विशेष लेख

विशेष संपादकीय- सौदामिनी

भारतीय राजकारणातील एक तळपती सौदामिनी असेच ज्यांचे वर्णन करावे लागेल अशा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे अकाली व आकस्मिक निधन हा देशाला फार मोठा धक्का आहे. वयाच्या अवघ्या ६७ व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेऊन सुषमाजींनी प्रत्येक देशवासीयाला चुटपूट लावली आहे. राजकारणासारख्या आजही पुरुषप्रधान असलेल्या क्षेत्रामध्ये एक स्त्री असूनही स्वतःच्या कर्तृत्वाची नाममुद्रा त्यांनी उमटवली. राष्ट्रीय ... Read More »

विशेष संपादकीय – स्वागत

जवळजवळ चार महिन्यांनंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची अमेरिकेतील वैद्यकीय उपचारांनंतर गोव्यात परतण्याची घटिका जवळ आली आहे. आज रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत ते गोव्यात पोहोचणार आहेत. आपल्या दुर्धर आजारातून पूर्णतः बरे होण्यास अद्याप थोडा कालावधी जावा लागणार असला तरीही त्यांचे सध्याचे गोव्यातील आगमन हे गोव्यामध्ये चैतन्य आणणारे असेल यात शंका नाही. आपल्या अनुपस्थितीमध्ये प्रशासन ठप्प होऊ नये यासाठी त्यांनी त्रिसदस्यीय मंत्रिसमिती ... Read More »

मंगलाताई वागळे ः एक दीपस्तंभ

अनुराधा गानू गोव्यातील ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती मंगला वागळे यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. अ. भा. महिला परिषद, कस्तुरबा ट्रस्ट आणि ‘हमारा स्कूल’च्या माध्यमातून त्यांनी निस्पृह सामाजिक कार्याचा आदर्श गोव्यापुढे उभा केला होता. त्यांना नवप्रभेची ही विनम्र श्रद्धांजली – काणकोणचं गायतोंडे घराणं. देशभक्ती आणि समाज कार्याचं लेणं ल्यायलेलं. अशा घरांत जन्माला आलेल्या मंगलाताईंनी वेगळं काही केलं नसतं तरच नवल! देशभक्ती आणि ... Read More »

विशेष संपादकीय

  सम्राज्ञी तामीळनाडूच्या लाडक्या‘पुरात्ची थलैवी’ म्हणजे क्रांतिकारी नेत्या जयललिता जयरामन यांचे निधन ही दक्षिणेतील एका झुंजार स्त्रीच्या प्रदीर्घ संघर्षाची इतिश्री आहे. आधी कलेच्या आणि नंतर राजकीय क्षेत्रात आपले अत्युच्च स्थान निर्माण करून, जनतेवर अधिराज्य करणार्‍या एखाद्या सम्राज्ञीच्या थाटात वावरत आलेल्या जयललितांच्या निधनाचा धक्का पचवणे द्रविडी जनतेला खचितच जड जाईल. दक्षिणी राज्यांतील जनता आधीच कमालीची भावूक असते. त्यामुळे त्यांचे शोकप्रकटीकरण कोणत्या ... Read More »

जीवोध्दारक : सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी

  नवप्रभेच्या २८ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात श्री. शंभू भाऊ बांदेकर यांचा ‘सर्वांगीण मानवी समानतेसाठी झटणारे चक्रधर स्वामी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. सदर लेखामध्ये काही चुकीचे उल्लेख लेखकाने केले होते. त्यासंदर्भात वाचकांच्या मनामध्ये परमपूज्य श्री चक्रधरस्वामींविषयी गैरसमज निर्माण होऊ नयेत यासाठी पू. महंत प्रज्ञासागर बाबा महानुभाव यांचा हा स्पष्टीकरणात्मक लेख येथे प्रसिद्ध करीत आहोत. श्री. बांदेकर यांच्या लेखामुळे कोणाच्याही ... Read More »