ब्रेकिंग न्यूज़

ब्रेकिंग न्यूज

डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त होणार

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने डिझेलच्या दरात अडीच रुपयांनी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिझेलच्या दरात कपात झाली तर एवढी मोठी कपात होण्याची चार वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल. निवडणूक आचारसंहिता असल्याने १९ ऑक्टोबरनंतर दर कपातीची घोषणा होईल. Read More »

हळदोण्यात विवाहितेची आत्महत्या

हळदोणे येथील विधी उर्फ शांती वासुदेव उर्फ रवी केरकर या २३ वर्षीय विवाहित महिलेने काल सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान आपल्या राहत्या घराच्या छप्पराच्या वाशाला दुपट्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. Read More »

भोबे असोसिएट केवळ सल्लागार : सुदिन

एस.एन.भोबे असोसिएट कंपनी ही गोव्यातील विविध प्रकल्पांसाठी केवळ सल्लागार आहे, प्रकल्पाचा आराखडा ती बनवत नाही, असे साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. आराखडा अभियंतेच तयार करतात असे त्यांनी सांगितले. Read More »

खनिज वाहतुकीच्या दराबाबत मुख्यमंत्र्यांचे ट्रकमालकांना आश्‍वासन

ई-लिलावात गेलेल्या खनिजाची वाहतूक करण्याबाबतचे दर निर्धारित करण्याच्या मागणीसाठी काल ट्रकमालकांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या मागण्या सादर केल्या. Read More »

राणे, फालेरो दिल्लीला

कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुइझिन फालेरो व विरोधी नेते प्रतापसिंह राणे काल दिल्लीला रवाना झाले. Read More »

महिला चालक असलेल्या पर्यटक टॅक्सी धावणार

मुंबईच्या धर्तीवर गोव्यात प्रथमच प्रयोग उद्या शुभारंभ पहिले १० परवाने प्रदान पर्यटन खात्याचा उपक्रम गोवा पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील महिला चालक असलेल्या टॅक्सी सुरू करण्याची योजना तयार केली असून उद्या गुरुवार दि. १६ रोजी संध्याकाळी ६ वा. महामंडळाच्या मिरामार येथील यात्रीनिवासात आयोजित केलेल्या एका शानदार सोहळ्यात या योजनेचा शुभारंभ होईल, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखील देसाई यांनी दिली. Read More »

फोंड्यात भटक्या कुत्र्याकडून ११ जणांचा चावा

राज्यात भटक्या कुत्र्यांची दहशत नेहमी अनुभवाला येते. काल फोंड्यात त्याचा प्रत्यय आला. फोंड्यात काल एका भटक्या कुत्र्याने काल दिवसभरात तब्बल ११ जणांचा चावा घेतल्याने त्यांना इस्पितळात जाऊन उपचार घ्यावे लागले. यात तीन महिलांचाही समावेश होता. Read More »

कोडली येथून खनिज वाहतूक थांबवली

वाढीव दराची ट्रकमालकांची मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली कोडली खाणीवरील ई-लिलावात गेलेल्या खनिजाची वाहतूक काल थांबवण्यात आली. ट्रकमालकांत वाहतुकीच्या दरासंबंधी तक्रार असल्याने ही वाहतूक थांबवली. Read More »

सरकार बदला, कोकणचे भाग्य बदलेल : मोदी

महाराष्ट्राबरोबरच कोकण आणि सिंधुदुर्गचे भाग्य बदलण्यासाठी पहिल्यांदा महाराष्ट्रातील सरकार बदला, अशी हाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणवासीयांना दिली. सिंधुदर्ग जिल्ह्यातील भाजपचे उमेदवार प्रमोद जठार, राजन तेली व विष्णू मोंडकर यांच्या प्रचारार्थ आयोजित कणकवली कासार्डे येथील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. Read More »

‘हुडहुड’ धडकले

६ मृत्युमुखी; विशाखापट्टनमची मोठी हानी हुडहुड महाचक्रीवादळ मुसळधार पाऊस आणि २०० कि.मी. प्रति तास वेगाने वाहणार्‍या सुसाट वार्‍यांसह काल आंध्र प्रदेश व उदिशाच्या किनारपट्टीला धडकले. वादळामुळे किनारपट्टीच्या भागाची भयंकर हानी झाली असून सर्वात जास्त फटका विशाखापट्टनमला बसला आहे. सर्व ती खबरदारी घेऊनही आंध्रात पाच तर उदिशात एक जण मृत्युमुखी पडला. मुसळधार पावसामुळे उदिशात पुराची भीती व्यक्त करण्यात आली आहे. Read More »