उत्तर प्रदेशात ऑक्सिजन पुरवठा ठप्प झाल्याने ३० मुलांचा मृत्यू

0
181

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये असलेल्या बाबा राघव दास या शासकीय इस्पितळातील ऑक्सिजनचा पुरवठा ठप्प झाल्याने गेल्या २४ तासांत ३० मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, उत्तर प्रदेश प्रशासनाने फक्त ७ लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यातील गोरखपूर जिल्ह्यात ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने मृत्यू झालेल्या मुलांपैकी १३ एनएनयू वॉर्डमध्य तर १७ मुले मेंदूज्वर वॉर्डमध्ये उपचार घेत होती. इस्पितळाला ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या कंपनीने ६९ लाख रुपयांचे बिल थकल्यामुळे पुरवठा गुरुवारी रात्रीपासून बंद केला होता. त्यामुळे गेल्या ४८ तासात ३० मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बिल थकबाकीमुळे कंत्राटदाराने ऑक्सिजन पुरवठा बंद केला होता. तसेच सिलिंडरही संपले होते. त्यामुळे गेल्या ४८ तासांमध्ये लहान मुलांना प्राण गमवावे लागले.