Author Archives: user

काश्मीर प्रश्र्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न

एडिटर्स चॉइस परेश प्रभू —————- ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ अशोक धर यांचा ‘कश्मीर ः ऍज आय सी इट, फ्रॉम विदिन अँड अफार’ हा ग्रंथ रूपा पब्लिकेशन्सतर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. स्वतः काश्मिरी पंडित असलेल्या धर यांनी इतिहास, संस्कृती, लोकजीवन, वर्तमान याचा वेध घेत काश्मीर प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा मौलिक प्रयत्न त्यात केला आहे. काश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एक नवे दालन त्यातून खुले झाले ... Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना: २७७) (स्वाध्याय – २५) विश्‍वामध्ये प्रत्येक सजीव घटकाला शोध असतो एका सूक्ष्म गोष्टीचा- सुखाचा! मग तो घटक कोणताही असू दे – जसे वृक्ष, वनस्पती, पशू, पक्षी, कृमी, कीटक किंवा मानव. सुख मिळाले की त्याची वाढ चांगली होते. त्याचे आरोग्य चांगले राहते. त्याची कर्तृत्वशक्ती वाढते. ते आपली भावना विविध प्रकाराने व्यक्त करू शकते – विविध हावभाव ... Read More »

असक्तिः अनभिष्वंगः पुत्रदारगृहादिषु …

– प्रा. रमेश सप्रे भगवद्गीता या जीवनविषयक ग्रंथात केवळ अर्जुनाला केलेलं प्रासंगिक मार्गदर्शन नाहीये तर सार्‍या मानवजातीसाठी उपयुक्त असं समुपदेशन आहे. या दृष्टीनं आपण गीतेवर सहचिंतन करत आहोत. प्रापंचिक व्यक्तीला सतत अपेक्षित-अनपेक्षित, हवं-नको असलेल्या प्रसंगांना किंवा अनुभवांना सामोरं जावं लागतं. अशा सार्‍या अनुकूल-प्रतिकूल घटनांचा स्विकार आनंदानं कसा करायचा व अवघं जीवन ही आनंदयात्रा कशी बनवायची यासाठी उत्कृष्ट समुपदेशन गीतेच्या अनेक ... Read More »

ज्येष्ठांना कसे जपावे..?

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी ज्येष्ठांनी कसे जगावे यावर आम्ही विचार केला. आपले जगणे ते जगतीलही. लिहिले व त्यांनी ते वाचले. त्यावर आपले जगणे ठरविले असे काही नाही. दोन अधिक दोन चारच होणार असे काही नाही. जीवन जगणे ही बेरीज-वजाबाकी असू शकत नाही. माणसाच्या जीवनात असा एक क्षण येतो जेव्हा त्याचे जगणे पराधीन होऊन जाते. अशा पराधीन झालेल्या ज्येष्ठांविषयी आम्ही बोलू. ... Read More »

मिकी पाशेकोंची शिक्षा कायम

अभियंता मारहाण प्रकरणी सुप्रिम कोर्टाने आव्हान याचिका फेटाळली ग्रामीण विकासमंत्री मिकी पाशेको यांनी २००६ साली वीज खात्याचे मडगाव येथील कनिष्ठ अभियंते कपिल नाटकेर यांना शिव्या देऊन त्यांच्यावर थप्पड मारल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सुनावलेल्या सहा महिन्यांच्या तुरुंगवासाच्या सजेवर काल सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. मंत्री पाशेको यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशास दिलेले आव्हान न्यायालयाने फेटाळले असल्याने त्यांचे मंत्रीपद धोक्यात आले ... Read More »

जम्मू-काश्मीरात पुरामुळे हाहाकार

घरे दरडीखाली दबून १७ ठार गेल्या सप्टेंबरमध्ये आलेल्या जलप्रलयातून जम्मू-काश्मीर अजून सावरलेले नसताना राज्यात पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला असून बडगाम जिल्ह्यात ४ ते ५ घरे दरडीखाली गाडली गेली आहेत. लादेन गावातील दोन घरे दरडीखाली दबली गेल्याने १७ जण मरण पावल्याची भीती पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. Read More »

महसूल वाढीवर भर देणारा पणजी महापालिकेचा अर्थसंकल्प संमत

काल झालेल्या पणजी महापालिकेच्या बैठकीत ३४ कोटी ६६ लाख रुपये खर्चाचा व ६ कोटी १० लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प संमत करण्यात आला. खर्च भरून काढण्यासाठी महापालिकेने यावेळी निचरा व्यवस्था शुल्कात बर्‍याच प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅसिनो चालकांच्या निचरा व्यवस्थेच्या सध्या ५ हजार रुपये शुल्का ऐवजी ती वाढवून दहा हजार रुपये करण्याचे ठरविले आहे. वरील शुल्क वर्षासाठी आहे. त्याचप्रमाणे ... Read More »

सांगेचे संयुक्त मामलेदार अनिश प्रभुदेसाईला अटक वॉरंट

कोलवा येथील एका रेस्टॉरंटमध्ये दंगामस्ती केलेले सांगेचे संयुक्त मामलेदार अनिश प्रभुदेसाई याला काल उपन्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात उपस्थित न राहिल्याबद्दल अटक वॉरंट जारी केला आहे. उपजिल्हाधिकारी अजित पंचवाडकर यांनी हा वॉरंट जारी केला. Read More »

मालवीय यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान

बनारस विश्‍वविद्यालयाचे संस्थापक, हिंदू महासभेचे नेते तथा स्वातंत्र्यसैनिक पंडित मदन मोहन मालवीय यांना काल मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मालवीय यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला. मालवीय यांच्यासह भारतरत्न पुरस्कार मिळवणारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना राष्ट्रपतींनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला होता. Read More »

‘१०८’ रुग्णवाहिका कर्मचार्‍यांचे आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धरणे

दुपारपर्यंत सेवेत घेण्याची मुदत आज दुपारी १२ वाजेपर्यंत १०८ रुग्णवाहिका कर्मचार्‍यांना सेवेत न घेतल्यास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या निवासस्थानी धरणे धरण्याचा निर्णय वरील कर्मचार्‍यांच्या संघटनेने घेतला आहे, अशी माहिती राजन घाटे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. Read More »