ब्रेकिंग न्यूज़

ब्रेकिंग न्यूज

स्त्री सुरक्षितता एक प्रश्‍नचिन्ह?

- सपना मातोणकरसाखळी महाविद्यालय 

जग हे सुंदर आहे. ते सुंदर ठेवायचं की बिघडवायचं हे प्रत्येकाच्या हाती असते. प्रत्येकाचे आचारविचार हे अनेक अंगानी चालत असतात आणि त्यातूनच उद्भवतात अनेक जटील प्रश्‍न. या प्रश्‍नांची उत्तरे शोधताना नाकीनऊ येते. कधी सापडतात तर कधी सापडतच नाहीत उत्तरे. बदललेली मानसिकता आणि बिघडलेल्या समाज व्यवस्थेतून जीवनाची घडी विस्कळीत होते. आणि उभे राहतात फक्त प्रश्‍न आणि प्रश्‍नच...! का, कशाला, कशासाठी???
Read More »

नव्या रेलसेवेचा प्रारंभ

Read More »

अखेर वांच्छू यांचा राज्यपालपदाचा राजीनामा

४ मे २०१२ रोजी वांच्छू यांनी गोव्याच्या राज्यपालपदाचा ताबा घेतला होता. १९७६च्या आयपीएस केडरचे ते अधिकारी असून त्यांनी गुप्तचर विभागातही काम केले होते. १९६१ साली जन्मलेले वांच्छू हे सध्याच्या राज्यपालापैकी सर्वांत कमी वयाचे राज्यपाल होते.
Read More »

धेंपो स्पोर्ट्‌स क्लब-फादर आग्नेल हायस्कूल कराराचे नूतनीकरण

फादर आग्नेल हायस्कूलबरोबरील गतवर्षीच्या भागीदारीत पिलार येथील या हायस्कूलच्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या धेंपो स्पोटर्ंस क्लबच्या अंडर-१४ संघाने जीएफए अंडर-१४ स्पर्धेचे जेतेपद पटकावले, असे सांगून हायस्कूलच्या आठ ते १६ वयोगटातील खेळाडूंच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वतोपरी सहयोग देण्यास आपण कटिबध्द असल्याचे  धेंपो उद्योगसमुहाचे चेअरमन तथा धेंपो स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास धेंपो यांनी सांगितले.
Read More »

फुटबॉलचा थरार, पण खराब खेळाने प्रेक्षक बेकरार

- शंभू भाऊ बांदेकर, साळगाव

गेल्या १३ जूनपासून सुरू झालेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेची पहिली फेरी संपून दुसर्‍या फेरीला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. तशी ही सुरुवात - आणि ती ही ब्राझिलमध्ये थोड्या निराशेच्या सुरातच झाली. 
ब्राझिलमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल. ब्राझील आणि फुटबॉल हे जणू जागतिक समीकरणच होऊन गेले आहे. याचे कारण प्रत्येक ब्राझिलियनांच्या नसांनसांत फुटबॉल हा खेळ भिनलेला आहे. अगदी प्रत्येक रस्त्यारस्त्यावर, समुद्रकिनार्‍यावर व लहान-मोठ्या मैदानावर हा खेळ थोडासासुद्धा मोकळा वेळ मिळाला की खेळला जातो. 
Read More »

उथळ आणि पोरकट

पबमध्ये महिलांनी दारू पिणे, बिकिनी घालून सार्वजनिक ठिकाणी जाणे हे गोमंतकीय संस्कृतीला धरून नाही आणि त्यावर बंदी घातली पाहिजे असे विधान सुदिन ढवळीकर यांनी केले, ज्यावरून राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी सध्या गहजब माजविला आहे. ढवळीकर यांचे ते वैयक्तिक मत आहे आणि प्रमोद मुतालिकांप्रमाणेच त्यांनाही त्यांचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आपण दिले पाहिजे. मात्र,  मुतालीक यांनी आपले विचार समाजावर लादायचा प्रयत्न केला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळुरमध्ये पबमध्ये गेलेल्या मुलीबाळींवर हात उगारले, कायदा हाती घेतला, त्यामुळेे त्यांना विरोध झाला. ढवळीकर हे तर राज्य सरकारमधील एक जबाबदार मंत्री आहेत आणि महिलांनी पबमध्ये जाण्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी बिकिनी घालण्यावर बंदी घालण्याचा जर त्यांचा विचार असेल तर ते इतरांच्या स्वातंत्र्यावरील अतिक्रमण ठरेल याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी. दुसर्‍याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार कोणाला मिळालेला नाही. प्रत्येक प्रदेशाची एक संस्कृती असते, परंपरा असते आणि तिचे जतन करण्याची भावना गैर नाही, परंतु आज जागतिकीकरणाचा जमाना आहे आणि अनेक संस्कृतींचे सम्मीलन आणि त्यातून येणारा संघर्षही अटळ आहे हे आपण आधी लक्षात घ्यायला हवे. एका वैश्विक समाजाची नकळत जडणघडण होते आहे. आपल्या देशामध्ये पाश्‍चात्त्य आक्रमक आले, तेव्हापासून राजकीय आक्रमणाच्या जोडीने सांस्कृतिक आक्रमणही होत राहिले, परंतु तरीही त्यातून भारतीय संस्कृती वाचली, टिकली आणि वर्धिष्णू राहिली. ब्रिटिश आणि पोर्तुगिजांनी आपला प्रभाव समाजावर टाकण्यासाठी सत्ता पुरेपूर वापरली, पोर्तुगिजांच्या राजसत्तेच्या आडून जेजुईटांनी तर दडपशाही आणि जुलमी धर्मांतरांचे तंत्र अवलंबिले, परंतु तरीही येथील संस्कृतीची जोपासना आपल्या वाडवडिलांनी केली.
Read More »

गुजरातमध्ये आणखी तीनशे ते पाचशे कोटींची गुंतवणूक करणार

नैऋत्य गुजरातमधील महत्त्वाचे बंदर असलेल्या भावनगरमध्ये अलीकडेच धेंपो उद्योगसमूहाने मॉडेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर लि. च्या माध्यमातून मोठ्या जहाजबांधणी उद्योगाचा पाया घातला आहे. भारतीय नौदलासारख्या मोठ्या ग्राहकांच्या मागणीनुसार तेथे जहाजनिर्मिती होते.
Read More »

पणजी दूरदर्शनच्या जुन्या स्टुडिओला भीषण आग

आग लागली त्यावेळी तेथे तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम चालू होता. दुपारी भोंगा वाजल्यानंतर संबंधित कर्मचार्‍याने तो बंद केला व जेवणासाठी निघाला. त्यानंतर आतून धुराचे लोट सुरू झाले. अग्निशामक दलाच्या जवानांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तेथील चार कर्मचारी आत होते. त्यांना आग लागल्याची कल्पना आली. परंतु धुरामुळे कोठून बाहेर पडावे हे कळेनासे झाले. जवानांनी मदत केल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य झाले.
Read More »

भारताच्या सरन्यायाधीशांची केंद्र सरकारवर टीका

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी शिफारस केलेल्या सुब्रमण्यम यांना बाजूस सारण्याच्या कृतीमुळे आपल्याला धक्का बसल्याचे मत न्या. लोधा यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर न्याय पालिकेच्या स्वातंत्र्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Read More »

कॉंग्रेसने पाठवली मिनी स्कर्टची भेट

नाईटक्लबमध्ये तोकडे स्कर्ट घालून जाण्यास बंदी घातली पाहिजे असे मत सुदिन ढवळीकर यांनी काल व्यक्त केले होते आणि मुतालिक यांच्या पबविरोधी भूमिकेचे जोरदार समर्थन केले होते. त्यांच्या या वक्तव्याची तीव्र प्रतिक्रिया देशभरात उमटली असून कॉंग्रेस तसेच अखिल भारतीय प्रागतिक महिला संघटनेच्या कविताकृष्णन यांच्यासह अनेक महिला नेत्यांनी त्याविरुद्ध जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशा राजकारण्यांनी दुसर्‍यांनी कसे वागावे हे शिकवण्या आधी स्वतःची संस्कृती सुधारावी असा सल्ला ढवळीकर यांनी दिला. 
Read More »