ब्रेकिंग न्यूज़

ब्रेकिंग न्यूज

पाळीतील ४० ग्रामस्थ अस्वास्थामुळे इस्पितळात

डिचोली (न. प्र.) पाळी -कोठंबी पंचायत विभागातील देऊळवाडा, पारोडा, अंतरशे या गावातील ३५ ते ४० लोकांचे आरोग्य अचानक बिघडल्याने व सर्वांत एकाच प्रकारची लक्षणे दिसून आल्याने विविध इस्पितळात त्यांना दाखल करण्यात आले. सदर प्रकार हा दूषित पाण्यामुळे की अन्य काही कारणामुळे घडला याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक लोकांना शौच, उलटी, पोटात मळमळणे आदी लक्षणे दिसून ... Read More »

प. बंगालात रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत २ मृत्यूमुखी

कोलकाता प. बंगालमधील संत्रागाची रेल्वे स्थानकावरील पदपुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत दोघेजण मृत्यूमुखी पडले असून १७ जण जखमी झाले. एकाच वेळी सदर स्थानकावर येणार असलेल्या वेगवेगळ्या रेल्वेंबाबत ध्वनीक्षेपकावर झालेल्या सूचनेनंतर ही चेंगराचेंगरी झाल्याचे रेल्वेचे प्रवक्ते संजय घोष यांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींपैकी काही जणांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. Read More »

भारतीयांच्या विदेशातील संपत्तीवर आता होणार कारवाई

नवी दिल्ली विदेशात अवैध संपत्ती साठवलेल्या भारतीयांवर कठोर कारवाई करण्यासाठी आता प्राप्ती कर खात्याने मोहीम उघडली आहे. प्राप्ती कर खात्याने आता या विभागाच्या विदेशातील समकक्ष विभागाच्या सहकार्याने हजारो भारतीयांच्या विदेशातील संपत्तीची चौकशी सुरू केली असल्याची माहिती प्राप्ती कर विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. सीबीडीटीचे संचालक सुशील चंद्रा यांनी याला दुजोरा दिला आहे. Read More »

माद्री बलात्कार प्रकरणी ः मुख्य साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू

त्रिवेंद्रम केरळमधील माद्रीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील एक महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या फा. कुरिआकोस कट्टुथारा यांचा काल संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. या बलात्कार प्रकरणी आरोपी म्हणून अटक झालेले बिशप फ्रँको मुलक्कल यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात फा. कुरिआकोस कट्टुथारा हे त्यांच्या घरात संशयास्पदरित्या मृतावस्थेत सापडले. त्यांना धमक्या दिल्या जात होत्या असे त्यांच्या कुटुंबियांना म्हटले असून याप्रकरणी माहिती देणारे ... Read More »

अमृतसर रेल्वे अपघाताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश

अमृतसर अमृतसरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काल पत्रकार परिदेद्वारे दिले. चार आठवड्यात ही चौकशी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या दुर्घटनेबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करताना पीडितांच्या कुटुंबीयांसोबत संपूर्ण देश असल्याचे सांगितले. या अपघातातील केवळ नऊ मृतदेहांची ओळख पटलेली नसल्याचे ते म्हणाले. दुर्घटनेतील पीडितांना मदत म्हणून राज्यसरकारने ३ कोटी रुपये दिले असल्याची माहितीही ... Read More »

आसाममध्ये पुराचा धोका

गुवाहाटी आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. भूस्खलनामुळे तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीचे पाणी अडून कृत्रिम तलाव निर्माण झाले आहेत. त्यामुळे हा धोका निर्माण झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यांतील अनेक जिल्ह्यात एनडीआरएफच्या ३२ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. Read More »

राज्यात पेट्रोलपेक्षा डिझेल महाग

पणजी (प्रतिनिधी) : राज्यात डिझेलच्या दराने पेट्रोलच्या दराला मागे टाकले आहे. गुरुवारी डिझेलचा दर प्रति लीटर ७३ रुपये ५२ पैसा एवढा झाला असून पेट्रोलचा दर ७३ रुपये ४२ पैसे एवढा झाला आहे. राज्यात पेट्रोलच्या दरापेक्षा डिझेलचा दर कमी होता. मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे दर जवळ येऊन ठेपले होते. गुरूवारी राज्यातील डिझेलच्या दरात २४ पैशांनी वाढ झाली. पेट्रोलच्या दरात ... Read More »

तितली चक्रीवादळाचे आंध्र प्रदेशात ८ बळी

भुवनेश्‍वर/चेन्नई : आंध्र प्रदेशात काल तितली चक्रीवादळ धडकल्यानंतर राज्याच्या किनारी भागांमध्ये हाहाःकार उडाला. यामुळे ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आंध्र प्रदेशच्या आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेतर्फे देण्यात आली. ओडिशा राज्याच्या गंजम व गजपती या जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात हानी केली. मात्र तेथे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आंध्रात मृत्यूमुखी पडलेल्या ८ जणांत ६ मच्छिमारांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. Read More »

कार्ती चिदंबरम् यांच्या ५७ कोटींच्या मालमत्ता जप्त

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या भारतासह ब्रिटन व स्पेन या देशांमधील ५७ कोटी रुपये किमतीच्या मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने एका कारवाईत टांच आणली आहे. आयएनएक्स मिडिया मनी लॉंडरिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. Read More »

मृतदेह गायबप्रकरणी डॉक्टरचा जामीन अर्ज निकालात

पणजी (प्रतिनिधी) बांबोळी येथील गोमेकॉच्या शवागारातून यानूझ गोन्साल्विस या युवकाचा मृतदेह गायब प्रकरणी फॉरेन्सिक विभागाचे निलंबित प्रमुख डॉ. एडमंड रॉड्रीगीस यांनी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज निकालात काढण्यात आला. या प्रकरणी डॉ. रॉड्रीगीस यांच्या अटकेची गरज भासल्यास क्राईम ब्रँचने त्यांना ४८ तासांची सूचना द्यावी, असा आदेश न्यायालयाने काल दिला. क्राईम ब्रँचने या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपस्थित ... Read More »