजे नेमके असते तरी काय रे भाऊ म्हणून पाहायला जावे हे पक्के ठरवले असता ... Read More »

प्रणवदांना निरोप

भारताचे नवे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद आज अधिकारपदाची शपथ घेणार आहेत. त्याबरोबरच मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीभवनाचा अखेरचा निरोप घेतील. प्रणव मुखर्जी यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीची ही झळाळती अखेर असेल. यापुढील काळात आपण आत्मचरित्रपर लेखन करणार असल्याचे मुखर्जी यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे. जवळजवळ चाळीस वर्षांची त्यांची संसदीय कारकीर्द. इंदिरा गांधींपासून डॉ. मनमोहनसिंग यांच्यापर्यंतचा प्रदीर्घ काळ त्यांनी अगदी जवळून पाहिला. ... Read More »

आश्वासक

आपल्या सरकारच्या कामकाजाच्या शंभर दिवसांतील वाटचालीचा आर्थिक लेखाजोखा मुख्यमंत्र्यांनी गेल्या शुक्रवारी विधानसभेत मांडला. श्री. पर्रीकर हे एक कुशल प्रशासक जसे आहेत, तसे निष्णात गणिती आहेत. त्यांच्या तोंडी नेहमी अचूक आकडेवारी असते. वित्तीय व्यवस्थापन हा त्यांचा आवडता विषय आहे. त्याच गुणाच्या जोरावर त्यांनी खाणबंदीच्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये राज्य सरकारचे तारू डगमगू दिले नाही हे विसरता येत नाही. खाण बंदीचे संकट ओढवले ... Read More »