ब्रेकिंग न्यूज़

अग्रलेख

राजकारण नको

तिहेरी तलाक अवैध ठरवून त्यासंबंधी सहा महिन्यांच्या आत कायदा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले असल्याने त्या वैधानिक पाठबळावर सरकारने तिहेरी तलाससंदर्भातील विधेयक काल लोकसभेत पुढे रेटले. हा अल्पसंख्यकांच्या खासगी जीवनाशी संबंधित विषय आहे, तो त्यांच्या धर्माशी संबंधित विषय आहे, तो संवेदनशील विषय आहे वगैरे बहाणे करून या विषयापासून हात झटकण्याऐवजी या विषयाला नरेंद्र मोदी यांचे सरकार थेट भिडले हे उचित झाले. ... Read More »

केवळ श्रेयासाठी

म्हादईच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्नाटकमधील शेतकर्‍यांनी काल उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये बंद पाळला. हा बंद गोव्याविरुद्ध नव्हता, तर म्हादई प्रश्नाचे राजकारण करू पाहणार्‍या आणि शेतकर्‍यांच्या भावनांशी आणि जिवाशी खेळणार्‍या त्यांच्याच राजकीय नेत्यांविरुद्ध होता. म्हादईच्या पाण्यासाठी कर्नाटकात आंदोलन करीत असलेल्या रयत सेनेचे प्रमुख वीरेश सोबरडमठ यांनी ‘हिंदू’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत तसे स्पष्ट म्हटले आहे. उत्तर कर्नाटकमधील शेतकरी म्हादईच्या पाण्यासाठी सातत्याने आंदोलन करीत ... Read More »

कुलभूषणच्या कबुलीमागचे सत्य

पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपाखाली डांबून ठेवलेल्या आणि फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधवची त्याच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणून आपण त्याला दूतावासीय मदत मिळवून दिल्याचा आव पाकिस्तानने आणला आहे. शिवाय या भेटीच्या निमित्ताने कुलभूषणकडून पढवून घेतलेल्या मनोगताची एक व्हिडिओ चित्रफीतही जारी करण्यात आली आहे. या मनोगतात कुलभूषणने आपण भारताच्या ‘रॉ’साठी काम करीत असताना इराणमधून पाकिस्तानात आलो होतो, आपल्याला अटकेनंतर पाकिस्तानी अधिकार्‍यांनी सन्मानाने वागवले, ... Read More »

आधी विश्वासार्हता जपा

विलिनीकरणाच्या वावड्यांची इतिश्री करीत पक्षाच्या विस्ताराचा कृति-कार्यक्रम मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी नुकताच पक्षाच्या आमसभेत जाहीर केला आहे. गोव्याच्या राजकारणाचे एकंदर रूप पाहिल्यास आपल्या पक्षाचेे स्वतंत्र अस्तित्व ठेवणे हे नेहमीच राजकीयदृष्ट्या फायद्याचे ठरेल हे मगो नेत्यांना पुरेपूर ठाऊक आहे. त्यामुळे पक्ष विलिनीकरणाचा विचारदेखील ते मनात आणणार नाहीत. भारतीय जनता पक्षाने गोव्यात मूळ धरले तेव्हा मगोच्या अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण झाला ... Read More »

चीन, पाकला दणका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आपल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणामध्ये आपले शत्रू कोण आणि मित्र कोण याविषयी रोखठोक भाष्य करण्यात आले आहे. नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे या धोरणामध्ये रशिया व चीन यांना अमेरिकेचे शत्रू मानले गेले आहे, तर भारताला मित्र मानून येणार्‍या काळात उभरत्या भारताशी अधिकाधिक हातमिळवणी करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला आहे. पाकिस्तानलाही या धोरणात स्पष्टपणे फटकार ... Read More »

प्रतीक्षा न्यायाची

‘फिर्यादी पक्ष आपली बाजू मांडण्यास दारूणरीत्या अपयशी ठरला’ अशा शब्दांत निवाडा देत सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दहा वर्षांपूर्वी देशात खळबळ माजवणार्‍या टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सर्व आरोपींना नुकतेच दोषमुक्त केले. आपल्या देशाची न्यायपद्धती लक्षात घेता सीबीआयकडून निश्‍चितच या निवाड्याविरुद्ध वरच्या न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याने ही ‘दोषमुक्तता’ तात्पुरत्या स्वरुपाची आहे. तरीही द्रमुकने काल हा निवाडा साजरा केला आणि कॉंग्रेसने हा घोटाळा उजेडात ... Read More »

कर्नाटकी कावा

‘जे युद्धात कमावले, ते तहात गमावले’ अशी एक म्हण आहे. म्हादईसंदर्भात ती खरी ठरणार नाही अशी अपेक्षा आहे. कर्नाटकमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे आणि भाजपच्या ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ धोरणाच्या कार्यवाहीतील एक महत्त्वाचा अडसर असलेल्या कर्नाटकमध्ये आगामी निवडणुकीत तेथील कॉंग्रेसचे सरकार उलथवून काहीही करून पक्षाची सत्ता आणण्यासाठी भाजपाने कंबर कसलेली आहे. त्यामुळे त्या राजकीय लाभासाठी प्रसंगी म्हादईप्रश्नी गोवा सरकारला ... Read More »

जनहित जपावे

केंद्र सरकार संसदेत संमत करू पाहात असलेला फायनान्शियल रिझॉल्युशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स अथवा एफआरडीए कायदा बँक खातेदारांच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारा असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रस्तावित विधेयकासंदर्भात मत-मतांतरे आहेत, बँक कर्मचारी संघटनांनी त्याविरुद्ध आवाज उठवलेला आहे आणि दिवाळखोरीची वेळ उद्भवल्यास बँक खातेदारांच्या ठेवी बुडण्याची भीतीही विरोधक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सामान्य ... Read More »

गुजरातचा कौल

भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेले गुजरात स्वतःपाशी राखण्यात यश मिळवले असले तरी गुजरातमधील हे यश हिमाचल प्रदेशप्रमाणे नेत्रदीपक नाही. हे राज्य स्वतःपाशी राखण्यासाठी भाजपाला बरेच झुंजावे लागले आहे. त्यामुळे त्यातून मिळत असलेल्या संकेतांचा आणि पूर्वसूचनांचा गांभीर्याने विचार आता त्या पक्षाने करण्याची खरी गरज आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ... Read More »

समरांगण

कॉंग्रेस पक्षाध्यक्षपदी अखेर शनिवारी राहुल गांधी यांची रीतसर प्रस्थापना झाली. मावळत्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे भावपूर्ण भाषण आणि अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतानाचे राहुल यांचे भाषण या दोन्हींमधून सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र होते. तो पक्ष कसा देश तोडणारा आहे आणि कॉंग्रेस कसा जोडणारा पक्ष आहे यावर दोघांनीही भर दिलेला दिसला. कॉंग्रेस पक्ष कालबाह्य झालेला नाही, उलट देशाला आज त्याच्यासारख्या सर्वसमावेशक पक्षाची गरज आहे ... Read More »