अग्रलेख

भगव्या वाटेने

दिल्लीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी उडालेली असतानाच किरण बेदी यांच्यासारख्या वलयांकित सामाजिक कार्यकर्त्या भाजपमध्ये प्रवेशल्या आहेत. खुद्द अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात बहुधा त्यांना उभे केले जाईल, नपेक्षा किमान त्यांच्या विरोधात प्रचारासाठी एक हुकुमी अस्त्र म्हणूनही त्यांचा भाजपला उपयोग होईल. त्या दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, याचे सूतोवाच काल भाजपाध्यक्ष अमित शहांनी पत्रकार परिषदेत केले, परंतु त्या कोणाविरुद्ध लढणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवले ... Read More »

प्रश्न अनुत्तरित

सध्या सर्वत्र न्यायालयीन लढायांनी घेरल्या गेलेल्या देशातील खाण व्यवसायाची कोंडी फोडण्यासाठी केंद्र सरकारने एमएमडीआर कायद्यात सुधारणा केल्या आणि अध्यादेशाद्वारे त्या वेगाने अमलात आणण्याचाही प्रयत्न केला. राष्ट्रपतींनी या अध्यादेशास आपली संमती दिलेली असल्याने लवकरच हा सुधारित कायदा लागू होईल. गेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनेही या कायद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते विधेयक मुदत संपल्याने निकाली निघाले. आता या कायद्यातील ... Read More »

दिल्लीची लढाई

दिल्लीमध्ये निवडणुकीचे पडघम निनादले आहेत. लवकरच म्हणजे येत्या सात फेब्रुवारीला तेथे निवडणूक होणार आहे. निवडणुकीनंतर आपला पक्ष आम आदमी पक्षाला पाठिंबा देईल असे शीला दीक्षित म्हणाल्या, त्या अर्थी दिल्लीमध्ये पंधरा वर्षे सत्ता उपभोगणारी कॉंग्रेस आधीच आपला पराभव मान्य करून बसली आहे. त्यामुळे यावेळी दिल्लीत खरा सामना मोदी आणि केजरीवाल यांच्यातच होईल हे उघड आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या सातपैकी सातही ... Read More »

यात खुले काय?

गोमंतक मराठी अकादमीने ३०० जणांना मानद सदस्यत्व प्रदान करण्याची तयारी दर्शविली आहे आणि त्या बदल्यात, सरकारने अकादमीचे बंद केलेले अनुदान पुन्हा सुरू करावे अशी मागणी पुढे रेटली आहे. मराठी अकादमी ही मूठभरांची मिरास बनलेली आहे व सर्व मराठीप्रेमींना ती खुली नाही असे आक्षेप घेण्यात आले तेव्हा विष्णू वाघ यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने त्या आरोपांना दुजोरा देणारा अहवाल दिला आणि सरकारने ... Read More »

श्रीलंकेत परिवर्तन

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांना तेथील अल्पसंख्यक मतदारांनी पराभवाची धूळ चारली आहे. सिंहलींची मते त्यांच्या पारड्यात भरभरून पडलेली असली, तरी तामीळ आणि मुस्लीम मतदारांनी त्यांची हुकूमशाहीच्या वाटेने गेलेली राजवट पूर्णपणे नाकारली. दक्षिण श्रीलंकेतील सिंहलीबहुल मतदारसंघांमध्ये मतांची आघाडी घेऊनही अल्पसंख्यकबहुल उत्तर आणि ईशान्य भागांतील मतदारांनी त्यांना पूर्णपणे नाकारले. राजपक्षे यांना त्या भागात तीन लाख, तर त्यांचे प्रतिस्पर्धी मैत्रीपाल श्रीसेना यांना पावणेदहा ... Read More »

काटकसर

सरकारी तिजोरीतील खडखडाट आता जाणवू लागल्याने राज्य प्रशासनाने सर्व खात्यांना काटकसरीचे आदेश दिले आहेत. सरकारी खर्चाने विदेश दौरे करण्यास येत्या जूनपर्यंत बंदी घालण्यात आली आहे, नियोजनेतर खर्चात किमान वीस टक्के कपात करण्यास सांगण्यात आले आहे, तर खात्यांच्या मासिक खर्चावरही पुढील दोन महिने मर्यादा घालण्यात आली आहे. हे सगळे उपाय अपरिहार्य व आवश्यक आहेत यात शंकाच नाही. केंद्र सरकारचे पॅकेज अद्याप ... Read More »

हा तर पराभव

अत्याधुनिक कलाश्‍निकोव्हच्या सुसाटत आलेल्या गोळ्यांपुढे अखेर ‘शार्ली एब्दो’ च्या व्यंगचित्रकारांचे बोचरे कुंचले निष्प्रभ ठरले. त्या फ्रेंच व्यंगचित्र साप्ताहिकाचा संपादक स्टीफन चार्बोनियर आणि जीन काबू, जॉर्ज वोलिन्स्की आणि टिग्नौस ऊर्फ बर्नार्ड वेल्हॅक या तीन आघाडीच्या व्यंगचित्रकारांसह बारा जणांचा या हल्ल्यात बळी गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हा आजवरचा जगातला एक सर्वांत भीषण घाला आहे. ‘शार्ली एब्दो’ हे साप्ताहिक सातत्याने प्रेषित महंमदाची खिल्ली उडवणारी ... Read More »

सत्य उजेडात

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्याच असल्याच्या निष्कर्षाप्रत येण्यास दिल्ली पोलिसांना एक वर्ष लागले. गेल्या वर्षी सतरा जानेवारीला सुनंदा दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या आधल्याच दिवशी पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार आणि सुनंदा यांच्यात ट्वीटरयुद्ध झडले होते. आपले पती शशी थरूर यांनी मेहरशी सुत जुळवले असल्याचा संशय सुनंदा यांना होता. त्यातून त्यांचे वैवाहिक संबंध बिघडले होते. ... Read More »

सरकारचे संकल्प

गोवा सरकारने आयटी हॅबिटॅट आणि इलेक्ट्रॉनिक सिटीची संकल्पना पुन्हा एकवार पुढे रेटली आहे. रोजगारनिर्मितीच्या दृष्टिकोनातून या दोन्ही औद्योगिक वसाहतींची गरज गोव्याला आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योग हे गोव्यासारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेशास अनुरूप जरी असले, तरी या संदर्भात यापूर्वी झालेल्या प्रयत्नांचा पूर्वानुभव काही चांगला नाही. वेर्ण्याला अशाच प्रकारची इलेक्ट्रॉनिक सिटी उभारण्याचा संकल्प तत्कालीन सरकारने सोडला होता, परंतु त्या क्षेत्रातील काही मोजके उद्योगच ... Read More »

भीषण अपघात

रायबंदर येथील भीषण अपघातात चौघांचा अंत होण्याची दुर्घटना कोणाच्याही ह्रदयाला पाझर फोडणारी आहे. मात्र, अशा दुर्घटनांपासून बोध घेऊन गोमंतकीय वाहनचालक आपल्या बेशिस्त व बेदरकार गाडी चालवण्याला पायबंद घालणार आहेत का हा खरा प्रश्न आहे. देशातील सर्वाधिक बेशिस्त वाहतूक असलेल्या राज्यांपैकी गोवा हे एक आहे हे आधी आपल्याला मान्य करावे लागेल. मद्यपान करून वाहने चालवणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे, वेगमर्यादेचे ... Read More »