ब्रेकिंग न्यूज़

ब्रेकिंग न्यूज

हेरगिरीप्रकरणी अभियंत्याला तीन दिवस रिमांड

नागपूर पाकिस्तानसाठी हेरगिरी करीत असल्याच्या संशयावरून सोमवारी महाराष्ट्र व उत्तर प्रदेश यांच्या एटीएसकडून ताब्यात घेण्यात आलेल्या ब्राह्मोस एरोस्पेस लि. चा अभियंता निशांत अगरवाल याला येथील जिल्हा न्याय दंडाधिकारी एस. एम. जोशी यांनी तीन दिवसांच्या बदली रिमांडवर उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला. ब्राह्मोस क्षेपणास्त्र विषयक अत्यंत महत्वाची माहिती अगरवालच्या खाजगी संगणकावर आढळली. देशासाठी हा धोका असल्याचा दावा पोलिसांनी केला ... Read More »

केंद्रीय मंत्री अकबर यांच्यावरही लैंगिक छळणुकीचे आरोप

नवी दिल्ली सिने अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली लैंगिक छळणुक केल्याच्या आरोपानंतर आता केंद्रीय राज्य मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरही असाच आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.अकबर यांनी आपली अनेक वर्षे लैंगिक छळणूक केली होती असा आरोप आता पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्या सहकारी म्हणून काम केलेल्या महिला पत्रकारांनी केला आहे. या अनुषंगाने काल दिल्लीत महिला माध्यम प्रतिनिधींनी सुषमा ... Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप

केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप   नरेंद्र मोदी पंतप्रधान याबरोबरच :– कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन अणु ऊर्जा, अंतराळ, महत्वाचे सर्व धोरणविषयक मुद्दे आणि कोणत्याही मंत्र्यांना न दिलेली इतर सर्व खाती   कॅबिनेट मंत्री   1. राजनाथ सिंग गृह 2. सुषमा स्वराज परराष्ट्र व्यवहार 3. अरुण जेटली वित्त आणि कंपनी व्यवहार 4. नितीन गडकरी रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन, जलसंसाधन, नद्याविकास आणि ... Read More »

मनोहर पर्रीकर व विश्वजित राणे विजयी

पणजी आणि वाळपई मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून पणजीतून मनोहर पर्रीकर व वाळपईतून विश्वजित राणे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. मनोहर पर्रीकर यांना 9862 मते ((63.47 टक्के) मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना 5059 (32.56 टक्के) मते प्राप्त झाली. गोवा सुरक्षा मंचाचे आनंद शिरोडकर यांना 220 मते (1.42 टक्के) मिळाली, तर केनेथ सिल्वेरा (अपक्ष) ... Read More »

पर्रीकर मंत्रिमंडळाचे खातेवाटप

मनोहर पर्रीकर यांच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप असे आहे –   मनोहर पर्रीकर – मुख्यमंत्री, गृह, अर्थ, कर्मचारीविषयक, सर्वसाधारण प्रशासन, दक्षता व वाहतूक सुदिन ढवळीकर – सार्वजनिक बांधकाम फ्रान्सिस डिसोझा – नगरविकास विजय सरदेसाई – ग्राम व नगर नियोजन रोहन खंवटे – महसूल बाबू आजगावकर – पर्यटन पांडुरंग मडकईकर – वीज गोविंद गावडे – कला व संस्कृती जयेश साळगावकर – गृहनिर्माण ... Read More »

घराला आग लागून दोन लाखांचे नुकसान

बस्तोडा हॉली क्रॉस हायस्कूल जवळील सुरेश हळर्णकर यांच्या घराला काल सायंकाळी ४.३० च्या दरम्यान आग लागून घरातील दुरुस्तीसाठी आणून ठेवलेली १२ कपडे शिलाई मशिने, ३ पंखे, घराचे छप्पर व इतर वस्तू जळून खाक झाल्याने २ लाख रुपयांचे नुकसान झाले. Read More »

पंच सदस्यांकडून जीवे मारण्याची धमकी

असोल्डा पंचायतीचे पंच सदस्य किस्तोर बस्त्यांव फर्नांडिस व दयानंद कुशाली नाईक यांनी शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शशिकांत जिवाजी नाईक यांनी कुडचडे पोलीस स्थानकात नोंदविली आहे. Read More »

वाळपईत बस अपघातात २९ जखमीं

जखमीत विद्यार्थी व शिक्षकांचा समावेश वाळपई-सत्तरी येथे नुहा पेट्रोल पंपजवळ झालेल्या प्रवासी बस अपघातात शाळकरी मुले व शिक्षक मिळून २९ जण जखमी झाले. अपघात सकाळी ७.३० वा. घडला. जीए ०४ टी २६२२ या क्रमांकाची दीप साई ही प्रवासी बस सकाळी डिचोलीहून वाळपई येथे येत असताना नागवे जंक्शनवर चालकाचा ताबा सुटला व बसची धडक झाडाला बसली. सुदैवाने दुसर्‍या झाडाला गाडी अडकून ... Read More »

पणजीत पे पार्किंगला तत्त्वत: मान्यता

दोन टप्प्यांत अमलबजावणी पणजी शहरातील वाहतूक कोंडीची व पार्किंगची समस्या नाहीशी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शहरातील विविध रस्ते हे पे पार्किंग करण्याच्या व काही रस्ते ‘वन वे’ बनवण्यासाठीच्या योजनेला काल महापालिका मंडळाच्या बैठकीत तत्त्वता मान्यता देण्याचा ठराव संमत करण्यात आला. मात्र, काही नगरसेवकांनी केलेल्या सूचनावरून या योजनेची दोन टप्प्यात अमलबजावणी करण्याचे ठरवण्यात आले. Read More »

कुर्टीतील युवकाची  गळफासाने आत्महत्या

हवेली-कुर्टी येथील अक्षय दुर्गानंद देसाई या २१ वर्षे वयाच्या युवकाने घरातील फॅनला दुपट्टा बांधून गळफास लावून आत्महत्या केली. अक्षय याने केटरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता व तो बेकार होता. निराशेपोटीच त्यांनी हे कृत्य केले असावे असा कयास आहे. Read More »