अग्रलेख

पुन्हा न्यायालयात

राज्यातील खाण पट्टे पुन्हा मूळ मालकांनाच चालवू देण्याच्या राज्य सरकारच्या नव्या धोरणावरून सध्या वादळ उठले आहे. पर्यावरणवादी त्याविरुद्ध पुन्हा न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत आणि सरकारचे हे धोरण म्हणजे चोराच्या हाती जामदारखान्याच्या किल्ल्या पुन्हा सोपविण्याचाच प्रकार आहे अशी टीका त्यांनी चालवली आहे. याउलट राज्य सरकारने हा जो निर्णय घेतला, तो खाणपट्टेधारकांसाठी नैसर्गिक न्यायाचे तत्त्व अवलंबून आणि खाण अवलंबितांचे हित लक्षात ... Read More »

स्वच्छ भारतासाठी

आजच्या गांधीजयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून देशभरात ‘स्वच्छ भारत’ मोहिमेची सुरूवात झाली आहे. ही मोहीम अर्थातच प्रतिकात्मक आहे. नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेच्या जाणिवेचे बीजारोपण करणे हा या सार्‍या उपक्रमामागील हेतू आहे. गांधीजी हे स्वच्छतेचे भोक्ते होते हे सर्वज्ञात आहे. त्यांच्या अंगावर एकच आखूड पंचा असे, पण तो मळका, फाटका नसे, तर स्वच्छ आणि नेटका असे, अशी आठवण त्यांच्या ... Read More »

चलेंगे साथ साथ

भारत आणि अमेरिका यांच्यातील एका नव्या मैत्रीची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताज्या अमेरिका भेटीतून होऊ घातली आहे. अमेरिकेतील भारतीयांच्या मनातील मोदींचे स्थान, त्यांचे तेथे झालेले अत्यंत उत्साही स्वागत यातून योग्य तो संदेश मोदींकडे आजवर साशंकतेने पाहात आलेल्या अमेरिकेत गेला आहे. काही झाले तरी अमेरिका हा आजच्या घडीस या जगातील सर्वांत प्रबळ देश आहे. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशाकडे तुच्छतेने पाहण्याची ... Read More »

मोदी मंत्र

न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतील एकूण समारंभ एखाद्या बड्या कॉन्सर्टसारखा होता आणि जोष, जल्लोषात कुठेही कमी नव्हती. स्वतः श्री. मोदी यांचे सत्तर मिनिटांचे भाषणही उत्स्फूर्त आणि तरीही सूत्रबद्ध होते. उपस्थित अठरा हजार प्रेक्षकांचा खास अमेरिकी शैलीत वाक्यावाक्याला मिळणारा प्रतिसाद मोदींचे भाषण अधिक खुलवून गेला. या सार्‍या जल्लोषी वातावरणातून मोदीं जे साध्य करू पाहात होते, ते ... Read More »

साप उलटला

संयुक्त राष्ट्र आमसभेमध्ये काश्मीरचा प्रश्न उपस्थित करून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी स्वदेशातील आपले स्थान बळकट करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. गेले काही महिने पाकिस्तानातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. इम्रान खान आणि ताहिरुल कादरी यांनी केलेली जोरदार घेराबंदी, बेनझीरचा मुलगा बिलावलने थोपटलेले दंड या सार्‍या पार्श्वभूमीवर आपण भारतविरोधाची ढाल घेतली नाही, तर आपल्या राजकीय कारकिर्दीवर जमू लागलेले अविश्वासाचे ढग ... Read More »

रान मोकळे

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून गेले कित्येक दिवस चाललेली नौटंकी अखेर संपली. एकीकडे शिवसेना – भाजप आणि दुसरीकडे राष्ट्रवादी – कॉंग्रेस यांनी काडीमोड घेतला. आता प्रत्येकजण ‘स्वबळा’ वर निवडणूक लढवायला म्हणजे खरे तर एकमेकांच्या पायांत पाय अडकवण्यास मोकळा झाला आहे. विद्यमान परिस्थितीत होणार असलेल्या बहुरंगी लढतींतून येणारे निकाल कसे असतील हे सांगणे कठीण ठरेल. बहुतेक ठिकाणी मतविभाजन आता अटळ असल्याने मतांचे ... Read More »

‘मेक इन इंडिया’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या घोषणेस अनुसरून ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा शुभारंभ काल दिल्लीच्या विज्ञान भवनात मोठ्या थाटामाटात झाला. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचा मोदींचा हा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अवघ्या महिन्याभरात प्रयत्न सुरू झाले ही आश्वासक बाब आहे. आपल्या अमेरिकाभेटीच्या पूर्वसंध्येला झालेला हा उपक्रम मोदींची जागतिक प्रतिमा उजळेल यात शंका नाही. या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेतून भारतीय उत्पादनक्षेत्रामध्ये ... Read More »

अभिमानास्पद!

कालची सकाळ समस्त भारतीयांसाठी एक अभिमानास्पद क्षण घेऊन अवतरली. अगदी नियोजनबरहुकूम आपले ‘मंगलयान’ मंगळाच्या कक्षेमध्ये अलगद शिरले आणि भारतीयांच्या बुद्धीची झेप कुठवर जाऊ शकते, याचे झगमगते दर्शन जगाला पुन्हा एकदा घडले. भारतीय शास्त्रज्ञांनी चंद्रापाठोपाठ मंगळाला गवसणी घातली आहे हे तर खरेच, परंतु या यशाचे आणखी अनेक पैलू आहेत, ज्यामुळे हे यश अधिकच झळाळून उठले आहे. पहिली बाब म्हणजे ६६६ दशलक्ष ... Read More »

दांडगाई सुरूच

लडाखच्या पूर्व सीमेवर भारत आणि चीनच्या लष्करादरम्यान गेले काही दिवस सुरू असलेले शीतयुद्ध अजून संपुष्टात आलेले नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग एकीकडे भारताशी मैत्रीचे वायदे करून गेले, उभय देशांमध्ये अनेक करार झाले, मोदींसमवेत प्रीतीभोजनही केले, परंतु दुसरीकडे लडाखमध्ये चौदा – पंधरा हजार फुटांवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे हजारभर सैनिक भारतीय सैनिकांना मागे हटण्यासाठी धमकावत गेले दहा – बारा दिवस तळ ... Read More »

तणातणी

महाराष्ट्रातील शिवसेना आणि भाजपामधील गेले काही आठवडे सुरू असलेली तणातणी मिटण्याचे नाव घेताना दिसत नाही. मतदार मुकाट्याने हा तमाशा पाहात आहेत. येणार्‍या विधानसभा निवडणुकीनंतर आपले सरकार येणार आहे याची जणू या मंडळींना पुरेपूर खात्रीच दिसते. पण नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल लक्षात घेतले, तर केवळ मोदी लाटेच्या आधारे निवडणूक जिंकण्याचे दिवस राहिलेले नाहीत. ती लाट ओसरली की काय असा प्रश्न उपस्थित ... Read More »