म्हादई प्रश्‍नी आज गोव्याची सरशी शक्य

0
95

केंद्राने कसलेच दाखले व परवाने कर्नाटकाला दिलेले नसतानाही २००६ पासून कळसा कालव्याचे काम पूर्णत्वाकडे नेताना खोटारडेपणा केलेल्या कर्नाटकाला आज सर्वोच्च न्यायालयात चपराक बसणार असून केंद्राने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे कर्नाटकी डाव उधळला जाणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात याप्रश्‍नी महत्त्वपूर्ण निकाल अपेक्षित असून गोव्याची नजर या निकालाकडे लागली आहे.

दरम्यान, कर्नाटकाने आपला बचाव करण्यासाठी १०० पानी सादरीकरण केले असून २००६ पासूनचा सर्व तपशील सादर केला आहे.
आज होणार्‍या सुनावणीत आम्हाला नक्कीच न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया म्हादई बचाव अभियानाच्या अध्यक्ष निर्मला सावंत यांनी व्यक्त केली आहे.