कॉंग्रेसचे सर्व आमदार प्रचारात सहभागी होणार

0
71

>> विधीमंडळ बैठकीत निर्णय : कवळेकर

कॉंग्रेस विधीमंडळाच्या बैठकीत दि. २३ रोजी होणार्‍या वाळपई व पणजी मतदारसंघाच्या पोट निवडणूक प्रचारासाठी पक्षाच्या सर्व आमदारांनी सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कालपासून पणजी मतदारसंघात प्रचार दौरा सुरू केल्याची माहिती विरोधी नेते चंद्रकांत कवळेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
पर्रीकर सरकारने गेले सहा महिने राज्यातील रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. माध्यान्ह आहार पुरविण्याचे कंत्राटही अक्षय पात्राका देण्याचा घाट घातला असून त्यामुळे स्वयंसहाय्य गटांच्या व्यवसायावरही गदा येईल, असे कवळेकर यांनी सांगितले.
दरम्यान, कॉंग्रेस पक्षाने काल पणजीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित केला. पणजीचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी पणजीसाठी दिलेला जाहीरनामा महत्वाचा आहे. त्यात नद्यांच्या राष्ट्रीयीकरणास विरोध आहे, असे आमदार दिगंबर कामत यांनी यावेळी सांगितले. चोडणकर यांना मिळत असलेला मतदारांचा पाठिंबा पाहून पर्रीकर यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे, असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी सांगितले.