अग्रलेख

पुन्हा अयोध्या!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रीरामाच्या नगरीत – अयोध्येमध्ये दीपावली मोठ्या धुमधडाक्यात यंदा साजरी केली. एक लाख ७१ हजार दिवे शरयू नदीच्या तटी प्रज्वलित केले गेले. चौदा वर्षांच्या वनवासानंतर प्रभु श्रीराम पुष्पक विमानाने अयोध्येत परतले या धारणेला दृष्यरूपात साकारण्यासाठी राम – लक्ष्मण – सीतेला हेलिकॉप्टरमधून उतरवण्यात आले. अयोध्येच्या कायापालटासाठी १३३ कोटींची भव्य दिव्य योजनाही त्यांनी जाहीर केलेली आहे. भारतीय ... Read More »

प्रणव उवाच

राजकारणातील अंतःस्थ खाचाखोचा त्यात प्रत्यक्ष वावरणार्‍यांना जेवढ्या ठाऊक असतात तेवढ्या बाहेरच्या जगाला माहीत असतात असे नाही. त्यामुळे जेव्हा अशा एखाद्या अंतःस्थ साक्षीदाराच्या आठवणींना जाहीर उजाळा मिळतो, तेव्हा त्यातून अनेक कोडी हळूहळू उलगडू लागतात. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आठवणींचे नुकतेच प्रकाशित झालेले नवे पुस्तक आणि त्या अनुषंगाने त्यांनी विविध नियतकालिकांना दिलेल्या मुलाखती यांमधून अशीच काही विश्वासार्ह माहिती बाहेर आली आहे. ... Read More »

दीपावली संकल्प

पुन्हा एक नवी ऊर्जा घेऊन दीपोत्सव आला आहे. दरवर्षी तिमिरातून तेजाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा हा उत्सव आपल्या मनातील निराशा आणि निरुत्साह दूर सारून पुन्हा नव्याने, नव्या ऊर्जेने जीवनाला, त्यातील संघर्षाला सामोरे जाण्याचा संदेश आपल्याला देत असतो. आपल्या भोवतालची परिस्थिती काही फार बदललेली असते असे नव्हे, परंतु नव्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहताना सगळेच बदलून गेल्यासारखे वाटल्याविना राहत नाही. परिस्थिती बदललेली नसते. ... Read More »

राहुलोदय

एकेका राज्यातून सत्ता चालली असली तरी राष्ट्रीय स्तरावर अजूनही आपले अस्तित्व असलेला आणि त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचे बिरुद कसेबसे टिकवून धरलेला विरोधी पक्ष कॉंग्रेस लवकरच नेतृत्वबदलाला सामोरा जाणार असल्याचे अधिकृतरीत्या सूतोवाच झाले आहे. अर्थातच, नेहरू – इंदिरा – राजीव – सोनिया आणि राहुल असेच हे घराण्यांतर्गत स्थित्यंतर राहणार आहे. मध्यंतरी पक्षाचे नेतृत्व गांधी कुटुंबाऐवजी अन्य नेतृत्वाकडे देण्याचा प्रयोग सीताराम केसरींच्या रूपाने ... Read More »

आर्थिक आव्हाने

नरेंद्र मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर बजावलेल्या कामगिरीच्या यशापयशाची चर्चा सध्या रंगली आहे. विरोधकांबरोबरच स्वकियांनीही त्यासंदर्भात या सरकारला लक्ष्य बनवल्याने सरकारवरील दबाव वाढला आहे. अलीकडेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या वर्धापनदिन सोहळ्यामध्ये स्वतः पंतप्रधानांनी आपल्या सरकारवरील आरोप फेटाळून लावले. अर्थव्यवस्थेच्या यशाचे मापदंड केवळ एका तिमाहीतील आर्थिक कामगिरी असू शकत नाही असे सांगताना, आपल्या सरकारने विविध आघाड्यांवर केलेल्या मूलभूत कामाला ... Read More »

शोकांतिका

पराकोटीची गुंतागुंत आणि वेळोवेळी मिळत गेलेली नवनवी वळणे यामुळे राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या आरुषी – हेमराज दुहेरी हत्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने राजेश व नुपूर तलवार या आरुषीच्या आईवडिलांची पुराव्यांअभावी मुक्तता केली. अर्थात, हा उच्च न्यायालयाचा निवाडा असल्याने आणि सीबीआय त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता असल्याने हा अंतिम निवाडा म्हणता येत नाही. परंतु तरीही एखाद्या गूढपटामध्येच शोभावे तशा प्रकारे या ... Read More »

पहिले पाऊल

अल्पवयीन पत्नीशी शरीरसंबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच मानणारा ऐतिहासिक निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या देशातील एक कलंक बनून राहिलेल्या बालविवाहांच्या समूळ उच्चाटनाच्या दिशेने टाकले गेलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७५ मधील अपवादांच्या पळवाटाही न्यायालयाने काढून टाकल्या आहेत. त्या नुसत्या काढूनच टाकल्या आहेत असे नव्हे, तर अशा प्रकारचे अपवाद हे त्यामागील तत्त्वाशी विसंगत असल्याचेही स्पष्टपणे नमूद केलेले ... Read More »

गोमेकॉचे दुखणे

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात आणि राज्यातील अन्य जिल्हा इस्पितळांमध्ये उपचारांसाठी येणार्‍या परप्रांतीय रुग्णांना शुल्क आकारण्याची घोषणा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केली आहे. येथे ‘परप्रांतीय’ म्हणजे ज्यांच्यापाशी गोव्यातील वास्तव्याचे ओळखपत्र नसेल ते शेजारील प्रांतांतील लोक असे त्यांना अपेक्षित आहे. परप्रांतांतून येऊन गोव्यात स्थायिक झालेल्या मंडळींना अवघ्या पाच वर्षांत दीनदयाळ आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळतो. शिवाय त्यांच्यापाशी येथील वास्तव्याचे ओळखपत्र असल्याने त्यांना ... Read More »

फटाके बंदी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआर मध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. दिवाळी हे प्रकाशपर्व मानले जात असल्याने फटाक्यांची आतषबाजी हा या उत्सवाचा परंपरेने भाग बनला असल्याने या निवाड्यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मात्र, या बंदीची पार्श्वभूमीही समजून घेणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी दिल्लीमध्ये दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुराची एवढी गडद चादर पसरली की तेथील शाळांना सुटी देणे भाग ... Read More »

संन्याशाला सुळी?

हरमल येथे छापा मारायला गेलेल्या अमलीपदार्थविरोधी विभागाच्या अधिकार्‍यांवर झालेला हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडी पाहिल्या, तर गोव्यात अमली पदार्थांविरुद्ध कारवाई करणे किती कठीण आहे आणि त्यात कसकसे हितसंबंध गुंतलेले असू शकतात याचे विदारक दर्शन घडते. जेथे छापा टाकला गेला, तेथे खरोखरच अमली पदार्थ व्यवहार होत होता की नाही हा वेगळा भाग, परंतु या घटनेनंतर राजकीय पातळीवर झालेल्या हालचाली, स्थानिक राजकारण्याकडून त्वरेने ... Read More »