ब्रेकिंग न्यूज़

अग्रलेख

लक्ष अधिवेशनाकडे

गोवा विधानसभेचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. विधानसभेचे कामकाज विनाकागद करण्याच्या दिशेने सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी गेले अनेक महिने प्रयत्न चालविले होते. या अधिवेशनात ते समूर्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आजच्या आधुनिक काळाशी सुसंगत अशी ‘ई विधानसभा’ गोव्यासारख्या संगणक साक्षरता उत्तम असलेल्या राज्यामध्ये व्हावी हा समस्त गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. देशातील इतर राज्यांपुढे एक आदर्श घालून देण्याची ही संधी ... Read More »

गाझातले रणकंदन

इस्रायलने गाझा पट्टीत सातत्याने दोन आठवडे केलेल्या हवाई हल्ल्यानंतर आता जमिनीवरील आक्रमक कारवाईसही प्रारंभ केला आहे. आजवर इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागून कुरापत काढत आलेल्या हमासची नांगी ठेचण्यासाठी इस्रायलने चालवलेल्या या निर्णायक कारवाईमध्ये गाझापट्टीतील निरपराध नागरिकांचा मात्र नाहक बळी जाण्याची शक्यता वाढली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने या मानवसंहाराची दखल घेतली आहे आणि स्वतः बान की मून तेथील हिंसाचार रोखण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. मात्र, ... Read More »

निष्पापांचा बळी

मलेशियन एअरलाइन्सचे विमान युक्रेनमध्ये दुर्घटनाग्रस्त होऊन परवा २९५ प्रवाशांचा बळी गेला. हे विमान स्वतःहून दुर्घटनाग्रस्त झाले नसून ते क्षेपणास्त्र डागून पाडले गेले असे दिसते. अर्थात ते कोणी पाडले यासंदर्भात युक्रेनमधील रशियावादी बंडखोर आणि युक्रेन सरकार यांनी एकमेकांवर खापर फोडायला सुरूवात केली आहे. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारायची कोणाची तयारी नाही, कारण बहुधा लढाऊ विमान समजून हे नागरी विमान पाडले गेले असावे. ... Read More »

बेशिस्तीचे दर्शन

प्रदेश कॉंग्रेसच्या शिस्तभंग समितीने पक्षविरोधी कारवायांबद्दल जाब विचारलेल्या नेत्यांनी पाठ फिरवल्याने समितीच्या बैठकीचाच बोजवारा उडाला. प्रदेश कॉंग्रेसला पक्षाचे आमदार आणि नेते काय किंमत देतात हेच त्यातून दिसून आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा ठपका फ्रान्सिस सार्दिन, वालंका आलेमाव आणि ज्योकीम आलेमाव यांच्यावरच नव्हे, तर खुद्द पक्षाचे उत्तर गोव्याचे लोकसभा उमेदवार रवी नाईक यांच्यावरही पक्षाने ठेवलेला ... Read More »

ऐतिहासिक

सहाव्या ‘ब्रिक्स’ परिषदेमध्ये नवी विकास बँक स्थापन करण्याच्या आणि तिच्या अध्यक्षपदाची धुरा प्रथम भारताकडे सोपविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले ही एक ऐतिहासिक घटना आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या पाश्‍चात्त्य सत्तांच्या प्रभावाखालील जागतिक वित्तीय संस्थांची मक्तेदारी संपुष्टात आणण्याच्या दिशेने टाकले गेलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या वित्तीय संस्थांनी आजवर पौर्वात्य देशांकडे केवळ याचक म्हणूनच ... Read More »

जर्मन क्रांती

अखेर ज्योकीम लोवे यांच्या जर्मन संघाने विश्‍वचषक फुटबॉलमध्ये क्रांती घडवीत चौथ्यांदा झळाळत्या फुटबॉल विश्‍वचषकाला गवसणी घातली. एका अमेरिकी देशात झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेत अजिंक्यपदाचा मान पटकावण्याची एका युरोपीय संघाची ही पहिलीच वेळ असल्याने फिलीप लेहम याच्या नेतृत्वाखालील जर्मन संघाच्या या अलौकीक यशाला सोन्याची किनार लाभली आहे. या संघाच्या या दिव्य अशा कामगिरीमुळे संघप्रशिक्षक लोवे यांना जर्मनीत ‘फुटबॉल देवा’ चा दर्जा मिळणार ... Read More »