ब्रेकिंग न्यूज़

ब्रेकिंग न्यूज

कूळ-मुंडकार कायद्याचा राजकीय व सामाजिक मागोवा

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट (पूर्वार्ध) गोव्याची पोर्तुगिजांच्या साडेचारशे वर्षांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक गुलामगिरीतून १९ डिसेंबर १९६१ या दिवशी भारत सरकारने केलेली लष्करी कारवाई व अनेक हुतात्म्यांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या अथक प्रयत्नामुळे मुक्तता झाली. मुक्तीनंतर गोव्यात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत जी क्रांती घडून आली त्याचे सारे श्रेय मुक्तीनंतर सतरा वर्षे अधिराज्य गाजवणार्‍या कै. भाऊसाहेब बांदोडकर व त्यानंतर ... Read More »

नाण्यांचा प्रवास…

– वरद सु. सबनीस मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या जडणघडणीसाठी योग्य बदल घडत गेले. इतिहासाचा मागोवा घेताना अशा घटनांकडे जरा व्यापक दृष्टिकोनाने पाहावे लागते. कारण या घटनांची व्यापकता, परिणाम हा दीर्घकाळ टिकणारा असतो. उदाहरणार्थ, सुमारे १० हजार वर्षांपूर्वी शेतीची कला माणसाने अवगत केली व आजतागायत ... Read More »

गोव्यातील लष्कराचे पर्रीकरांना कोडे

– गुरुदास सावळ मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात गेलेले मनोहर पर्रीकर दिल्लीतील वातावरणात अजूनपर्यंत रुळल्याचे दिसत नाही. मुख्यमंत्री असताना पर्रीकर ज्या पद्धतीने विधाने आणि निवेदने करायचे, त्याच स्वरूपाची विधाने ते आजही करत आहेत. संरक्षण खात्याकडे गोव्याचे जे प्रश्‍न पडून आहेत ते सगळे प्रश्‍न सहा महिन्यांच्या आत सुटतील असे जाहीर विधान पर्रीकर यांनी केले आहे. मनोहर पर्रीकरच संरक्षणमंत्री असल्याने मनात ... Read More »

मायकल लोबोंवरील हल्ला; आरोपीचे ‘लोकेशन’ नाही

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यावर हल्ला करून बेपत्ता झालेला केल्फी गोव्याबाहेर निसटून गेल्याचा तर्क हणजूण पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याने आपला भ्रमणध्वनी बंद करून ठेवला आहे, त्यामुळे त्याचे ‘लोकेशन’ (ठावठिकाणा) काढणे कठीण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. Read More »

पणजी भाजप उमेदवार निवडीसाठी ९४ जणांची समिती

पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीच्या उमेदवाराची ९४ जणांची समिती बैठक घेऊन निवड करणार असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.पर्रीकर याना संरक्षणमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत नेले तरी ते गोव्याच्या राजकारणावर नजर ठेवून आहेत. Read More »

२४ तासात कामावर रूजू व्हा; अन्यथा पर्यायी व्यवस्था करू

भरती-रोजगार सोसायटीचा सुरक्षा कर्मचार्‍यांना इशारा सोसायटी कामगार नेत्यांशी चर्चा करणार नाही गोवा भरती व रोजगार सोसायटीचे सुरक्षा रक्षक संपावर गेल्याने सध्या विविध सरकारी खात्यातील सुरक्षा व्यवस्था धोक्यात आलेली असून या पार्श्‍वभूमीवर २४ तासांच्या आत जर हे सुरक्षा रक्षक संप मागे घेऊन कामावर रुजू झाले नाहीत तर आम्हाला पर्यायी व्यवस्था करावी लागेल, असे सोसायटीचे चेअरमन सुभाष साळकर यांनी काल पत्रकार परिषदेतून ... Read More »

गोंयच्या सायबाचे फेस्त उत्साहात साजरे

लाखभर भाविकांची उपस्थिती : मुंबईच्या कार्डिनलचा भाविकांना संदेश देव आपल्या मागण्यांकडे कधीच दुर्लक्ष करीत नाही. प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी केलेल्या मागण्यांसाठी कळ सोसावी. देव कधी ना कधी तरी ते निश्‍चितच देईल व आपली इच्छा पूर्ण करील, असे प्रतिपादन मुंबईचे कार्डिनल वॉझवर्ल्ड ग्रासीएस यांनी काल जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्ताच्या सकाळच्या प्रमुख प्रार्थनासभे वेळी उपदेशपर संदेशात केले. काल दिवसभरात दीड ... Read More »

मुथ्थुट फायनान्सच्या कार्यालयात युवकाचा व्यवस्थापकावर हल्ला

कुंकळ्ळीतील आरोपीसह तिघे जखमी कुंकळ्ळी येथील मुथ्थूट फायनान्स या वित्तीय संस्थेच्या शाखेत रेमंड बार्रेटो याने हातात दंडुके घेऊन बळजबरीने घुसून व्यवस्थापक व सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना काल दुपारी पावणेतीन वाजता घडली. या घटनेत व्यवस्थापक व सुरक्षा रक्षक तसेच आरोपी रेमंड बार्रेटो गंभीर जखमी झाले आहेत. Read More »

पंतप्रधानांच्या माफीची विरोधकांकडून मागणी

संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम अल्पसंख्यकांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीयमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या राजीनाम्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी माफी मागावी या मागणीसाठी सर्व विरोधी पक्षांनी काल जोर धरला. दरम्यान, याच प्रकरणावरून काल दुसर्‍या दिवशीही राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ माजवला. मात्र त्यानंतरही संसदीय व्यवहारमंत्री व्यंकय्या नायडू यांनी ज्योती यांच्या राजीनाम्याचा प्रश्‍नच नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Read More »

योगमार्ग – राजयोग

(योगसाधना – २६०) (स्वाध्याय – २८) – डॉ. सीताकांत घाणेकर ‘स्वाध्याय’- फक्त तीन अक्षरी शब्द, पणविश्‍वाला बदलण्याची ताकद स्वाध्यायात आहे. म्हणूनच स्वाध्याय शास्त्रशुद्ध करायला हवा. तेव्हाच त्यांचे चांगले परिणाम दिसून येतील. त्यासाठी मानवाची बुद्धी स्थिर, प्रभावी असणे अत्यंत जरुरी आहे. कठोपनिषदातील श्लोकामध्ये म्हटले आहे… बुद्धिं तु सारथिम् विद्धि| – बुद्धीला सारथ्याची उपमा दिलेली आहे. कुठल्याही वाहनाचा सारथी स्थिर असणे अपेक्षित ... Read More »