अग्रलेख

भ्रष्टाचाराचे आगर

प्राचीन गोमंतकीय ग्रामजीवनाचे एक वैशिष्ट्य असलेल्या, परंतु गोवा मुक्तीनंतर बजबजपुरी आणि भ्रष्टाचाराचे आगर होऊन राहिलेल्या कोमुनिदादींसंदर्भात ठोस पावले उचलण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी विधानसभेत नुकतीच दिली आहे. योग्य नियमनाची ग्वाही देत असतानाच राज्यातील कोमुनिदादींच्या जमिनींवर अतिक्रमण करून उभारलेल्या बेकायदेशीर,अनधिकृत बांधकामांना अभय देण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. नवीन बेकायदा बांधकामे उभी राहणार नाहीत याची दक्षता घेत असताना पूर्वी झालेल्या गैरकृत्यांना अभय ... Read More »

प्रकाशाचा कवडसा हवा

आत्महत्यांच्या घटना राज्यात सातत्याने घडत आहेत. कुंभारजुव्यात परवा झालेली तिहेरी आत्महत्या ही याच शृंखलेतील आणखी एक दुर्दैवी घटना. समाजामध्ये नैराश्य आणि नकारात्मकतेचा हा प्रवाह का निर्माण झाला आहे हा चिंता करण्यासारखा विषय आहे. गोव्यात आत्महत्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त आहे. नॅशनल क्राईब ब्यूरोपाशी सर्वांत ताजी आकडेवारी सन २०१२ ची उपलब्ध आहे. त्या आकडेवारीनुसार आत्महत्यांची राष्ट्रीय सरासरी १० टक्के, तर गोव्यातील ... Read More »

संप कशाला?

वेतनश्रेणीतील तफावतीच्या प्रश्नावरून संपावर जाण्याची तयारी सध्या राज्यातील सरकारी कर्मचारी संघटनेने चालवलेली आहे. अशा प्रकारे संपाची नोटीस देणे हे पूर्णतः बेकायदेशीर कृत्य असून संपाचे हत्यार उगारले गेल्यास सरकार कठोर कारवाई करील असा इशारा मुख्यमंत्र्यांनी सध्या सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात दिलेला आहे. सरकारी कर्मचारी संघटनेने अशा प्रकारे संपाची धमकी देण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. गेल्यावर्षीही विधानसभा अधिवेशन सुरू असताना संपाचे ... Read More »

नांगी ठेचावीच लागेल

इराकमधील आयएसआयएस बंडखोरांच्या चढाईकडे आजवर कानाडोळा करीत इराकपासून यावेळी स्वतःला अलिप्त ठेवू पाहणार्‍या अमेरिकेला अखेर त्या सशस्त्र सुन्नी बंडखोरांवर हवाई हल्ले चढवण्याचा निर्णय घ्यावाच लागला. उशिरा का होईना, बराक ओबामांना हा निर्णय घ्यावा लागला त्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे आयएसआयएसने आता इराकमधील विविध शहरांप्रमाणेच स्वायत्त कुर्दिस्तानच्या प्रदेशाला लक्ष्य करायला सुरूवात केली आहे आणि त्यामुळे तेथील प्राचीन येझिदी जमातीच्या व ... Read More »

मृत्युंजय

दुःख आणि वेदना अनेकांच्या आयुष्यात नैराश्याचे वादळ निर्माण करतात. स्वतःवरचा आणि जीवनावरचा विश्वास डळमळतो आणि अशी माणसे स्वतःच स्वतःभोवती विणलेल्या नकारात्मकतेच्या कोषामध्ये गुरफटून संपून जातात. पण त्या दुःखाचा आणि वेदनांचा बाऊ न करता सोसणे हा धर्म समजून आत्यंतिक सकारात्मकतेने जीवनाला सामोरे जाणारी काही विलक्षण माणसे असतात, ज्यांच्या कर्तृत्वाच्या ध्वजा दशदिशांत फडकल्याविना राहात नाहीत. एकनाथ ठाकूर हे असेच एक व्यक्तिमत्त्व आपल्यातून ... Read More »

अँग्री यंग मॅन

देशात अलीकडच्या काळात घडलेल्या जातीय हिंसाचाराच्या घटनांवर चर्चा व्हावी या मागणीसाठी आक्रमक झालेल्या कॉंग्रेसजनांचे नेतृत्व करीत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लोकसभेत सभापतींपुढील हौद्यात घेतलेली धाव हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. संसदेत आजवर सदैव पिछाडीवर राहत आलेले राहुल अचानक असे आक्रमक का झाले याचा अन्वयार्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावला जातो आहे. राहुल केवळ हौद्यात धाव घेऊनच थांबले नाहीत, तर सभागृहाबाहेर आल्यावर ... Read More »

…चुके काळजाचा ठोका

वयाच्या १७ व्या वर्षी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका, रंगभूमी आणि चित्रपटांतून अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावत असतानाच ३४ व्या वर्षी ‘अस्मिता चित्र’ ही स्वतःची निर्मितीसंस्था, त्याद्वारे उत्तमोत्तम चित्रपट आणि दर्जेदार मालिकांची निर्मिती सुरू असतानाच अवघ्या ५९ व्या वर्षी या दुनियेतूनच एक्झिट… स्मिता तळवलकर यांचा हा अल्प जीवनप्रवास, परंतु आज प्रत्येक मराठी घर त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून हळहळते आहे हे या सार्‍या प्रवासात त्यांनी ... Read More »

तिसरा अहवाल

न्या. एम. बी. शाह आयोगाने झारखंडमधील खाणींबद्दलचा पहिला, उडिशाबद्दलचा दुसरा आणि गोव्याबद्दलचा तिसरा व अंतिम अहवाल परवा संसदेत सादर केला. जे विदारक चित्र गोव्यासंदर्भात यापूर्वी समोर आलेले होते, त्यापेक्षा झारखंड आणि उडिशामधील खाण व्यवसायाची स्थिती काही वेगळी दिसत नाही. झारखंडमध्ये लोहखनिजाचा २२ हजार कोटींचा आणि मँगनीझचा १३८ कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका आयोगाने ठेवलेला आहे, तर उडिशामध्ये खाण कंपन्यांनी बिनदिक्कतपणे खाणपट्‌ट्यापलीकडील ... Read More »

मैत्रीची हाक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेपाळ भेटीतून उभय देशांच्या मैत्रिपूर्ण संबंधांना अधिक दृढ करण्याच्या दिशेने दमदार पावले टाकली गेली आहेत. नेपाळ हे भारताचे केवळ शेजारी राष्ट्र नाही. अतूट सांस्कृतिक धाग्यांनीही ते भारताशी शतकानुशतके जोडले गेलेले आहे. देवतात्मा हिमालय, इतिहास आणि पुराणकथा, लुंबिनी आणि बोधगया, पशुपतिनाथ आणि काशीविश्वेश्वर, असे अनेक धागे या दोन्ही देशांना भावनिकदृष्ट्या एकत्र राखत आले आहेत. मोदींनी नेपाळच्या संसदेमध्ये ... Read More »

पर्याय गरजेचे

राज्यातील वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन पर्यायी गोष्टींचा विचार सरकार करीत असल्याचे नुकतेच विधानसभेत राज्याचे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. गोव्याची आजची स्थिती पाहता वाहतूक ही मोठी डोकेदुखी ठरलेली आहे. वाहनांची संख्या वाढता वाढता दहा लाखांचा आकडा ओलांडून गेली आहे. त्यांना रस्ते अपुरे पडू लागले आहेत आणि परिणामी अपघातांचे प्रमाणही राज्यात मोठे आहे. सुबत्तेमुळे गोव्यात ... Read More »