ब्रेकिंग न्यूज़

ब्रेकिंग न्यूज

‘एफसी गोवा’ क्लबचे दिमाखदार उद्घाटन

‘वन टीम वन ड्रीम’ ध्येयाने प्रेरित गोव्याच्या ‘एफसी गोवा’ संघाचा उद्घाटन सोहळा काल येथे दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला. येत्या दि. १२ ऑक्टोबर ते २० डिसेंबर या कालावधीत होणार्‍या या बहुचर्चित तथा बहुप्रतिक्षित ‘हिरो इंडियन सुपर लीग’ मध्ये भाग घेणार्‍या ‘एफसी गोवा’चे नामकरण काल येथील हॉटेल मेरियॉटमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते झाले. तसेच गोव्याचा राज्य प्राणी ‘गवा रेडा’ची ... Read More »

भाजप संसदीय मंडळावरून अडवाणी, जोशी यांना वगळले

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने भाजप संसदीय मंडळावरून पक्षाचे संस्थापक असलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांना वगळण्यात आले आहे. संसदीय मंडळावर आता अडवाणी व जोशी यांच्या जागी शिवराजसिंग चौहान व जे. पी. नड्डा यांची वर्णी लावली आहे. भाजपची त्रिमूर्ती मानले जाणार्‍या अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांची वर्णी आता पाच सदस्यीय मार्गदर्शक मंडळावर लावण्यात ... Read More »

अडवाणी, जोशी भाजपकडून वृध्दाश्रमात

कॉंग्रेसकडून संभावना ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांना संसदीय मंडळावरून वगळून मार्गदर्शक मंडळात पाठवणी केल्याप्रकरणी कॉंग्रेसने भाजपच्या निर्णयावर उपहासात्मक टीका केली आहे. भाजपने अडवाणी व जोशी यांना वृध्दाश्रमात दाखल केले आहे अशा शब्दात कॉंग्रेसने भाजपच्या निर्णयाची संभावना केली आहे. Read More »

गणरायाच्या स्वागतासाठी गोमंतकीय झाले सज्ज

सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीसांचीही सज्जता गोमंतकीयांचा अत्यंत महत्वाचा सण असलेला गणेश चतुर्थी उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असून या उत्सवाच्या तयारीचे काम सध्या जोरात सुरू आहे. शहरी भागातील अनेक कुटुंबे गणेशोत्सवानिमित्त आपल्या गावाकडे जात असल्याने त्याचीही लगबग सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरांमधील बाजारपेठाही गजबजून गेल्या आहेत. Read More »

गणेश चतुर्थी विशेष – गणराज रंगी नाचतो…

– सौ. लक्ष्मी जोग वर्षा ऋतू मेघमल्हार आळवीत येतो. अवनीचा कणन्‌कण आनंदाने तरारून उठतो. वर्षाराणीमुळे भूमी खर्‍या अर्थाने सुजलाम् सुफलाम् होते. न्हात्या-धुत्या झालेल्या सृष्टीची सुंंदरता ऐन भरात येते. झाडाझुडपांपासून ते चिमुकल्या तृणपात्यापर्यंत जणू सौंदर्यस्पर्धा लागलेली असते. एखाद्या टिंबासारख्या दिसणार्‍या पांढर्‍याशुभ्र मोत्यांप्रमाणे चमकणार्‍या असंख्य कळ्या अंग-प्रत्यंगावर लेवून तृप्त अनंत डौलात उभा असतो. हिरव्यागार टिकल्यांच्या पर्णसंभारातून पिवळ्या व लाल शंकराचे तुरे डोकावत ... Read More »

गणेश चतुर्थी विशेष – मोदे भरिले मोदक

– संकलन : सौ. अनुजा अ. पंडित गणेशचतुर्थी हा आपल्याकडे मांगल्याने नटलेला, प्रचंड उत्साहाने भरलेला दिवस असतो. या दिवशी अनेक घरांतून मांगल्याचे साक्षात प्रतीक असलेल्या विघ्नहर्त्या गणेशाची स्थापना वा पूजा होते. कुणाकडे गणपती दीड दिवस असतो तर कुणाकडे पाच दिवस, नऊ, अकरा किंवा एकवीस दिवसांचासुद्धा असतो. घरोघरी उत्साहाचं वातावरण असतं. घरातील लहान मुलं व मोठी माणसं एकत्र येऊन सजावट करतात. हा ... Read More »

गणेश चतुर्थी विशेष – देवा, तूचि विद्याधरा…

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट मनभावन श्रावण आणि सृष्टीच्या समृद्धीचा सरताज म्हणजे भाद्रपद. या दोन्ही महिन्यांचा आनंददायी कालखंड म्हणजे वर्षाऋतू. ज्येष्ठ आणि आषाढ मासांत अविरत बरसणार्‍या पर्जन्यधारांनी न्हाऊन निघालेली सृष्टी तृप्तीच्या हिरव्याकंच वैभवलेण्याने सजून दिमाखात मिरवत असते. चैतन्याचा दरवळच जणू सृष्टीच्या रोमारोमांतून नित्य अनुभवास येत असतो. प्राणिमात्रही या चैतन्याच्या संजीवक स्पर्शाने आनंदविभोर मनःस्थितीत असतात. Read More »

गणेश चतुर्थी विशेष – विघ्नराजं नमामि|

 – लक्ष्मण कृष्ण पित्रे आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीला, विशेषतः हिंदूंच्या धार्मिक जीवनाला व्यापून राहिलेली अशी लोकप्रिय देवता म्हणजे गणपती होय. आपल्या धार्मिक धारणेनुसार हा देव मंगलाचा अधिष्ठाता आहे, सर्व विद्यांचे निवासस्थान आहे, तसेच सर्व कलांचा प्रेरणास्रोत आहे. तो विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ताही आहे, म्हणजेच विघ्ननियंता आहे. त्याच्या स्मरणाने विघ्नांचा परिहार होऊन कोणतेही कार्य सुरळीतपणे पूर्ण होते. त्यामुळेच कोणत्याही कार्याच्या आरंभी त्याचे ... Read More »

लिजांचे नूतनीकरण नको, लिलाव करा : कॉंग्रेस

खाण लिजांचे नूतनीकरण न करता सरकारने राज्यातील खाणींचा लिलाव करावा, अशी मागणी काल कॉंग्रेस पक्षाने केली. पक्षाचे प्रवक्ते दुर्गादास कामत हे काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात पक्ष सत्तेवर आल्यास राज्यातील खाणींचा लिलाव करण्यात येईल, म्हटले होते. नरेंद्र मोदी यानीही खाणींचा लिलाव केला जावा अशी भूमिका लोकसभा निवडणुकीपूर्वी घेतली होती, असे कामत म्हणाले. Read More »

थकबाकीच्या मागणीसाठी आज कदंब कर्मचार्‍यांची सभा

सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी व तीन वर्षांचा बोनस द्यावा या मागणीसाठी पणजी, मडगाव, वास्को व पर्वरी या चारही डेपोतील कर्मचारी आज २४ रोजी ११ वा. पणजीत जमणार असून संध्याकाळी ३.३० वा. कदंब बसस्थानकावर सभा होणार असल्याचे कदंब कामगार संघटनेचे अध्यक्ष जोकिम फर्नांडिस यांनी सांगितले. सभेला सुमारे ५०० ते ६०० कर्मचारी असतील. सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी चार हप्त्यात देण्याचे आश्‍वासन सरकारने ... Read More »