अग्रलेख

अमानुष..

वास्कोतील दुहेरी खून प्रकरणाचे धागेदोरे अखेर धाकट्या सुनेपर्यंत येऊन पोहोचले आणि तिने पोलिसांच्या अथक प्रयत्नांअंती गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. एखाद्या सराईत गुन्हेगारासारखी आपल्या सासूची आणि जावेची हत्या करणार्‍या प्रतिमा नाईकच्या रूपात जणू घरोघरी पाहिल्या जाणार्‍या कलह – कारस्थानांच्या दूरचित्रवाणी मालिकांतील कारस्थानी सूनच अवतरली आहे. एका सरळमार्गी मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये असे काही घडू शकते याचा कोणी विचारही करू शकत नाही एवढी ही ... Read More »

पैसा आला कोठून?

राजकारणातील शुचिता आणि नैतिकतेचे परमोच्च पाठ सांगत आलेल्या आम आदमी पक्षाला बोगस कंपन्यांकडून मिळालेल्या दोन कोटींच्या देणगीने दिल्लीतील निवडणुकीच्या ऐन तोंडावर पक्षाच्या विश्वासार्हतेविषयी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथक नेमून सगळ्याच राजकीय पक्षांना मिळणार्‍या देणग्यांची पार्श्वभूमी तपासावी अशी मागणी आता पक्षाने केली असली, तरी त्याने या संशयाचे निराकरण होत नाही. दि. १२ एप्रिल २०१३ रोजी ... Read More »

मोपा हवाच!

मोपा विमानतळासाठी घेण्यात आलेल्या पर्यावरणविषयक जनसुनावणीत बहुसंख्य उपस्थितांनी उत्तर गोव्याच्या विकासाची भाग्यरेषा ठरणार असलेल्या या प्रकल्पाचे जोरदार समर्थन केल्याचे दिसले. मोपाला अपशकून करण्यासाठी खास डेरेदाखल झालेल्या मोपा विरोधकांची हुर्यो उडवण्यात आली यावरून पेडणेवासीय या प्रकल्पाबाबत किती आस लावून आहेत हे कळून चुकते. कोणताही राष्ट्रीय प्रकल्प येऊ घालता की त्याला या ना त्या कारणाने अपशकून करायचा ही अलीकडे गोव्यातील काही हितसंबंधितांची ... Read More »

जरा जरब बसवा!

वास्कोतील सासू – सुनेची हत्या व जबरी जोरीच्या घटनेने संपूर्ण गोवा हादरला आहे. अशा प्रकारची अत्यंत निर्दय गुन्हेगारी अत्यंत निर्ढावलेल्या गुन्हेगारांकडूनच घडू शकते. या प्रकरणी तपास सुरू आहे आणि लवकरच गुन्हेगारांचा छडा लागेल अशी आशा आहे, परंतु अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काय करता येईल याचा अधिक गांभीर्याने विचार होण्याची गरज भासू लागली आहे, कारण सातत्याने अशा गुन्हेगारी घटना घडत आहेत. ... Read More »

खरे कोण?

केंद्रात पर्यावरणमंत्री असताना गोव्याच्या खाणींचे पर्यावरण परवाने निलंबित करणार्‍या ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्या जयंती नटराजन यांनी काल त्या पक्षाला रामराम ठोकला. आपण पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना गेल्या ५ नोव्हेंबरला लिहिलेल्या पत्राची प्रतही त्यांनी पत्रकारांना सुपूर्द केली. नटराजन यांच्या राजीनाम्यापेक्षा त्यांनी टाकलेला हा पत्र बॉम्ब आणि कॉंग्रेसचे त्यावरचे प्रत्युत्तर या दोन्ही गोष्टी स्फोटक आहेत. राहुल गांधी यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे थेट आरोप ... Read More »

पुन्हा अण्णा

विद्यमान नरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्ध काही करीत नसल्याने आपण या सरकारविरूद्ध पुन्हा आंदोलन ललकारणार आहोत, अशी घोषणा अण्णा हजारेंनी नुकतीच केली आहे. गेले वर्षभर प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहिलेले अण्णा या निमित्ताने पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. अण्णांची भूमिका प्रामाणिक आहे यात शंकाच नाही, परंतु त्यांचा आजवर धूर्त माणसांनी कसकसा वापर करून घेतला हा सारा अनुभव गाठीस असतानाही आपण ... Read More »

कानपिचक्या

आपली भारतभेट आटोपून परत जाण्याआधी बराक ओबामांनी काही कानपिचक्या दिल्याच. ‘देशातील धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखाल तरच प्रगती साधाल’ असे ओबामा जाता जाता बजावून गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या कार्यक्रमांमध्ये या किंवा कोणत्याही वादग्रस्त विषयावर ‘ब्र’ ही न काढलेल्या ओबामांनी सिरी फोर्ट प्रेक्षागारात विद्यार्थ्यांपुढे झालेल्या आपल्या भाषणात या कानपिचक्या दिल्या आहेत. भारतीय राज्यघटनेतील पंचविसाव्या कलमात सांगितलेले धार्मिक स्वातंत्र्यही त्यांनी ... Read More »

रेषा तुटली…

चौकटीचे जाकीट आणि धोतर अशा वेशातला, गांधी चष्मा लावणारा आणि डोक्यावर मोजकेच केस असलेला ‘कॉमन मॅन’ नेहमी मूकच असे, पण आता तो कायमचाच मूक झाला आहे. ‘मी त्याला शोधले नाही, त्यानेच मला शोधले’ असे सांगणारा आर. के. लक्ष्मण नावाचा त्याचा निर्माता काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारताच्या राजकीय, सामाजिक इतिहासाचा एक मार्मिक, मिष्कील भाष्यकार निवर्तला आहे. लक्ष्मण यांनी अर्धशतकाहून अधिक काळ ... Read More »

अखेर कोंडी फुटली

भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या नागरी अणुकराराबाबत गेले काही वर्षे कायम राहिलेली कोंडी अखेर फुटली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत तसे सूतोवाच झाले. ओबामांच्या भारतभेटीची ही महत्त्वपूर्ण फलश्रृती म्हणता येईल. आण्विक दायित्व आणि आण्विक इंधनाच्या वापरावर नजर ठेवण्याचा अधिकार या मुद्द्यांवरून दोन्ही देशांदरम्यानच्या अणुकराराची कार्यवाही गेली सहा – सात वर्षे रखडली होती. आता भारताच्या कायद्याच्या ... Read More »

प्रजासत्ताक चिरायू हो!

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या महनीय उपस्थितीत आज भारत आपला प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहे. शतकांची परंपरा असलेल्या एका प्राचीन राष्ट्राच्या रक्तामध्ये भिनलेल्या लोकशाहीचा हा उत्सव आहे. स्वातंत्र्यानंतरच्या एवढ्या वर्षांमध्ये भारत अनेक बाबतींत पिछाडीवर भले राहिला असेल, परंतु या देशामध्ये लोकशाही दृढमूल झाली आहे हे कोणालाही नाकबुल करता येणार नाही. आपल्यापासूनच फुटून निघालेल्या पाकिस्तानला काही हे जमले नाही. मात्र, स्वातंत्र्याचा ... Read More »