ब्रेकिंग न्यूज़

अग्रलेख

गरज सन्मानाची

गेल्या वर्षी हॉलिवूडमध्ये खळबळ माजवणार्‍या ‘मी टू’ चळवळीने आता भारतातील माध्यम आणि मनोरंजन उद्योगामधील बड्या बड्या प्रस्थांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्याने सध्या देश हादरला आहे. अनेकांच्या पायांखालची वाळू या चळवळीमुळे सरकली आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेला आरोप, विनता नंदांनी अभिनेते आलोकनाथ यांच्यावर केलेला आरोप, आणि किमान सहा महिला पत्रकारांनी ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा खासदार एम. जे. अकबर यांच्यावर केलेले ... Read More »

एफडीए सक्षम करा

गोव्यात आयात होणार्‍या मासळीच्या नियमित तपासणीसाठी एका आंतरराष्ट्रीय एजन्सीला कंत्राट देण्याचा निर्णय सरकारमधील तिघा मंत्र्यांच्या समितीने घेतला आहे. मध्यंतरी घडलेल्या फॉर्मेलीन प्रकरणामुळे मत्स्यप्रेमी गोमंतकीयांचा बाजारातील मासळीवरील विश्वास हटल्याने तो पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचा उदात्त दावा या मंत्रिमहोदयांनी केलेला आहे. जागतिक स्तरावर प्रगत देशांमध्ये आयात मासळीच्या तपासणीसाठी बड्या बड्या कंपन्या वावरतात हे जरी खरे असले तरी त्या ... Read More »

पुन्हा पिछाडीवर

कर्नाटकातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीचे लागलेले निकालही विधानसभेप्रमाणेच कॉंग्रेसच्या बाजूने कल दर्शवीत असल्याने भारतीय जनता पक्षासाठी ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे असे म्हणावे लागेल. एकूण २६६४ प्रभागांसाठी झालेल्या या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा कॉंग्रेसच्या पदरात गेल्या आहेत. भारतीय जनता पक्ष द्वितीय स्थानी आहे, तर जनता दल सेक्युलर तिसर्‍या स्थानी आहे. या निवडणुका राज्यातील सत्ताधारी कॉंग्रेस – जेडीएस आघाडीने स्वतंत्रपणे लढवल्या ... Read More »

डोंगर पोखरून उंदीर

मोदी सरकारने दोन वर्षांपूर्वी केलेल्या नोटबंदीद्वारे चलनातून बाद केलेल्या १५,४१७९३ लाख कोटी रू. च्या नोटांपैकी १५,३१,०७३ लाख कोटी रू. च्या म्हणजे जवळजवळ ९९.३ टक्के चलनी नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्याचे अखेर देशासमोर आले आहे. परत आलेल्या नोटांची मोजणी पूर्ण झालेली नाही असे रिझर्व्ह बँकेकडून आजवर सांगण्यात येत होते, परंतु अखेरीस दोन वर्षांनंतर ही मोजणी पूर्ण होऊन अंतिम आकडा आरबीआयच्या यंदाच्या ... Read More »

इंधनाचा भडका

देशामध्ये इंधनाचे दर पुन्हा एकदा कडाडत चाललेले दिसत आहेत. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले विक्रमी अवमूल्यन, इराणसारख्या भारताच्या मोठ्या इंधन पुरवठादारावर अमेरिकेने घातलेले निर्बंध, जागतिक तापमानवाढीवर नियंत्रणासाठी कच्च्या तेलावर लागू करण्यात आलेली नवी मानके अशी अनेक बाह्य कारणे जरी त्यामागे असली, तरीदेखील सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पावले उचलण्याची नितांत आवश्यकता आज भासते आहे. इंधनाचे दर ठरविण्याचा अधिकार भले तेल ... Read More »

‘थिंक टँक’ला दणका

कोरेगाव भीमाचा हिंसाचार आणि त्यानंतर त्याच्या तपासात एका संशयिताजवळ सापडलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाचा आढळलेला कथित उल्लेख याच्या अनुषंगाने काल पुणे पोलिसांनी देशाच्या विविध राज्यांत छापा आणि अटकसत्र अवलंबिले. किमान सहा राज्यांमध्ये कथित माओवादी कार्यकर्त्यांवर ही धडक कारवाई झाली. त्यात वरवरा रावांसारखे विद्रोही कवी आहेत, गोव्यातील साखळीच्या गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील प्राध्यापक आणि विचारवंत, स्तंभलेखक आनंद तेलतुंबडे ... Read More »

मोपाला भाऊंचे नाव

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि खर्‍या अर्थाने लोकनेते स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव मोपा विमानतळाला द्यावे अशी मागणी मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केली आहे. गोव्यातील या प्रस्तावित नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला भाऊसाहेबांसारख्या लोकोत्तर नेत्याचे नाव देणे निश्‍चितपणे अर्थपूर्ण ठरेल आणि त्याला कोणाचा विरोध असण्याचेही काही कारण नाही. मात्र, यापुढे कोणत्याही विमानतळाला व्यक्तींची वा नेत्यांची नावे द्यायची नाहीत असा धोरणात्मक निर्णय ... Read More »

‘धि गोवा हिंदु’ची शताब्दी

गोमंतकीयांच्या ठायी ज्या संस्थांविषयी आपुलकी आणि अभिमान पिढ्यानपिढ्या वसत आला आहे, अशांपैकी एक असलेल्या मुंबईच्या ‘धि गोवा हिंदु असोसिएशन’ ने गेल्या शुक्रवारी २४ ऑगस्टला शतक महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केले. म्हणजेच २४ ऑगस्ट १९१९ रोजी स्थापन झालेली ही संस्था पुढील वर्षी २४ ऑगस्टला आपली शताब्दी साजरी करणार आहे. एखाद्या संस्थेचा रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव, हीरक महोत्सव, अमृत महोत्सव असे एकेक यशाचे टप्पे पार ... Read More »

मोरूची मावशी गेली!

मृत्यू हा कोणत्याही मनुष्याच्या जीवनाचा अपरिहार्य शेवट असतो. कधी ना कधी तो येतोच, परंतु मनुष्यजीवनातील एक शाश्‍वत सत्य असलेला हा मृत्यू जेव्हा एखाद्याला आपल्यातून तडकाफडकी घेऊन जातो, तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनभराच्या वाटचालीची संस्मरणे तेवढी आपल्या हाती उरतात. ही संस्मरणे जेवढी चांगली असतील, तेवढी त्या मृत्यूविषयीची हळहळ अधिक असते. ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांच्या काल भल्या सकाळीच आलेल्या निधनाच्या कटू ... Read More »

ढासळता ‘आप’

आम आदमी पक्षातील बंडाळीने पुन्हा एकवार उचल खाल्लेली दिसते. यावेळी पक्षाचे एक संस्थापक सदस्य आशीश खेतान ‘सक्रिय राजकारणा’तून बाहेर पडले आहेत. बाहेर पडताना त्यांनी भले वैयक्तिक कारणे दिलेली असली, तरीही नवी दिल्लीच्या लोकसभेच्या जागेसाठी त्यांचा विचार पक्षाने न केल्यानेच त्यांनी पक्षापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांच्याकडून नवी दिल्लीत ... Read More »