अग्रलेख

पर्याय गरजेचे

राज्यातील वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन पर्यायी गोष्टींचा विचार सरकार करीत असल्याचे नुकतेच विधानसभेत राज्याचे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. गोव्याची आजची स्थिती पाहता वाहतूक ही मोठी डोकेदुखी ठरलेली आहे. वाहनांची संख्या वाढता वाढता दहा लाखांचा आकडा ओलांडून गेली आहे. त्यांना रस्ते अपुरे पडू लागले आहेत आणि परिणामी अपघातांचे प्रमाणही राज्यात मोठे आहे. सुबत्तेमुळे गोव्यात ... Read More »

त्यागाचा फुगा

संजय बारू यांच्या ‘द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकाचा वाद शमतो न शमतो तोच माजी परराष्ट्रमंत्री के. नटवरसिंग यांच्या ‘वन लाईफ इज नॉट इनफ’ या आत्मकथनपर पुस्तकातील काही तपशिलातून नवा वाद सुरू झाला आहे. नटवरसिंग हे गांधी घराण्याचे निष्ठावंत सेवक होते, त्यामुळे अनेक आतल्या गोष्टी त्यांना ठाऊक असणे हे ओघाने आले. पुढे इराकमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका प्रकल्पात नटवरसिंग यांच्या कुटुंबाला ... Read More »

पुन्हा प्रयत्न हवेत

खास राज्याचा दर्जा द्यावा या गोव्याच्या मागणीची पूर्तता करण्यास नरेंद्र मोदी सरकारनेही अखेर असमर्थता दर्शवली. खास राज्याच्या दर्जाची मागणी गोव्याबरोबरच बिहार, उडिशा, छत्तीसगढ आदी अनेक राज्ये करीत आहेत. अलीकडेच निर्माण झालेल्या तेलंगणाने आणि आंध्र प्रदेशनेही आता ती पुढे रेटली आहे. असे असताना रघुराम राजन समितीने सर्वांत प्रगत म्हणून गौरव केलेल्या गोव्याला खास राज्याचा दर्जा देणे केंद्र सरकारला – भले ते ... Read More »

सुरक्षा गरजेची

बेंगलुरूतील उच्चभ्रूंच्या शाळेमध्ये सहा वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार झाला होता अशा निष्कर्षाप्रत तेथील पोलीस आले आहेत. गेले अनेक दिवस गाजणार्‍या या प्रकरणाला मिळालेले हे नवे वळण आहे. पोलिसांनी या प्रकरणात महंमद मुस्तफा या स्केटिंग इन्स्ट्रक्टरला अटक केली होती. पण प्रत्यक्षात लालगिरी इंद्रगिरी आणि वासीम पाशा या दोघा जिम इन्स्ट्रक्टरांचा या गुन्ह्यात हात असल्याचे नवे पुरावे पोलिसांना मिळाले आणि त्यांनी गुन्ह्याची ... Read More »

मुहूर्तमेढ

गोवा मराठी अकादमी या नव्या सरकारी मराठी अकादमीच्या स्थापनेचे निर्णायक पाऊल सरकारने उचलले आहे आणि येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याचे सोपस्कार पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. विद्यमान गोमंतक मराठी अकादमीसंदर्भातील वाद सामोपचाराने मिटविण्याचे सारे प्रयत्न थकल्यानंतर निरुपाय होऊन सरकारला शेवटी हे पाऊल उचलावे लागले आहे. गोव्यातील समस्त मराठीप्रेमींची स्थिती त्यामुळे आज एका डोळ्यात हासू आणि एका डोळ्यात आसू अशी झाली असेल. ... Read More »

मोगलाई

कर्नाटकमधील येळ्ळूरमध्ये तेथील मराठीजनांनी लावलेला ‘महाराष्ट्र राज्य’ हा फलक प्रशासनाने हटवल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाचे आणि पोलिसांनी केलेल्या दडपशाहीचे जोरदार पडसाद काल महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमाभागात उमटणे स्वाभाविक होते. काल सीमाभागात बंदही पाळला गेला. कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूरच्या घराघरांत घुसून नागरिकांना निर्दयी मारबडव केली, वृद्ध, महिला आणि मुलेही त्यातून सुटली नाहीत. घरांची तावदाने फोडली गेली, बाहेर उभ्या असलेल्या वाहनांची नासधूस केली गेली. ... Read More »

हिंदुत्वाचे नवे कैवारी

आपले बंधू सुदिन ढवळीकर यांच्या प्रमाणेच आता दीपक ढवळीकरही राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून देशभरात जाऊन पोहोचले आहेत. ‘येनकेन प्रकारेण प्रसिद्ध पुरूषो भवेत’ असे संस्कृत सुवचन आहे. त्याप्रमाणे काहीही कारणाने का होईना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासारख्या एका छोट्याशा प्रादेशिक पक्षाच्या या दोघा धुरंधरांना राष्ट्रीय स्तरावर या वादांच्या निमित्ताने अफाट प्रसिद्धी मिळाली. सुदिन यांनी पब संस्कृतीविरुद्ध राग व्यक्त केला होता. दीपक त्याच्या चार पावले ... Read More »

विजय दिवस!

आजच्या २६ जुलै या दिवसाला विशेष महत्त्व आहे आणि त्याचे विस्मरण देशाला कदापि होता उपयोगी नाही, कारण आज कारगिलमधील भारतीय सेनेच्या विजयाला पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. १९९९ च्या फेब्रुवारीमध्ये एकीकडे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानशी मैत्रीचे हस्तांदोलन करीत असताना आणि लाहोर घोषणापत्रातून भारत – पाक मैत्रीची ग्वाही जगाला दिली जात असताना दुसरीकडे स्वतः मुजाहिद्दीन असल्याचे भासवत प्रशिक्षित पाकिस्तानी सैनिकांनी ... Read More »

राडा भोवला

शिवसेनेने दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनामध्ये केलेल्या ‘राडा’ शैलीच्या आंदोलनाला त्यांना अनपेक्षित असलेले धार्मिक वळण मिळाल्याने ते पूर्णपणे अंगलट आले आहे. संसदेमध्येही त्याचे पडसाद गेले दोन दिवस उमटले. सनदशीर मार्गांनी आंदोलन करता येते हे शिवसेनेला स्थापनेपासून कधीच मान्य नव्हते आणि आजही त्यांना ते मान्य झालेले दिसत नाही. त्यामुळे दांडगाईच्या बळावर प्रश्न सोडविण्याची त्यांची आक्रमक वृत्ती दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील गैरसोयींविरुद्धच्या आंदोलनात प्रकटली ... Read More »

अविश्वासाचे धुके

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी, राजकीय दडपणाखाली मद्रास उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधिशास मुदतवाढ देण्याच्या प्रकरणात केलेले आरोप अत्यंत गंभीर असले, तरी ते शब्दशः खरे असल्याचे एव्हाना सिद्ध झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाने न्याय खात्याला १६ जुलै २००५ रोजी पाठवलेले लेखी पत्र माध्यमांच्या हाती लागणे, ते तत्कालीन सरन्यायाधीश लाहोटी यांच्याकडे रवाना करणारे तेव्हाचे कायदामंत्री हंसराज भारद्वाज यांची तसे केल्याची कबुली ... Read More »