अग्रलेख

सक्ती नव्हे, स्वेच्छा!

गोव्यात दुचाकींवरील दोन्ही स्वारांना येत्या गांधी जयंतीपासून हेल्मेट सक्ती करण्याची घोषणा सरकारने केली आहे. अर्थात, या घोषणेची प्रत्यक्ष कार्यवाही कितपत होईल हा प्रश्न आज गोमंतकीयांच्या मनात आहे, कारण यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारच्या सक्तीच्या घोषणा झाल्या आणि कालांतराने त्या विरूनही गेल्या. राज्यातील रस्ता अपघातांमध्ये मात्र घट होताना दिसत नाही. गेल्या रविवारी तिघा तरुणांचा दुचाकींच्या अपघातांत बळी गेला. तीन कुटुंबांचा आधार हरपला. ... Read More »

चोरांचा पाहुणचार

केंद्रीय गुप्तचर विभागाचे संचालक रणजित सिन्हा यांच्या घरी विविध सीबीआय खटल्यांतील आरोपींचा राबता होता असा गौप्यस्फोट ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी सिन्हांच्या घरच्या व्हिजिटर्स बुकच्या साह्याने केल्यापासून सीबीआय संचालक अडचणीत आले आहेत. कोळसा घोटाळ्यापासून टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यापर्यंतच्या विविध प्रकरणांना सीबीआय हाताळत असताना त्यातील काही आरोपींनी रणजित सिन्हा यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेण्याचे कारणच काय असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. ... Read More »

काश्मीर संकटात

भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये सध्या पुराने थैमान घातले आहे. राज्यातील जवळजवळ अडीच हजार गावे अतिवृष्टी आणि पुराने प्रभावित झालेली असून चारशे गावे तर पाण्याखाली गेली आहेत. दुथडी भरून वाहणार्‍या नद्यांच्या प्रवाहात जवळजवळ पन्नास पूल वाहून गेले, घरेदारे पाण्याखाली गेली, हजारो कि. मी. चे रस्ते उखडले गेले. हजारोंना बेघर व्हावे लागले आहे. काश्मीरमधील हे संकट अभूतपूर्व आहे खरे. गेल्या किमान सहा ... Read More »

नवा धोका

अल कायदाने भारतीय उपखंडामध्ये आपली नवी शाखा निर्माण केल्याची अल जवाहिरीची घोषणा देशात दहशत निर्माण करण्यास पुरेशी असली, तरी प्रत्यक्षात या घोषणेमागे अल कायदाची अगतिकताच असल्याचे दिसून येत आहे. इराक व सिरियामध्ये आयएसआयएसने आगेकूच करून स्वतःची ‘खिलाफत’ जाहीर केल्यापासून अल कायदाचा जगभरातील इस्लामी दहशतवादी गटांवरील प्रभाव ओसरू लागला आहे. ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने खातमा केल्यानंतर सातत्याने द्रोण विमानांच्या हल्ल्यांद्वारे अमेरिकेने ... Read More »

संवादाचा वाद

आजचा शिक्षक दिन ‘गुरू उत्सव’ म्हणून साजरा करण्याचा फतवा मोदी सरकारने काढला आहे. ते स्वतः आज देशभरातील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यांचे ते भाषण देशातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश जारी झाले आहेत. हे भाषण प्रक्षेपित करण्यासाठी दूरचित्रवाणी संच, इंटरनेटची व्यवस्था मुख्याध्यापकांनी करावी, शालेय विद्यार्थ्यांचे वर्ग सकाळी असले, तरी त्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी दुपारी होणार्‍या या थेट प्रक्षेपणाला ... Read More »

सैतानी पाश

इराकमधील आयएसआयएसच्या इस्लामी बंडखोरांनी स्टीव्हन सॉटलॉफ या आणखी एका अमेरिकी पत्रकाराचा निर्घृण शिरच्छेद करून आपल्या सैतानी वृत्तीचे पुन्हा एकदा दर्शन घडवले आहे. यापूर्वी जेम्स फॉली या पत्रकारालाही त्याच पद्धतीने ठार मारण्यात आले होते. इराकमधील हवाई हल्ले थांबवणार नसाल तर एकामागून एक अमेरिकी लोकांना असेच ठार मारले जाईल असा इशाराही आयएसआयएसने दिला आहे. अमेरिकेच्या अचूक हवाई हल्ल्यांशी मुकाबला करण्याची कोणतीही क्षमता ... Read More »

शरीफ कोंडीत

पाकिस्तानमध्ये गेल्या स्वातंत्र्यदिनापासून सुरू झालेली पाकिस्तान तेहरिक ई इन्साफ आणि पाकिस्तान अवामी तेहरिकच्या हजारो समर्थकांची निदर्शने अद्याप शमलेली नाहीत आणि जोवर नवाज शरीफ सरकार राजीनामा देत नाही, तोवर निदर्शनांचा हा जोर असाच राहील अशा डरकाळ्या आंदोलकांचे नेते इम्रान खान आणि ताहिरुल कादरी फोडत राहिले आहेत. आंदोलकांनी सरकारी मालकीच्या पीटीव्हीचा काही काळ ताबा घेतला, संसदेमध्येही ते घुसले, तरीही शरीफ सरकार त्यांच्याविरुद्ध ... Read More »

मैत्रीचा उगवता सूर्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान भेटीतून दोन्ही देशांमधील मैत्रिपूर्ण संबंधांचे एक नवे पर्व सुरू होण्याची आशा जागली आहे. काल दोन्ही देशांत पाच करारही करण्यात आले. जपान आणि भारत यांचे संबंध पूर्वापार चालत आले आहेत आणि सहाव्या शतकात भारतातून जपानमध्ये पोहोचलेला बौद्ध धर्म हा दोन्ही देशांना जोडणारा बळकट सांस्कृतिक दुवा आहे. येथे आवर्जून नमूद करण्याजोगी बाब म्हणजे सोळाव्या शतकात जपानी गोव्याच्या ... Read More »

पुन्हा पुस्तक बॉम्ब

देशात ऐतिहासिक परिवर्तन घडून केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून मागील सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढणार्‍या आणि डॉ. मनमोहनसिंग, सोनिया गांधी आदी कॉंग्रेसी नेत्यांच्या प्रतिमेला कलंकित रूपात पुढे आणणार्‍या पुस्तकांची जणू मालिकाच सुरू झाली आहे. संजय बारू, के. नटवरसिंग यांच्या पाठोपाठ नवे पुस्तक येत्या पंधरा सप्टेंबरला प्रकाशित होणार आहे ते माजी महालेखापाल विनोद राय यांचे. कोळसा घोटाळा आणि टूजी स्पेक्ट्रम घोटाळा ... Read More »

नमन गणेशा

गणराया, तुझ्या आगमनासरशी चार दिवस तरी हमखास ‘अच्छे दिन’ येणार आहेत. एरवी रोजच्या जगण्याचे तेच ते प्रश्न आणि तोच संघर्ष. तरीही त्यातून वाट काढत असताना तुझ्या उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी हे अच्छे दिन येतात, आबालवृद्धांच्या मनात नव्या उत्साहाची कोवळी किरणे पेरून जातात. बाप्पा, तुझ्यापुढे दरवर्षी काय ते रोजचे रडगाणे गायचे! जगण्याची आव्हाने काही केल्या बदलत नाहीत. तीच भडकती महागाई आणि तोच ... Read More »