Tag Archives: front

पणजी मनपाने फेरीवाल्यांना हटवले

चतुर्थीनिमित्त येथील मांडवी तीरावरील पदपथावर फर्निचरसह विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू विक्रीसाठी घेऊन आलेल्या फेरीवाल्यांना काल पणजी महापालिकेने तेथून आपला गाशा गुंडाळायला लावला. सदर परिसर हा सीआरझेड -२ मध्ये येत असल्याने तेथे फेरी भरवण्यास परवानगी न देण्याचा आदेश उच्च न्ययालयाने दिलेला असल्याने काल महापालिकेने या फेरीवाल्यांना त्यांनी तेथे थाटलेली मंडपवजा दुकाने हटवण्याचा आदेश दिला. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे महापालिकेनेच या फेरीवाल्यांना गेल्या ... Read More »

सुरक्षा आव्हानांच्या मुकाबल्यासाठी भारत सुसज्ज

>> लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशवासियांना ग्वाही देशाच्या ७१व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात येथील लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या आव्हानांचा मुकाबला करण्यास सक्षम व सुसज्ज असल्याची ठासून ग्वाही दिली. डोकलामप्रश्‍नी चीनबरोबरील विद्यमान तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर मोदी यांचे हे वक्तव्य सूचक मानले जाते. जातीयवाद हे विषासारखे असून तो देशासाठी घातक आहे व ... Read More »

कला अकादमी आयोजित राज्यस्तरीय पुरुष भजन स्पर्धेचे विजेते मुशेल कला मंडळ, वास्को पथकासमवेत गायक पं. उल्हास कशाळकर, अकादमीचे सदस्य सचिव प्रसाद लोलयेकर व मान्यवर. Read More »

नवप्रभाचा ४७ वा वर्धापनदिन थाटात साजरा

दैनिक नवप्रभाचा ४७ वा वर्धापनदिन काल मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर, सभापती डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुषमंत्री श्री. श्रीपाद नाईक, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री श्री. प्रतापसिंह राणे, सौ. विजयादेवी राणे, कला व सांस्कृतिक मंत्री श्री. गोविंद गावडे, वीजमंत्री श्री. पांडुरंग मडकईकर, महसूलमंत्री श्री. रोहन खंवटे, विरोधी पक्षनेते श्री. चंद्रकांत कवळेकर, माजी मुख्यमंत्री श्री. ... Read More »

हिमाचल प्रदेशमधील भूस्खलनात ५० मृत्यूमुखी

>> ढगफूटीनंतर महामार्गावरील दुर्घटनेत दोन बसेस गाडल्या मंडी-पठाणकोट महामार्ग परिसरात शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे भूस्खलन झाल्याने त्यात हिमाचल प्रदेश परिवहन मंडळाच्या दोन बसगाड्या सापडल्याने सुमारे ५० जणांचा मृत्यू झाल्याची भीती राज्य प्रशासनाने व्यक्त केली आहे, या दुर्घटनेतील ८ जणांचे मृतदेह सापडले असून बसेसमधील अन्य प्रवाशांचा पत्ता लागलेला नाही असे सांगण्यात आले. मृतांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. ... Read More »

भाविकादेवी भजनी मंडळ प्रथम

>> कला अकादमी राज्य महिला भजन स्पर्धा कला अकादमी गोवा आयोजित भजन सम्राट मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती राज्यस्तरीय महिला गटाच्या स्पधेंत भाविकादेवी महिला भजनी मंडळ, दिवाडी पथकाने पस्तीस हजार रुपयांचे रोख प्रथम पारितोषिक व स्व. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती चषक पटकाविला. तीस हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक देवगी पुरुष महिला भजनी मंडळ, पाटणे-कोळंब पथकाला तर पंचवीस हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक स्वरगंध संगीत संस्कृती ... Read More »

देशाचे १३ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेताना माजी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार सोहळ्यात पद व गोपनीयतेची शपथ दिली. Read More »

विकासाच्या नावाखाली विश्‍वजीत राणेंकडून लूट

>> रवी नाईक यांचे वाळपईत आरोप वाळपई शहरातून ग्रामीण भागांना जोडणारे सुसज्ज रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत गरजा सर्वसामान्यांना देण्यास विश्‍वजीत राणे अपयशी ठरले आहेत. विकासाच्या नावाखाली त्यांनी लूट केली असल्याचा आरोप करून जो विकास जनतेच्या फायद्याचा नाही तो काय कामाचा असा सवाल फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी काल वाळपई येथे पत्रकार परिषदेत केला. पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाही ... Read More »

म्हादई ः कर्नाटकाचे पितळ उघड

>> वन-पर्यावरण मंत्रालयाचा ना हरकत दाखलाच नाही कळसा व भंडूरा प्रकल्पाच्या बांधकामासाठी कर्नाटक सरकारला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाचा ना हरकत दाखला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयात म्हादई बचाव अभियानच्या अर्जावर झालेल्या सुनावणीवेळी स्पष्ट झाले असून त्यामुळे न्यायालयाने कर्नाटक सरकार व केंद्र सरकारला वरील दाखल्याच्या बाबतीत येत्या दि. १४ पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे अभियानचा दावा भक्कम बनलेला असून ... Read More »

पणजी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार मनोहर पर्रीकर यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. आल्तिनो येथील कोपरा बैठकीत मतदारांशी संवाद साधताना पर्रीकर. Read More »