ब्रेकिंग न्यूज़

अग्रलेख

युद्धविराम का?

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांशी रमझानच्या महिन्यात युद्धविराम करावा अशी मागणी जम्मू व काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत तशी मागणी झाल्याचेही मेहबुबांनी आपला हा प्रस्ताव पुढे रेटताना सांगितले. खरे तर सर्वपक्षीय बैठकीत ही मागणी केवळ एका सदस्याने केली होती. नेहमीच फुटिरतावाद्यांची कड घेत आलेल्या रशीद इंजिनिअर ह्या अपक्ष आमदाराने ती केली होती आणि ... Read More »

संमिश्र कौल

कर्नाटकच्या जनतेने अखेर आपला सत्तांतरांचा इतिहास अनुसरत राज्यातील कॉंग्रेस सरकारला पाच वर्षांनी पायउतार करीत भाजपला सत्ता स्थापनेची संधी पुन्हा एकवार बहाल केलेली आहे. मात्र हा निकाल ‘कॉंग्रेसमुक्त भारता’ला दिलेला कौल म्हणता येणार नाही. मतदारांचा कौल संमिश्र स्वरुपाचा आहे. विविध इलाख्यांचे जे भाग जोडून घेऊन कर्नाटक राज्याची निर्मिती झाली, त्या भागांनी आपापल्या प्राधान्यांनुसार स्वतःचा कौल दिलेला आहे. उदाहरणार्थ, भारतीय जनता पक्षाला ... Read More »

कर्नाटकचा कौल

सार्‍या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभेचा ऐतिहासिक निकाल आज लागणार आहे. आजचा निकाल ऐतिहासिक असेल कारण या निवडणुकीतून शतकोत्तर वाटचाल करणार्‍या या देशातील सर्वांत जुन्याजाणत्या कॉंग्रेस पक्षाचे भवितव्य मुक्रर होणार आहे. कॉंग्रेस पक्षाची चाललेली घसरण थांबवणारा आणि नवी ऊर्जा देणारा निकाल कर्नाटक देणार का की, भारतीय जनता पक्षाची दक्षिण दिग्विजयाची आजवर मतदारांनी रोखून धरलेली वाट कर्नाटकची जनता पुन्हा मोकळी ... Read More »

दोस्त नेपाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ भेटीवर नुकतेच जाऊन आले. हजारो वर्षांचे सांस्कृतिक अनुबंध असलेल्या भारताच्या या शेजारी राष्ट्राशी असलेल्या संबंधांमधील सततचे चढउतार पाहता ही भेट निश्‍चितच महत्त्वाची होती आणि अत्यावश्यकही होती. या दौर्‍यावर जाण्याआधी पंतप्रधानांनी जे निवेदन प्रसृत केले होते, त्यामध्ये हे उद्दिष्ट स्पष्टपणे अधोरेखित केलेले होते. नेपाळशी ‘रीबिल्डिंग ट्रस्ट अँड गुडविल’ हा या दौर्‍याचा उद्देश असल्याचे त्यात नमूद ... Read More »

पर्यटकांवर हल्ले

काश्मीरमध्ये शाळकरी मुलांच्या बसवर झालेल्या दगडफेकीची घटना ताजी असतानाच श्रीनगरहून गुलमर्गकडे निघालेल्या पर्यटकांच्या एका वाहनावर झालेल्या दगडफेकीत एक पर्यटक मृत्युमुखी पडला. काश्मीर खोर्‍यामध्ये गेली किमान आठ – दहा वर्षे हिंसाचार चालला आहे, परंतु पर्यटकांवर सहसा हल्ले होत नव्हते. जेव्हा दहशतवाद्यांनी तसे हल्ले चढवले तेव्हा स्थानिक काश्मिरी जनतेने त्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केली होती, कारण पर्यटन हे लक्षावधी काश्मिरींसाठी रोजीरोटीचे साधन ... Read More »

पुन्हा फटकार

गोव्यातील ८८ खाण लिजांचे सरकारने दुसर्‍यांदा केलेले नूतनीकरण रद्दबातल करून सर्वोच्च न्यायालयाने १५ मार्च २०१८ पर्यंत त्या खाणींवरील सर्व व्यवहार थांबविण्याचा आदेश दिलेला असूनही त्या आदेशात उत्खनन केलेल्या व शुल्क भरलेल्या खनिजाच्या वाहतुकीसंबंधी उल्लेख नसल्याचे सांगत सरकारने खाण कंपन्यांना त्याची निर्यात करण्यास जी परवानगी दिली होती, ती काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा फाऊंडेशनच्या जनहित याचिकेवरील अंतिम निवाड्यात रद्दबातल ... Read More »

लपवाछपवी का?

जागतिक वारसास्थळे खासगी कॉर्पोरेटस्‌ना दत्तक देणारी केंद्र सरकारची ‘अडॉप्ट अ हेरिटेज’ योजना त्यातील अपारदर्शकतेमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. गोव्यातील सहा वारसास्थळांना ती लागू करताना गोवा सरकारलाच नव्हे, तर केंद्रीय पुराभिलेख व पुरातत्त्व विभागाच्या स्थानिक अधिकार्‍यांनाही त्याची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही हे आश्चर्यकारक आहे. राज्याचे पुराभिलेख मंत्री विजय सरदेसाई यांनी राज्य सरकारच्या अनभिज्ञतेविषयी व्यक्त केलेली नापसंती रास्त आहे. वारसास्थळांवर पाणपोई, ... Read More »

मुलांवर दगडफेक

काश्मीरच्या शोपियॉंमध्ये काल एका शाळेच्या बसवर झालेल्या दगडफेकीत दोन मुले गंभीर जखमी झाली. वर वर पाहता हिंसाचारग्रस्त काश्मीरमधील ही एक छोटीशीच घटना, परंतु अशा प्रकारची घटना खोर्‍यात प्रथमच घडली आहे आणि त्यामागील इरादे लक्षात घेता ती अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. काश्मीरमध्ये गेली अनेक वर्षे हिंसाचार आहे, परंतु दहशतवाद्यांकडून पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांना सहसा आजवर लक्ष केले जात नसे. त्यांच्या ... Read More »

शेवटचा संशोधक

आपल्या गोमंतकाला जशी मुक्तिपूर्व काळापासून साहित्यिकांची थोर परंपरा लाभली आहे, तशीच साहित्य संशोधकांचीही येथे अशीच उज्ज्वल परंपरा राहिली आहे. अ. का. प्रियोळकर, डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर, लक्ष्मीकांत प्रभू भेंब्रे, पां. पु. शिरोडकर अशा या संशोधकांच्या मांदियाळीमध्ये चपखल बसणारे विद्वान गोमंतकीय संशोधक डॉ. विठ्ठल बाबू तथा वि. बा. प्रभुदेसाई यांचे काल पुण्यात निधन झाले आणि व्यासंगी संशोधनाची एक दीर्घ परंपरा खंडित झाली ... Read More »

तमसो मा ज्योतिर्गमय

उगा सूर्य कैसा कहो मुक्ती का यह | उजाला करोडों घरोंमे न पहुँचा ॥ शनिवारी ईशान्येतील मणीपूरमधील लीसांग नावाच्या एका दुर्गम गावी काही घरांमध्ये वीज उजळली आणि या विशाल देशामध्ये आता एकही गाव असे राहिलेले नाही की जिथे वीज पोहोचलेली नाही, अशी औपचारिक परंतु ऐतिहासिक घोषणा केंद्र सरकारने केली. तीन वर्षांपूर्वी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ... Read More »