अग्रलेख

असुरक्षिततेचे भांडवल

आसाममधील उल्फाशी अल कायदाने संधान साधले असल्याची भीती त्या राज्याचे मुख्यमंंत्री तरुण गोगोई यांनी व्यक्त केली आहे, ती अनाठायी नाही. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमधील भारतविरोधी दहशतवादी शक्ती नक्षलवाद्यांशी आणि ईशान्येकडील फुटीर गटांशी हातमिळवणी करण्यासाठी धडपडत असल्याच्या वार्ता गुप्तचर यंत्रणांना मिळत आल्या आहेत. त्यामुळे सध्या बंदी असलेल्या पण एकेकाळी आसाम पेटवलेल्या उल्फाशी खरोखरच अल कायदाने संपर्क प्रस्थापित केलेला असेल, तर ती ... Read More »

बेटर टुगेदर!

‘युनायटेड किंग्डम’ मधून फुटून निघण्यास स्कॉटलंडच्या ५५ टक्के जनतेने अखेर कालच्या सार्वमतात नकार दर्शविला. त्यामुळे ४५ टक्के लोकांनी जरी स्वतंत्र स्कॉटलंडच्या बाजूने मतदान केलेले असले, तरी अखेर त्यांचे पारडे वरच राहिले. अर्थात, हा निकाल अनपेक्षित मुळीच नव्हता, कारण या सार्वमतासंदर्भात यापूर्वी झालेल्या सर्व सर्वेक्षणांमध्ये वेगळे होऊ न इच्छिणार्‍या जनतेचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले होते. खरे तर ‘स्वातंत्र्य’ ही बाब ... Read More »

झीरो टॉलरन्स!

रोजच्या बातम्यांच्या धबडग्यात एका बातमीने सर्वसामान्य वाचकांचे लक्ष निश्‍चितपणे वेधून घेतले असेल, ती म्हणजे म्हापशाच्या सहायक वाहतूक संचालकांच्या कार्यालयातील मीना तुयेकर नामक एका कनिष्ठ महिला कारकुनाला तीनशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. हणजूण येथील ज्या अनिकेत साळगावकर या तरुणाने या लाचखोर महिलेविरुद्ध दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे रीतसर तक्रार करण्याचे कष्ट घेतले, त्याचे आम्ही येथे जाहीर अभिनंदन करतो. आपल्या रोजच्या ... Read More »

ड्रॅगन आणि हत्ती

एकीकडे पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैनिक भारतीय सैनिकांची सातत्याने कुरापत काढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तीन दिवसांच्या भारतभेटीवर सपत्निक आले आहेत. चीन भारताशी मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करून त्याचे पुरेपूर व्यापारी फायदे उठवू पाहात असला, तरी त्याची एकंदर नीती पाकिस्तानप्रमाणेच सदैव संशयास्पद राहिली आहे. तिबेटमधील चीनचा वाढता वावर, रस्ते आणि रेल्वेद्वारे सीमावर्ती भागांमध्ये सैन्य दळणवळण अधिक ... Read More »

लाट ओसरली?

देशाच्या विविध राज्यांत लोकसभेच्या तीन व विधानसभांच्या ३३ जागांसाठी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीने भारतीय जनता पक्षाचे हवेत तरंगणारे पाय पुन्हा जमिनीवर आणले आहेत. ज्या गुजरात आणि राजस्थानमध्ये मोदी लाटेने गेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा मिळवून विरोधकांचा पूर्ण सफाया केला होता, तेथे कॉंग्रेसला डोके वर काढण्याची संधी या पोटनिवडणुकीत कशी मिळू शकली आणि उत्तर प्रदेशमध्ये जेथे गेल्या लोकसभा निवडणुकीत ऐंशीपैकी ७१ ... Read More »

नवा कायदा

देशातील रस्ता अपघातांचे प्रचंड प्रमाण ही नेहमी चिंतेची बाब राहिली आहे. जगात सर्वाधिक रस्ता अपघात भारतात होतात. वर्षाला किमान पाच लाख अपघात होऊन त्यात जवळजवळ एक लाख चाळीस हजार लोकांचा मृत्यू ओढवतो. ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने केंद्रीय मोटारवाहन कायद्यामध्ये आमूलाग्र सुधारणा करणारे पाऊल उचलले आहे. संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात त्यासंबंधीचे रस्ता सुरक्षा व वाहतूक विधेयक, २०१४ मांडले ... Read More »

लाथाळ्या नकोत

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पुढील महिन्यात घेण्याचे जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख आघाड्यांमधील सुप्त संघर्षाला अधिक धार चढू लागल्याचे दिसते. विशेषतः भाजप – शिवसेना आणि इतर मित्रपक्षांच्या महायुतीमध्ये गेले काही दिवस जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार या दोन मुद्द्यांवरून जी तणातणी चालली आहे, तिचे निर्णायक पर्व आता सुरू झाले आहे. शनिवारी सेनेच्या मुखपत्रामध्ये – ‘सामना’ मध्ये जो अग्रलेख आला, त्यामध्ये ... Read More »

खरी कसोटी

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीची तारीख काल जाहीर झाली. पुढील महिन्यात पंधरा ऑक्टोबरला तेथे निवडणूक होईल आणि सत्ता कोणाच्या पारड्यात जाते ते एकोणिस ऑक्टोबरला स्पष्ट होईल. गेल्या लोकसभा निवडणुकीतील परिवर्तनाची अभूतपूर्व लाट कितपत टिकलेली आहे आणि किती ओसरलेली आहे, त्याचे सुस्पष्ट दर्शन या निवडणुकीत घडणार असल्याने त्याविषयी उत्सुकता आहे, कारण हरियाणात कॉंग्रेस, तर महाराष्ट्रात कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी सत्तेत ... Read More »

भ्रमनिरास!

राज्यातील ट्रक, बार्ज आणि खाण यंत्रसामुग्री धारकांसाठी सरकारने अधिसूचित केलेल्या कर्जमुक्ती योजनेेचे एकंदर स्वरूप पाहून, सरकारकडून मोठे घबाड मिळवण्याची अपेक्षा बाळगून आजवर हवेत तरंगणार्‍या खाण अवलंबितांचे पाय एव्हाना जमिनीवर आले असतील. सरकार आपले सगळेच्या सगळे कर्ज फेडील किंवा त्यासाठी आपल्या हाती भरभक्कम रक्कम ठेवील अशा भ्रमात ही मंडळी होती. त्यामुळे सरकार कर्जाचा केवळ पस्तीस टक्के भार उचलणार आहे हे कळल्यावर ... Read More »

त्याच चुका, त्याच त्रुटी

पूरग्रस्त जम्मू काश्मीरमध्ये आणि विशेषतः श्रीनगरमध्ये गेले चार दिवस सर्वसामान्य नागरिकांची जी परवड चालली आहे, ती पाहिली तर तेथे राज्य सरकार अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, भारतीय वायूसेना आणि लष्कर यांचे मदतकार्य अहोरात्र सुरू आहे, परंतु स्थानिक प्रशासन मात्र पूर्णपणे कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. विविध मदत यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे स्थानिक नागरिकांचा रोष ... Read More »