ब्रेकिंग न्यूज़

अग्रलेख

बेबंदशाहीला लगाम

पायाभूत सुविधा असल्याखेरीज नव्या बांधकामांना परवाने दिले जाणार नाहीत अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली आहे. रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत गरजेच्या सुविधा पुरविण्याची पुरेशी क्षमता नसताना असे परवाने दिले गेल्याने एकूणच पायाभूत सुविधांवर ताण वाढत चालला आहे. त्यामुळे कोठे तरी त्यावर अशा प्रकारचे निर्बंध घालणे गरजेचे होते. आजवर सर्वसामान्यांची बांधकाम परवान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून आणि इतर सरकारी यंत्रणांकडून सर्रास अडवणूक ... Read More »

पाक यादवीकडे

एकीकडे काश्मीर प्रश्नी नाक खुपसणार्‍या पाकिस्तानला सध्या अंतर्गत यादवीने ग्रासले आहे. गेले काही दिवस इम्रान खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरिक इ इन्साफ आणि मुहंमद ताहिर अल कादरीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान अवामी तेहरिक यांच्या समर्थकांनी इस्लामाबादच्या ‘रेड झोन’ ची घेराबंदी केलेली आहे. पाकिस्तानची संसद, पंतप्रधान, राष्ट्रपतींची निवासस्थाने, सर्वोच्च न्यायालय, दूतावास वगैरे सर्व महत्त्वाच्या इमारती या रेड झोनमध्ये आहेत. असे असताना अडथळे उद्ध्वस्त करून ... Read More »

काट्याचा नायटा

आपल्या देशाच्या विशिष्ट अशा भौगोलिक रचनेमुळे पूर्वांचलातील राज्यांची उर्वरित देशाकडून उपेक्षाच होते. त्यातून ईशान्येकडील ती राज्ये सीमावर्ती असल्याने अनेक उपद्रवी घटक तेथे शांतता नांदू देत नाहीत. सध्या आसाम आणि नागालँड दरम्यानच्या सीमा विवादाचा भडका उडालेला आहे. गेल्या १२ आणि १३ ऑगस्टला काही सशस्त्र नागा बंडखोरांनी हल्ले चढवून पंधरा लोकांना ठार केले, तेव्हापासून आसाम खदखदू लागले आहे. त्यातच निदर्शकांवर केंद्रीय राखीव ... Read More »

मार्ग मोकळा

राज्यातील खाणपट्‌ट्यांचे वाटप येत्या पंधरा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग येत्या नववर्षापर्यंत खुला करण्याचे अभिवचन सरकारने विधानसभेत दिले आहे. खाण बंदीमुळे मेटाकुटीस आलेल्या खाणक्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला त्यामुळे दिलासा मिळणे स्वाभाविक आहे. खाणपट्‌ट्यांच्या वाटपासंदर्भात सरकार अर्थातच उच्च न्यायालयाच्या निवाड्याचा आधार घेणार आहे. या खाणपट्‌ट्यांची मुदत संपलेली असल्याने ती सरकारची मालमत्ता ठरते आणि सरकारने खुला लिलाव पुकारून जास्तीत जास्त ... Read More »

पाकची आगळीक

भारत -पाकिस्तानदरम्यान विदेश सचिव पातळीवरील चर्चा तोंडावर आली असताना त्यामध्ये मिठाचा खडा टाकणारी आगळीक पाकिस्तानने केली. परवा जम्मू सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडून युद्धबंदीचे सरळसरळ उल्लंघन करून आपल्या सीमा सुरक्षा दलाच्या वीस ठाण्यांवर रात्रभर गोळीबार करण्यात आला. दुसरीकडे पाकिस्तानचे भारतातील दूत अब्दुल बसीत काश्मीरमधील फुटिरतावादी नेत्यांसाठी खुद्द आपल्या राजधानीत दिल्लीमध्ये पायघड्या अंथरून बसले. एकेकाळी अटलबिहारी वाजपेयींनी पाकिस्तानशी मैत्रीचा हात दिलदारपणे पुढे केला, ... Read More »

चुकांवर पांघरूण

गेल्या लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या दारूण पराभवाला पक्षाध्यक्ष सोनिया गांधी किंवा पक्षाच्या निवडणूक प्रचाराची धुरा ज्यांच्या हाती होती, ते उपाध्यक्ष राहुल गांधी जबाबदार नाहीत असा निर्वाळा ए. के. अँटनी समितीने दिला आहे. राहुल हे पराभवाला जबाबदार असल्याचा अहवाल देण्याची त्यांची तरी काय प्राज्ञा होती म्हणा! पक्षनेतृत्वाने आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना गप्प करण्यासाठी खुंटा हलवून बळकट करावा तसा हा एकंदर सत्यशोधनाचा फार्स आहे. ... Read More »

एक भव्य स्वप्न

लाल किल्ल्याच्या प्राचीवरून स्वातंत्र्यदिनी देशाला संबोेधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक स्वप्न काल देशवासीयांसमोर ठेवले आणि बलशाली, समृद्ध भारताच्या या उदात्त स्वप्नाच्या पूर्तीचा राजमार्ग काय असेल त्याचा आराखडाही त्यांनी आपल्या त्या पासष्ट मिनिटांच्या उत्स्फूर्त, तरीही सूत्रबद्ध भाषणातून मांडला. सामाजिक स्वच्छतेपासून सर्वसमावेशक विकासापर्यंत आणि नियोजनाच्या कालबाह्य पद्धतींना तिलांजली देण्यापासून या देशाला उत्पादकतेचे जागतिक केंद्र बनविण्यापर्यंतच्या आपल्या कल्पना त्यांनी या भाषणातून ... Read More »

पाऊल पडते पुढे

आपली ४४ वर्षांची वाटचाल यशस्वीरीत्या पूर्ण करून दैनिक नवप्रभा आज ४५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. म्हणजेच आणखी पाच वर्षांनी येणार्‍या सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे. गोमंतकीय पत्रकारितेमध्ये नवप्रभेचे असलेले स्थान आणि प्रतिष्ठा याविषयी आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नसावी, कारण आजवरच्या या प्रवासाचे आणि प्रगतीचे आपण दैनंदिन साक्षीदार आहात. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आजवर अनेक वादळे आली, आक्रमक मार्केटिंग, अटीतटीची स्पर्धा, ... Read More »

भ्रष्टाचाराचे आगर

प्राचीन गोमंतकीय ग्रामजीवनाचे एक वैशिष्ट्य असलेल्या, परंतु गोवा मुक्तीनंतर बजबजपुरी आणि भ्रष्टाचाराचे आगर होऊन राहिलेल्या कोमुनिदादींसंदर्भात ठोस पावले उचलण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी विधानसभेत नुकतीच दिली आहे. योग्य नियमनाची ग्वाही देत असतानाच राज्यातील कोमुनिदादींच्या जमिनींवर अतिक्रमण करून उभारलेल्या बेकायदेशीर,अनधिकृत बांधकामांना अभय देण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. नवीन बेकायदा बांधकामे उभी राहणार नाहीत याची दक्षता घेत असताना पूर्वी झालेल्या गैरकृत्यांना अभय ... Read More »

प्रकाशाचा कवडसा हवा

आत्महत्यांच्या घटना राज्यात सातत्याने घडत आहेत. कुंभारजुव्यात परवा झालेली तिहेरी आत्महत्या ही याच शृंखलेतील आणखी एक दुर्दैवी घटना. समाजामध्ये नैराश्य आणि नकारात्मकतेचा हा प्रवाह का निर्माण झाला आहे हा चिंता करण्यासारखा विषय आहे. गोव्यात आत्महत्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त आहे. नॅशनल क्राईब ब्यूरोपाशी सर्वांत ताजी आकडेवारी सन २०१२ ची उपलब्ध आहे. त्या आकडेवारीनुसार आत्महत्यांची राष्ट्रीय सरासरी १० टक्के, तर गोव्यातील ... Read More »