अग्रलेख

बळीराजाचे नुकसान

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्‌ट्याचा परिणाम म्हणून गोव्यात गेले काही दिवस संततधार सुरू आहे. अनेक भागांत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊसही झाला. या अवकाळी पावसामुळे अर्थातच कापणीसाठी सज्ज असलेले भात पीक आडवे झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास असा निसर्गाच्या एका फटक्यात हिरावला गेल्याने खेड्यापाड्यांतील शेतकरीवर्ग आज हवालदिल झालेला दिसतो. अनेक शेतकर्‍यांनी दिवाळीपूर्वी आपली भातकापणी आटोपलेली असली, तरी कित्येक ... Read More »

पुन्हा दहशत

एअर इंडियाच्या विमानांमध्ये आत्मघाती हल्लेखोर आज घातपात घडवून आणतील अशा धमक्या मिळाल्याने देशातील विमानतळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. धमकीचा हा ईमेल हे कोण्या पोराटोराचे काम असेल म्हणून दुर्लक्ष करता येत नाही, कारण आयएसआयएस आणि अल कायदा यांनी देशात घातपात घडवण्याचा मोठा कट रचलेला आहे अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना यापूर्वीच मिळालेली आहे. त्यामुळे अशी कोणतीही धमकी गांभीर्यानेच घ्यावी लागेल. आयएसआयएसच्या ... Read More »

पक्षहित की देशहित

शेकडो धनाढ्य भारतीयांनी विदेशांतील बँकांमध्ये दडवून ठेवलेल्या काळ्या पैशाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर काळा पैसेवाल्यांची पाठराखण करण्याची आरोप करीत आलेल्या नव्या सरकारनेही जेव्हा सर्वोच्च न्यायालयापुढे त्या खातेदारांची नावे उघड करता येणार नाहीत अशी भूमिका घेतली, तेव्हा त्यातून आरोप – प्रत्यारोपांना तोंड फुटणे स्वाभाविक होते. कॉंग्रेस आणि भाजपा नेत्यांमध्ये सध्या त्यावरून टोले – प्रति ... Read More »

मान्य तर करा!

महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकीत तिसर्‍या जागी फेकल्या गेलेल्या कॉंग्रेसमध्ये अद्यापही या पराभवाच्या पुनरावृत्तीची कारणमीमांसा करण्याची निकड दिसून येत नाही. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा गेल्या लोकसभा निवडणुकीतून व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतून स्पष्टपणे दिसून आल्या असल्या, तरी त्याविरुद्ध ब्र काढण्याची हिंमत कोणी दाखवताना दिसत नाही, उलट ताज्या पराभवाचे खापर दोन्ही राज्यांतील स्थानिक नेतृत्वावर फोडून कॉंग्रेसचे केंद्रीय नेते मोकळे ... Read More »

शुभ दीपावली

नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु… महाराष्ट्रवाल्मिकी ग. दि. माडगुळकरांनी ‘श्रीसंत निवृत्ती ज्ञानदेव’ या संतपटासाठी अगदी ज्ञानेश्वरांच्या शैलीत हे अर्थपूर्ण गीत रचले. प्रकाश उजळतो तेव्हा नुसता भोवतालचा अंधार मिटत नाही. आपल्या मनातल्या अंधाराचे सांदिकोपरेही उजळू लागतात आणि चैतन्य त्याची जागा घेते. प्रकाशाचे महत्त्व हे असे आहे. प्रकाशाच्या मानवी शरीरावर घडणार्‍या बर्‍यावाईट परिणामावर वैज्ञानिक संशोधनही झालेले आहे ... Read More »

रुसवे फुगवे

महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंग काल सुटू शकला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला सरकार स्थापनेसाठी बाहेरून बिनशर्त पाठिंबा जरी जाहीर केलेला असला, तरी अद्याप भाजपने तो पाठिंबा स्वीकारत असल्याचे चुकूनही म्हटलेले नाही आणि त्यांनी तो स्वीकारणे हा जनतेचा विश्वासघात ठरेल. ज्या पक्षाला ‘नॅशनल करप्शन पार्टी’ म्हणत मोदींनी लक्ष्य केले, त्याचाच पाठिंबा केवळ सत्तेसाठी घेणे हे पक्षाची प्रतिमा मलीन करून जाईल. भाजप नेत्यांनाही याची ... Read More »

भगवा फडकला!

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने अपेक्षेनुरुप नेत्रदीपक यश मिळवले आहे. मात्र, महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या, तरी स्वबळावर सरकार स्थापन करण्याएवढ्या जागा त्यांना मिळू शकलेल्या नाहीत. साहजिकच पुन्हा एकदा शिवसेनेला आपल्या मागण्या ताणून धरण्याची संधी मिळाली होती, परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतःहून भाजपाच्या सरकारला बाहेरून बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा करून सेनेची सौदेबाजीची संधी घालवली. महाराष्ट्रात शिवसेना हा भाजपाचा ... Read More »

सज्जता आहे?

अल कायदा आणि आयएसआयएस यांनी मिळून गोव्यासह देशातील काही महत्त्वाच्या पर्यटनकेंद्रांवर घातपात घडवून आणण्याचा इशारा राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या प्रमुखांनी नुकताच दिला आहे. अल कायदाने भारतात आपली शाखा स्थापन केल्याचे अलीकडेच जाहीर केले होते. तिकडे इराक आणि सीरियामध्ये बराच मोठा भूभाग गिळंकृत करून तेथे आपली राजवट स्थापन करणार्‍या आयएसआयएसला भारतात विशिष्ट घटकांकडून समर्थन मिळू लागल्याच्या बातम्याही अधूनमधून येत असतात. मुंबईचे काही ... Read More »

श्रमेव जयते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदग्रहण केल्यापासून सरकारी यंत्रणेमध्येही आमूलाग्र परिवर्तन आणण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न चालविला आहे, त्याचा भाग म्हणून त्यांनी काल बहुप्रतीक्षित मजूर सुधारणांचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे यश ज्या अनेक गोष्टींवर अवलंबून आहे, त्यामध्ये मजूर कायद्यांमध्ये व एकूण औद्योगिक कामगारविषयक नीतीमध्ये आमूलाग्र सुधारणा ही एक आवश्यक गोष्ट आहे यात शंका नाही. लाल ... Read More »

नवी उभारी

कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी पदभार स्वीकारताना सुरूवात तर मोठी दणक्यात केली. नुकतीच हकालपट्टी झालेले माजी प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांच्या मनमानीमुळे दुखावलेेले आणि पक्षापासून दूर राहिलेले सगळे रथी – महारथी लुईझिन यांच्या स्वागतासाठी जातीने हजर राहिले होते. त्यातून गोव्यातील कॉंग्रेस पक्ष एकसंध आहे असे चित्र जरी निर्माण झाले असले, तरी ही एकजूट कितपत खरी आणि कितपत खोटी हे स्पष्ट ... Read More »