ब्रेकिंग न्यूज़

ब्रेकिंग न्यूज

॥ अंतकाले च माम् एव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् … ॥

– प्रा. रमेश सप्रे आपण सामान्य माणसं मरतो त्याला ‘देहांत’ म्हटलं जातं. असं मरणं ही पुढच्या जन्माची तयारी असते असं समजलं जातं. हे जन्ममृत्यूचं चक्र सतत गरगरत असतं. या चक्रातून सुटका म्हणजे मुक्ती असं मानलं जातं. जो परमात्मा- परमेश्‍वर आहे ज्याचे आपण एक सामान्य अंश आहोत. त्याच्याशी एकरुप होणं (सायुज्य पावणं) ही खरी मुक्ती ! सर्व माणसांचं हे समान अंतिम ... Read More »

रशियन ‘लेवियाथान’ चित्रपटाला सुवर्ण मयूर

इफ्फीचा शानदार समारोप : ‘एक हजाराची नोट’ला विशेष ज्युरी पुरस्कार बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित ४५व्या इफ्फीचा एका शानदार समारंभात समारोप झाला. उत्कृष्ट चित्रपटासाठी असलेला सुवर्ण मयुर पुरस्कार ऍण्ड्री झ्वाझिनसेव यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘लेवियाथान’ या रशियन चित्रपटाला प्राप्त झाला. तर रौप्य मयुर पुरस्कार ‘धी किंडरगार्टन टिचर’ या नादाव लेपिड यानी दिग्दर्शित केलेल्या इस्रायली चित्रपटाला प्राप्त झाला. तर ... Read More »

श्रीनगर येथे ग्रेनेड स्फोटात आठ जखमी

येथील वर्दळीच्या लाल चौक भागात दहशतवाद्यांकडून काल करण्यात आलेल्या ग्रेनेड स्फोटात एका सीआरपीएफ उपनिरीक्षकासह आठ जण जखमी झाले. Read More »

रेल्वे स्थानकांचा विकास खासगीकरणातून शक्य : मोदी

देशातील रेल्वे सुविधा १०० वर्षांपूर्वी होत्या तशाच आहेत. रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करून विकास करणे शक्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गुवाहाटी-मेघालय या मार्गावर पहिल्या रेल्वेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. आपण १० ते १२ ठिकाणी तसा प्रयोग करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. Read More »

‘इस्लामिक स्टेट’शी संबंधित मुंबईच्या युवकाची चौकशी

सिरीयात ‘इस्लामिक स्टेट’ सुन्नी दहशतद्यांशी लढताना मरण पावल्याचे समजले जात असलेला कल्याण-मुंबई येथील युवक आरिफ मजीद (२३) काल मुंबईत परतल्याचे कळल्यावर एनआयए व महाराष्ट्र एटीएसने त्याची कसून चौकशी केली. मे महिन्यात कल्याणचे अभियंते असलेले चार युवक दक्षिण आशियातील पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी गेले असता अचानक बेपत्ता झाले होते. Read More »

इफ्फी निविदा प्रक्रियेत  घोटाळा : कॉंग्रेस

दक्षता खात्याकडे तक्रार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून सर्व निविदांची चौकशी करण्याची मागणी करणारी तक्रार आपण दक्षता खात्यात सादर केल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेसचे आयोजन सचिव तथा आयटी विभागाचे अध्यक्ष दुर्गादास कामत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. Read More »

विदेशातील काळ्या पैशाबाबत  २५० जणांची कबुली : जेटली

विदेशांमध्ये खाती असलेल्या ४२७ जणांची ओळख पटली असून त्यापैकी २५० जणांनी तशी कबुली दिली आहे, असे निवेदन काल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत केले. काळा पैसा देशात परत आणण्याचे सरकारचे प्रयत्न योग्य प्रकारे सुरू असल्याचे ते म्हणाले. मात्र, त्यांच्या या निवेदनाने समाधान न झालेल्या विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. Read More »

दहशतवाद विरोधी विभागाला ३० गुप्त पोलिसांची साथ

पोलीस महानिरीक्षकांची माहिती गोवा हे महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे. केंद्रीय गुप्तचर खात्याकडून सतर्कतेचेही आदेश येतात. या पार्श्‍वभूमीवर दहशतवाद विरोधी पथक बळकट करण्याचा निर्णय घेऊन या विभागासाठीच काम करण्यासाठी ३० गुप्तचर पोलिसांची नियुक्ती केल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुनिल गर्ग यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. Read More »

इफ्फीत ट्रॅव्हल एजंट नियुक्तीत घोटाळ्याचा दावा

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ट्रॅव्हल एजंट नियुक्त करण्याच्या प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप करून त्याची चौकशी न केल्यास पुढील चार दिवसांत न्यायालयात जाणार असल्याचे प्रदेश कॉंग्रेसचे आयोजन सचिव दुर्गादास कामत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. Read More »

‘इबोला’ सतर्कतेसंबंधी सचिवालयात आढावा

सध्या आफ्रिकेत प्रादुर्भाव वाढलेल्या महागंभीर अशा ‘इबोला’ आजाराचा आढावा काल सचिवालयात आरोग्य सचिव, व आरोग्य आयुक्त यांच्या उपस्थितीतील बैठकीत घेण्यात आला. गोव्यात ‘इबोला’ आढळून आल्यास त्याच्या मुकाबल्याची काय सज्जता आहे, यासंबंधीची चर्चा झाली. दरम्यान, अद्यापपर्यंत गोव्यासह संपूर्ण भारतात कुठेही इबोलाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. Read More »