ब्रेकिंग न्यूज़

अग्रलेख

पारदर्शक व्हा

गोवा सरकारच्या लेखा खात्यातील लेखाधिकार्‍यांच्या ऐंशी पदासाठी परीक्षा दिलेले सर्वच्या सर्व म्हणजे जवळजवळ आठ हजार उमेदवार लेखी परीक्षेत नापास होण्याचा नुकताच उघडकीस आलेला प्रकार धक्कादायक आहे. अनेक प्रश्न यातून उपस्थित होतात. परीक्षा घेणार्‍यांचे म्हणणे खरे मानावे तर सरकारची रोजगारभरतीची पद्धत, उमेदवारांची पात्रता, गोव्याच्या शैक्षणिक क्षेत्राची एकूण गुणवत्ता याविषयी गंभीर प्रश्न निर्माण होतात. परीक्षेची प्रश्नपत्रिका खूप कठीण होती आणि नागरी सेवा ... Read More »

आव्हान उभारणीचे

पुराने कहर केलेल्या केरळमधील परिस्थिती पावसाने थोडी उसंत घेतल्याने हळूहळू का होईना, पूर्वपदावर येऊ लागली आहे. धरणांची दारे उघडल्याने नद्यांचे दुथडी भरून वाहणारे पाणीही हळूहळू ओसरू लागले आहे. मदत छावण्यांमध्ये आश्रयाला गेलेले नागरिक आपल्या घरादारांमध्ये परतू लागले आहेत. घरांत भरलेला गाळ उपसू लागले आहेत. गेलेल्या चीजवस्तूंचा अंदाज घेऊ लागले आहेत. पुन्हा नव्याने शून्यातून उभे राहण्यासाठी धडपडू लागले आहेत. एका महाआपत्तीनंतर ... Read More »

केरळची हाक

देवभूमी केरळमध्ये सध्या आकांत मांडला आहे. गेल्या आठ ऑगस्टपासून पडलेल्या प्रचंड पावसामुळे जवळजवळ अर्ध्याहून अधिक केरळ बुडाले आहे. घरे बुडाली, दरडी कोसळल्या, रस्ते वाहून गेले. वीज नाही, पिण्याचे पाणी नाही, संपर्काची साधने नाहीत, पेट्रोल – डिझेल नाही अशा परिस्थितीत जागोजागी अडकून पडलेल्या नागरिकांच्या मदतीला एनडीआरएफची तब्बल ५५ पथके, नौदल, तटरक्षक दल, हवाई दल वावरते आहे. राज्य प्रशासनाच्या मदतीला शेजारचे कर्नाटक ... Read More »

राष्ट्रपुरूष

विशेष संपादकीय तू दबे पॉंव, चोरी छिपे न आ सामने वार कर ङ्गिर मुझे आजमा… साक्षात् मृत्यूला या शब्दांत ललकारत या देशाचा एक महान नेता दिगंतराला निघून गेला आहे. भारत देश अटलबिहारी वाजपेयी नावाच्या एका महान सुपुत्राला मुकला आहे. या देशाचे कोट्यवधी नागरिक या क्षणी जे अश्रू ढाळीत आहेत, त्यातच या व्यक्तिमत्त्वाची महत्ता सामावलेली आहे. आपल्या सुपुत्राच्या वियोगाने जणू अवघी ... Read More »

दृढसंकल्प

भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशाला दरवर्षीप्रमाणे संबोधित केले. पुढील वर्ष हे लोकसभा निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे मोदी यांचे या कार्यकाळातील स्वातंत्र्यदिनाचे हे शेवटचे भाषण होते. साहजिकच त्यावर त्यांच्या सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कामगिरीची दाट छाया होती. सन २०१३ नंतरच्या काळात देशाच्या झालेल्या प्रगतीचा लेखाजोखा त्यांनी मांडला आणि ते स्वाभाविक होते. स्वातंत्र्यदिनाचे लाल ... Read More »

रामशास्त्री

अखेर सोमनाथदा गेले. ठायी ठायी तत्त्वांना तिलांजली देत चाललेल्या आजच्या स्वार्थी, सोईस्कर, संधिसाधू राजकारणात मुळीच न शोभणारे, आपल्या विचारधारेशी अविचल निष्ठा राखणारे, पदाची प्रतिष्ठा यत्किंचितही डागाळू नये यासाठी जागरूक राहिलेले आणि भारतीय संसदेच्या सार्वभौमत्वाचा कोणत्याही बाह्य शक्तीकडून अधिक्षेप होऊ नये यासाठी प्रसंग येताच कणखरपणे उभे राहिलेले एक आधुनिक रामशास्त्री म्हणूनच सोमनाथ चटर्जी हे नाव स्वतंत्र भारताच्या सांसदीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये कायम ... Read More »

मटक्याला अटकाव

कांदोळीत ‘मुंबई’ मटक्याचा आकडा काढण्यासाठी जमलेल्या २९ जणांच्या मुसक्या एका अनपेक्षित कारवाईत गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने नुकत्याच आवळल्या. या कारवाईमुळे मुंबई मटक्याचा त्या दिवसाचा आकडा निघू शकला नाही आणि त्याचा व्यवहार ठप्प होण्याची अभूतपूर्व घटना घडली. पण एकीकडे ही पोलिसांची कौतुकास्पद कारवाई होत असताना दुसरीकडे मात्र राज्यातील मटका अड्डे बिनदिक्कत चालू असल्याचे पाहायला मिळते आहे. हे काय गौडबंगाल आहे? ... Read More »

भाजपला संधी

राजकीय पोकळी काय असते याचा अनुभव सध्या तामीळनाडूची जनता घेते आहे. दोन वर्षांपूर्वी जे. जयललिता यांचे झालेले निधन आणि नुकतेच एम. करुणानिधी यांचे झालेले निधन या त्या राज्यातील दोन उत्तुंग राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या मृत्यूनंतर तामीळनाडूच्या राजकारणात खरोखरच महाकाय पोकळी निर्माण झालेली दिसते आहे. जयललितांचे निधन झाले त्यानंतर काय घडले हे देशाने पाहिले. त्यांच्या मागे पक्षाची धुरा स्वीकारण्यासाठी धडपडणार्‍या त्यांच्या जिवश्च कंठश्च ... Read More »

दिलासा

गोव्याच्या जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अमेरिकेला उपचारांसाठी पुन्हा प्रयाण करण्यापूर्वी दिल्लीत पंतप्रधानांना आणि खाण प्रश्नाच्या अभ्यासासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिगटाला भेटले. गोव्याच्या खाण प्रश्नाची पार्श्वभूमी आणि तो सोडविण्यासाठीची अध्यादेशाची पळवाट याची माहिती त्यांनी त्यांना दिली आहे. गोवा विधानसभेने एकमुखाने संमत केलेल्या ठरावाची प्रतही त्यांना सुपूर्द करण्यात आलेली आहे. गोव्याचा खाण प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे अभिवचन पंतप्रधानांनी तसेच मंत्रिगटाचे प्रमुख ... Read More »

टॅक्सी ऍपचे स्वागत

गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांची वर्षानुवर्षांची मनमानी आणि मुजोरी मोडीत काढू शकणारे मोबाईल ऍप कार्यरत करून गोवा पर्यटन विकास महामंडळाने एक चांगले व स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. गोव्यातील टॅक्सी व्यवसायाला शिस्त लावण्यात हे ऍप महत्त्वाची भूमिका बजावेल यात शंका नाही. काही विपक्षी व काही स्वपक्षीय राजकारण्यांच्या असलेल्या विरोधाची फिकीर न करता गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी खंबीरपणे हे पाऊल ... Read More »