अग्रलेख

फुशारकी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पोरबंदरच्या समुद्रात दहशतवाद्यांचे जहाज आढळल्याच्या प्रकरणात वादाची नवी ठिणगी पडली आहे. तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी. के. लोषाली यांच्या फुशारक्या आणि त्यावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची सफाई यातून नाहक या जहाज प्रकरणाभोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे आणि अर्थातच त्याचा फायदा पाकिस्तानला भारताविरुद्ध रान पेटवण्यासाठी मिळणार आहे. तटरक्षक दलासाठी एल अँड टी कंपनीने बनवलेल्या जहाजाच्या जलावतरण कार्यक्रमात लोषाली ... Read More »

हकालपट्टी

सांताक्रुझचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांच्या हकालपट्टीचा ठराव अखेर कॉंग्रेस कार्यकारिणीने संमत केला. बाबूश यांची तडकाफडकी हकालपट्टी केली जाईल असे सांगतानाच, त्यांना पुन्हा कधीही पक्षात प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णयही पक्षाने घेतला आहे. मात्र, गोव्यातील सत्तेच्या संधिसाधू राजकारणामध्ये या दुसर्‍या मुद्द्याला चिकटून राहणे कॉंग्रेसला जमणार आहे का आणि खरे तर परवडणारे आहे का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मोन्सेर्रात यांनी ... Read More »

‘आबासाहेब’ न झालेले आबा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री राहिलेले लोकप्रिय नेते आर. आर. पाटील काल अनंतात विलीन झाले. एक साधा, मिश्कील, परंतु परिपक्व नेता म्हणून आर. आर. महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय होते. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरत्चंद्र पवार यांचा वारसा सांगत राजकारणात आलेले आर. आर. उपमुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले, परंतु ‘आबा’चे कधी ‘आबासाहेब’ झाले नाहीत. चपलेच्या जागी बूट आले नाहीत. एकदा चीन दौर्‍यावर जाताना बूट घालायची ... Read More »

विशेष संपादकीय – निर्विवाद वर्चस्व

पणजीकरांनी सतत पाचवेळा वाढत्या मताधिक्क्यानिशी निवडून दिलेल्या मनोहर पर्रीकरांचा राजकीय वारसदार तशाच भरघोस मतांनी निवडून देऊन पणजीवासियांनी पर्रीकरांप्रतीचे आपले प्रेम आणि विश्वास पुन्हा एकवार व्यक्त केला आहे. भाजप सरकारचे स्थैर्य, सरकारची कामगिरी याच्यापेक्षाही केवळ मनोहर पर्रीकर या आपल्या नेत्याविषयीचे प्रेम, आपुलकी या निकालातून अधिक व्यक्त होते आहे. ‘बाय वन गेट वन फ्री’ च्या आवाहनाला मतदारांनी दिलेला हा प्रतिसाद आहे. भारतीय ... Read More »

पुन्हा केजरीवाल

दिल्लीमध्ये अखेर आम आदमी पक्षाचे सरकार दुसर्‍यांदा सत्तारूढ झाले आहे. मतदारांनी जागांचा पाऊस पाडल्याने विरोधक जवळजवळ नेस्तनाबूत झाले आहेत आणि त्यामुळे अर्थातच आम आदमी पक्षावरील जबाबदारीही कमालीची वाढली आहे. गेल्या वेळच्यासारखा कॉंग्रेसचा टेकू यावेळी नाही. हे पूर्णपणे स्वबळावरील आणि खरे तर कमालीच्या बळानिशी आलेले सरकार आहे आणि त्यामुळे पुढील पाच वर्षे दिल्लीला उत्कृष्ट आणि आदर्शवत असे प्रशासन देण्याची फार मोठी ... Read More »

मंदिरे आणि पुतळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारण्याचा एका तथाकथित ‘भक्ता’ चा प्रयत्न स्वतः मोदी यांनीच ट्वीटरवर तीव्र नापसंती व्यक्त करून हाणून पाडला हे योग्य झाले. एखाद्या व्यक्तीप्रति, विशेषतः सिने तारे तारकांप्रतीची आपली भक्तीभावना व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारची मंदिरे उभारण्याचे हे फॅड दक्षिण भारतात पूर्वी पाहायला मिळायचे. आता दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून मिळणार्‍या फुकटच्या प्रसिद्धीपोटी देशभरात असे माथेफिरू निर्माण होऊ लागले आहेत. देशाच्या अनेक ... Read More »

पणजीत कोण?

पणजी विधानसभा मतदारसंघातील आजच्या पोटनिवडणुकीत चार उमेदवार रिंगणात असले, तरी मनोहर पर्रीकर यांचे राजकीय वारसदार सिद्धार्थ कुंकळकर आणि कॉंग्रेसचे उमेदवार व पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्यातील लढतीकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष आहे. मनोहर पर्रीकर यांंच्या पाठीशी पणजीची जनता आजवर सातत्याने उभी राहिली. ते म्हापशाचे असूनही त्यांना स्वीकारले आणि दरवेळी भरघोस मतांनी निवडून दिले. आता ते केंद्रात संरक्षणमंत्री बनले असल्याने आपला ... Read More »

विर्डीचा विजय

म्हादई जल लवादाने महाराष्ट्र सरकारला विर्डी धरणाचे काम ताबडतोब थांबवण्याचा दिलेला आदेश गोव्यासाठी दिलासादायक आहे. एकीकडे कर्नाटक म्हादईचा गळा घोटण्यास पुढे सरसावले असता दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने वाळवंटीच्या उरावर विर्डी धरणाचा घाट घातला आणि या दोन्ही राज्यांनी गोव्याच्या विरोधाला न जुमानता आपले हे प्रकल्प पुढे रेटले. २६ एप्रिल २००६ रोजी गोव्याच्या सीमेजवळ पावलाची कोंड येथे थोरल्या नदीवर लघुधरण उभारण्यास तत्कालीन मुख्यमंत्री ... Read More »

विशेष संपादकीय – त्सुनामी!

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने भारतीय जनता पक्षाला अस्मान दाखवले. मोदींच्या लाटेवर स्वार होऊन हवेत तरंगत निघालेल्या भाजप नेत्यांना या अत्यंत नामुष्कीजनक आणि अपमानास्पद पराभवाने पार जमिनीवर आणले आहे, जनतेला गृहित धरणार्‍यांची गुर्मी ‘आप’ च्या त्सुनामीने उतरवली आहे. एका अर्थी हा निकाल भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने हितावह आहे, कारण मोदी लाट देशाला जवळजवळ एककेंद्रित्वाकडे घेऊन चालली होती आणि त्यामध्ये आता ... Read More »

नवे लुटारू

एचएसबीसीच्या जिनिव्हा बँकेच्या खातेदारांची एक नवी यादी बाहेर आली आहे. २०११ साली जी यादी बाहेर आली होती, त्याहून या यादीत जवळजवळ दुप्पट भारतीयांची नावे आहेत. त्या सर्वांच्या खात्यांमध्ये जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपये साठलेले आहेत असे या यादीच्या विश्लेषणातून समोर आले आहे. अर्थात, ही आकडेवारी सन जुनी म्हणजे २००६-०७ ची आहे. पण खातेदारांमध्ये भारतातील नामांकित उद्योजक, हिरे व्यापारी, विदेशस्थ भारतीय ... Read More »