ब्रेकिंग न्यूज़

ब्रेकिंग न्यूज

भारत-नेपाळमध्ये विविध करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नेपाळला उच्च तंत्रज्ञानयुक्त हेलिकॉप्टर भेट दिले. आजपासून सुरू होत असलेल्या सार्क परिषदेसाठी पंतप्रधान मोदी काल काठमांडूत दाखल झाले. यावेळी भारत-नेपाळमध्ये विविध १२ करार झाले. यात काठमांडू-वाराणसी, जनकपुरी – अयोध्या, लुंबिनी-बोधगया यांना ‘भगिनी शहरे’ म्हणून विकसित करण्याच्या करारावर स्वाक्षरी झाली. Read More »

भारताने पुढाकार घेतल्यास बोलण्यांसाठी तयार : शरीफ

भारताशी बोलणी सुरू करण्याकरिता आपण तयार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काल सांगितले. सार्क परिषदेसाठी दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. मात्र भारताकहून विदेश सचिव स्तरावरील बोलणी बंद करण्यात आली त्यामुळे भारतालाच पुढाकार घ्यावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. Read More »

इफ्फी  : कुणासाठी? कशासाठी?

– विष्णू सूर्या वाघ अमिताभ बच्चन आणि रजनीकांत या भारतीय चित्रपटसृष्टीच्या दोन महानायकांच्या उपस्थितीत गुरुवारी ४५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. ‘इफ्फी’चे गोव्यातील हे सलग अकरावे वर्ष. २००४ साली मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ‘इफ्फी’ गोव्यात आणला. त्यावेळच्या माहिती व प्रसारणमंत्री सुषमा स्वराज यांनी गोव्याला इफ्फीचे माहेरघर म्हणून घोषित केले. पुढची दोन वर्षे ‘इफ्फी’चे यजमानपद भूषवण्याचा मान मुख्यमंत्री ... Read More »

भाजपचे ‘एकला चलो!’

– गुरुदास सावळ गोवा विधानसभा निवडणूक सव्वादोन वर्षांवर असली तरी सत्ताधारी भाजपाने आतापासूनच निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. संरक्षणमंत्रिपदी बढती मिळाल्याने मनोहर पर्रीकर आणि मुख्यमंत्रिपदी बढती मिळाल्याने लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा सत्कार करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या सभेत ‘एकला चलो’ची मागणी करण्यात आली. अशीच मागणी यापूर्वीही करण्यात आली होती. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची मान्यता असल्याशिवाय भाजपा कार्यकर्ते कोणतीही मागणी करत नाहीत, असा आजवरचा अनुभव ... Read More »

अन्नदाती चूल

– संदीप मणेरीकर ग्रामीण भागात मग तो कोकण असो वा गोमंतक अथवा घाटमाथ्यावरचा कोणताही गाव, त्या गावात चूल नाही असा गाव शोधूनही सापडणार नाही, अशी एकेकाळी परिस्थिती होती. स्वयंपाक करण्याची खोली, त्या खोलीत ओटा असेल नसेल, पण चूल होतीच. तशीच न्हाणीघरातही एक चूल होती. त्यावर भलामोठा बहुतेक तांब्याचा हंडा ठेवलेला असायचा व खाली विस्तव ढणढणत असायचा. बहुतेक घरांमध्ये दोन चुली ... Read More »

आंयी येथील अपघातात १४ विद्यार्थी जखमी

साखळीतील कार्यक्रमास येताना अपघात साखळी येथील रवींद्र भवनामधील चित्रप्रदर्शनासाठी येणार्‍या आंयी (दोडामार्ग) येथील नवदुर्गा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना टेम्पो रिक्षाला अपघात होऊन त्यात १४ विद्यार्थी जखमी झाले. यापैकी ५ विद्यार्थ्यांना बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले असून ९ जणांना साखळीतील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद साखळी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. Read More »

रामपालला २८ पर्यंत न्यायालयीन कोठडी

न्यायालयाच्या अटक वॉरंटला न जुमानता समर्थकांच्या जोरावर कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण केलेल्या स्वयंघोषित अध्यात्मक गुरु रामपाल याला काल पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाने २८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी पुढील सुनावणी आता २८ रोजीच होणार आहे. Read More »

कुळ-मुंडकार मात्र अजूनही पारतंत्र्यात

– एन. एम. हरमलकर, दिवाडी आपल्या गोव्याला मुक्ती मिळून एवढी वर्षे उलटली, तरी आपले कुळ – मुंडकार मात्र आजपर्यंत पारतंत्र्यातच राहिले. पण का? याचे उत्तर मात्र आपल्या विचारवंतांना, दिग्गजांना, आपल्या राजकीय प्रतिनिधींना आणि कुळ-मुंडकार यांचे हित जपणार्‍यांना अजूनही कळू नये यासारखी खेदाची दुसरी बाब कोणती असावी? हा सगळा वरवरचा देखावा आहे की काय? आपल्या भाऊसाहेब बांदोडकरांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत लगेच ‘कसेल ... Read More »

हे संतलक्षण नव्हे!

स्वतःला संत आणि जगद्गुरू म्हणवणार्‍या रामपालला अखेर त्याच्या सतलोक आश्रमातून हरयाणा पोलिसांनी अटक केली आणि जवळजवळ ३६ तास तेथे चाललेले रणकंदन थांबले. या काळात त्या सार्‍या परिसराला एखाद्या युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते आणि त्या धुमश्चक्रीत किमान पाच – सहा जणांचा बळी गेला. हे सगळे जे घडले ते टाळता आले नसते का असा प्रश्न हे रणकंदन पाहणार्‍या प्रत्येकाच्या मनामध्ये आल्यावाचून ... Read More »

पक्षाघात आणि आयुर्वेद उपचार

– कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ) सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात किंवा अर्धांगवायू. ही सर्व समान नावे आहेत. विशेषतः वृद्धापकाळात होणारा हा वातविकार असून मोठ्या कष्टाने बरा होणारा किचकट व्याधी आहे. यात शरीराच्या अर्ध्या भागामध्ये वैफल्य येणे, लकवा मारणे, शरीराचा अर्धा भाग लुळा पडणे इ. लक्षणे दिसून ... Read More »