ब्रेकिंग न्यूज़

Author Archives: np

विजय हजारे चषक तिसर्‍यांदा मुंबईकडे

बेंगळुरू आदित्य तरेच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने अंतिम सामन्यात दिल्लीवर ४ गडी राखून विजय मिळवित मुंबईने तिसर्‍यांदा विजय हजारे चषकावर नाव कोरले. बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला. मुंबईने यापूर्वी २००६-०७मध्ये राजस्थानवर मात करीत या चषकावर शेवटचे नाव कोरले होते. दिल्लीकडून मिळालेल्या १७८ धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ (८), अजिंक्य रहाणे (१०), श्रेयस अय्यर ... Read More »

सायना अंतिम फेरीत

ओडेन्स भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालने आपली विजयी घोडदौड कायम राखताना डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दुसर्‍यांदा धडक दिली. पुरुष एकेरीत मात्र भारताच्या किदाम्बी श्रीकांतचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. काल झालेल्या महिलांच्या उपांत्य फेरीत सायनासमोर आव्हान होते ते इंडोनेशियाच्या जॉर्जिया मारिस्काचे. परंतु सायनाने मारिस्काचे आव्हान २१-११, २१-१२ अशा सरळ सेट्‌समध्ये मोडित काढत स्पर्धेची दुसर्‍यांदा अंतिम फेरी गाठली. ... Read More »

इराणच्या इदानी पोवाला अजिंक्यपद

पणजी (क्री. प्र.) इराणचा ग्रँडमास्टर इदानी पोवाने ८.५ गुणांसह पहिल्या गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. गँ्रडमास्टर बाबुजियान लीवोनला उपविजेतेपद तर दीपन चक्रवर्तीला तृतीय स्थान प्राप्त झाले. स्पर्धेत आकर्षक कामगिरी केलेल्या नितिश बेलुरकरला २०व्या स्थानावर समाधान मानावे लागले. ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत काल शेवटच्या दिवशी इदानीने कार्तिक वेंकटरमनला मात करीत जेतेपद निश्‍चित ... Read More »

जमशेदपूरमधील सामन्यात एटीकेच्या कॉपेलची कसोटी

जमशेदपूर इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) रविवारी एटीकेची येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुलात जमशेदपूर एफसीविरुद्ध लढत होत आहे. गेल्या मोसमात स्टीव कॉपेल यांनी जमशेदपूरला मार्गदर्शन केले होते. आता ते एटीकेकडे वळले आहेत. त्यांची या लढतीत कसोटी लागेल. दुसरीकडे खाते उघडल्यामुळे ताजेतवाना झालेल्या एटीकेसमोर जमशेदपूरला घरच्या मैदानावर प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. गेल्या मोसमात कॉपेल यांच्या मार्गदर्शनाखाली जमशेदपूरचे बाद फेरीतील स्थान थोडक्यात हुकले, ... Read More »

दिल्लीने केरळा ब्लास्टर्स बरोबरीत रोखले

कोची अँड्रीया क्लाऊडेरोविचने दुसर्‍या सत्रात नोंदविलेल्या गोलमुळे दिल्ली डायनॅमोजने केरळा ब्लास्टर्सला कोचीतील नेहरू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात १-१ असे बरोबरीत रोखत इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील लढतीत गुण विभागून घेतला. उत्तरार्धाच्या प्रारंभी सी. के. विनीतने ब्लास्टर्सचे खाते उघडले होते, पण सहा मिनिटे बाकी असताना अँड्रीया क्लाऊडेरोविच याने दिल्लीला बरोबरी साधून दिली. ब्लास्टर्सची तीन सामन्यांतील दुसरी बरोबरी असून एका विजयासह त्यांचे पाच ... Read More »

ऋषभ पंतला वनडे पदार्पणाची संधी

गुवाहाटी वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेला आज गुवाहाटीतील दिवसरात्र होणार्‍या पहिल्या लढतीने प्रारंभ होणार असून भारतीय संघ पुढील वर्षी होणार्‍या विश्वचषकाच्या तयारीसाठी मैदानावर उतरणार आहे. या सामन्यात डावखुरा युवा फलंदाज ऋषभ पंतला अंतिम अकरात स्थान मिळणार हे निश्‍चित झाले आहे. हा सामना दुपारी १.३० वा. सुरू होणार आहे. काल भारतीय संघ व्यवस्थापनाने पहिल्या वनडेसाठी आपल्या १२ सदस्यीय संघाची घोषणा केली असून ... Read More »

चीनने समुद्रावरील उभारला लांब पूल

बीजिंग चीनने समुद्रावर जगातील सर्वात लांब पूल उभारला आहे. जवळपास ५५ किलोमीटर लांबीचा हा पूल आहे. या पुलाच्या बांधणीसाठी ८ अब्ज डॉलरचा खर्च आला आहे. या पुलाचे काम २००९ मध्ये हाती घेण्यात आले होते. २४ ऑक्टोबरला हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. चीनमधील ११ शहरांमधून हा पूल जातो. हा पूल भूकंप, वादळ आणि माल वाहतूक करणार्‍या बोटींपासूनही सूरक्षित राहू ... Read More »

‘केबीसी’साठी १४ वर्षे अथक प्रयत्न : रासम

पणजी (बबन भगत) महानायक अमिताभ बच्चन यांच्यामुळे लोकप्रिय ठरलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ ह्या सामान्य ज्ञानावर आधारित असलेल्या ‘रिऍलिटी शो’साठी निवड होणे ही वाटते तेवढी साधी गोष्ट नाही. आपण गेल्या १४ वर्षांपासून केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच आपणाला अमिताभ बच्चन यांच्यासमोरील ‘हॉट सीट’वर बसण्याची संधी मिळू शकली असे कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी होऊन ५० लाख रु. जिंकून परतलेले मीरामार येथील रहिवासी गजानन रासम ... Read More »

सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे डिचोलीतील ४५ उद्योग संकटात

डिचोली (न. प्र.) डिचालीतील औद्योगिक वसाहतीतील सुमारे ४५ उद्योजक व त्यांची आस्थापने सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे संकटात सापडली आहेत. गेल अनेक महिन्यांपासून रोज सातत्याने दिवसातून १२ ते १५ वेळा वीज गायब होते. त्यामुळे कारखाने तसेच उद्योजकांना बिकट संकटांचा सामना कारावा लागत आहे. काल शनिवारी सुमारे २५ उद्योजकांनी डिचोली वीज कार्यालयात धडक देऊन वीज समस्येबाबत अभियंते दीपक गावस यांना या खंडित वीजेचे ... Read More »

सोपटे-शिरोडकरांचा पराभव निश्‍चित

पणजी (न. प्र.) कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपशी हात मिळवणी केलेले मांद्रे मतदारसंघातील आमदार दयानंद सोपटे व शिरोडा मतदारसंघातील आमदार सुभाष शिरोडकर यांना पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागेल, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले. दोन्ही आमदारांनी स्वत:च्या स्वार्थासाठी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे त्यांना मतदारसंघाच्या विकासासाठी आपण आमदारकीचा राजीनामा दिला आहे असे खोटे बोलून ... Read More »