ब्रेकिंग न्यूज़

ब्रेकिंग न्यूज

भक्तीची बुद्धीझेप

- सुधाकर नाईक

गोव्याची पहिली इंटरनॅशनल वुमन ग्रॅण्डमास्टर तथा गोवा कार्बन लिमिटेडची ब्रँड अँबॅसिडर भक्ती कुलकर्णीने गोव्यात बुद्धिबळ इतिहासात नवा सुवर्णक्षण नोंदताना नुकत्याच चेन्नईमध्ये झालेल्या प्रतिष्ठेच्या नॅशनल वुमेन्स चेस चॅम्पियनशीपचे अजिंक्यपद प्राप्त केले.

गेल्या महिन्यात कोलंबो (श्रीलंका) येथे झालेल्या आशियाई ज्युनिअर बुद्धिबळ अजिंक्यपदानंतर भक्तीने गेल्या रविवारी प्रतिष्ठेची नॅशनल वुमेन्स चॅलेंजर्स स्पर्धा जिंकून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

Read More »

पाऊस! मनातला… गाण्यातला…

- डॉ. वासुदेव सावंत

काही गोष्टींची आवड किंवा काही गोष्टींविषयी नावड माणसाच्या मनात उपजतच निर्माण झालेली असते. त्याची काही तर्कशुद्ध कारणमीमांसा करता येत नाही. पाऊस ही अशी माझ्या लहानपणापासूनच मला आवडणारी, ओढून घेणारी गोष्ट. माझे बालपण आणि विद्यार्थिदशेचा बराचसा काळ अत्यंत कमी पावसाच्या किंवा ज्याला दुष्काळी म्हटलं जातं अशा प्रदेशात गेलेला. भारतातील सर्वात तीव्र पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून भूगोलाच्या पुस्तकात नोंदलेला सह्याद्रीच्या पश्‍चिमेकडील हा एक परिसर. पण ज्या गोष्टीची कमतरता असते किंवा जी गोष्ट दुर्मीळ असते तिच्याबद्दलच जास्त अपूर्वाई असते. त्यामुळे पावसाची वाट पाहणे, पाऊस आला की आनंदून जाणे आणि अपेक्षेनुसार न पडलेल्या पावसाची आभाळाकडे डोळे लावून वाट पाहणे ही त्याकाळी तरी इथल्या माणसांच्या जीवनातली एक नित्य आणि अंगभूत गोष्ट होती. अशा कमी पावसाच्या दुष्काळी प्रदेशात जन्मल्या-वाढल्यामुळेच असेल कदाचित, पण पावसाची ओढ माझ्या मनात अगदी बालपणापासूनच रुजलेली.

Read More »

भेटी लागी जीवा…

उदयबुवा फडके

पंढरपूर... लाखो भाविकांचे श्रद्धास्थान... संतांचे तर माहेरच. नाथ महाराज म्हणतात- ‘माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी...’ आषाढी आणि कार्तिकीला तर जनसागर लोटतो त्या पंढरपुरात. Read More »